फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजगांधीजींच्या भारत छोडो आंदोलनावर नाट्यप्रस्तुती

गांधीजींच्या भारत छोडो आंदोलनावर नाट्यप्रस्तुती

Advertisements

राष्ट्रभाषा परिवार सामाजिक संस्थेचे प्रस्तुतीकरण

मनाला भिडणारे प्रसंग:तुषार गांधींचा नाट्यानुभूतीनंतर अभिप्राय

नागपूर,ता.२० ऑगस्ट २०२२: भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालय अंतर्गत, राष्ट्रीय नाट्य विद्यालय, नवी दिल्लीद्वारा आयोजित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या संकल्पनेतुन, २२ सावा भारत रंगमहोत्सव २०२२ अंतर्गत, नागपुरच्या राष्ट्रभाषा परिवार सामाजिक संस्थेच्या वतीने दि.११ ऑगस्ट २०२२ रोजी ‘अगस्त क्रांती’ या नाटकाचे सादरीकरण रविंद्र नाट्यमंदिर ,प्रभादेवी ,मुंबई येथे संध्याकाळी सात वाजता करण्यात आले.

स्वातंत्र्य लढ्यातील गांधीजींच्या भारत छोडो आंदोलन ह्या विषयावरील नाट्यकृती अतीशय उत्साहवर्धक , चैतन्यपूर्ण, मनोवेधक साकारतांना प्रत्यकक्षदर्शी अनुभवा इतके बोलके क्षण वाटत होते.

नाटकात स्वातंत्र्याचा लढ्यातील,भारत छोडो आंदोलना पुर्वीची पार्श्वभूमी, प्रत्यक्ष आंदोलन घडत असतांना सामाजिक मनस्थितीतील बदल,आणि आंदोलना नंतरचे बदललेले समाजमन अशी तीनही बदलांची संधीछाया हे या नाट्य अनुभुतीचे विशेष आहेत.

तसेच मुंशी प्रेमचंद यांच्या ‘आहुती या कथेचे नाट्य रूपांतर करण्यात आले आहे . नाटकाचे दिग्दर्शन रुपेश पवार यांचे होते .

या नाट्यकृतीचे प्रत्यक्षदर्शीं तुषार गांधी ,महात्मा गांधीजीचे पणतू स्वतः उपस्थित होते. या सादरीकरणा नंतर त्यांनी आपल्या प्रतिक्रियांचा अभिप्राय देतांना म्हणाले, की नाटकातून ‘भारत छोडो’ आंदोलन ही ऐतिहासिक घटना मंचावर बघतांना प्रत्येक पात्र ,प्रसंग अतीशय मनाला भिडणारा अनुभव देत होती ,नव्हे जगतो आहे असा भास होतो आहे.
तसा मी ऐतिहासिक नाटक बघायला गेलो तर डायरी ,पेन नेत असतो .
त्रुटी ,सुचना एक प्रेक्षक म्हणुन करायच्या झाल्यात तर सुचविण्यासाठी.
पण आज हे नाटक बघत असतांना मी एकदम अवाक झालो .सुरूवात, मध्य आणि शेवट यात असा रमलोय की पेन आणि डायरीचा विसर पडला!

या नाटकातील संहिता लेखन आणि नटांची अभिनयसमृध्द कसब या ताकदीवर घडत गेलेले प्रसंग विषयाला पुरतः न्याय्य वाटत राहीलीत.

भारत छोडो ही विचारधारा एक जीवंत अनुभव देवून गेली .अशा थोर कलाकृती फार कमी असतात त्यात ‘अगस्त क्रांती’ आहे.

कस्तुरबा गांधी यांच्या कार्याचे महत्त्व जास्त परिणामकारक मांडण्यात आले, त्यामुळे या लढ्यातील योगदान विशेष आहे.

या अविस्मरणीय ऐतिहासिक नाट्य आविष्कारातील पुर्ण चमूचे खुप मनापासून कौतुक करीत तुषार गांधींनी संपूर्ण चमूला शुभेच्छा दिल्यात.

गांधी परिवारातील कुटुंबीयाकडून ‘अगस्त क्रांती’ या नाट्काच्या सादरीकरणाला एक उत्तम कलाकृती म्हणून संबोधन मिळाले, ही बाब संपूर्ण चमूसाठी एक आशीर्वादाची थाप असून त्यासाठी आमची संपूर्ण चमू सदैव ॠणी राहील अश्‍या शब्दात रुपेश पवार यांनी आभार मानले .

सदर नाट्य निर्मिती प्रक्रियेमध्ये राजाराम शुक्ल ( अध्यक्ष , राष्ट्रभाषा परिवार), सुरेश बाबूजी अग्रवाल ( सचिव , राष्ट्रभाषा परिवार) , अजेय गंपावार , संदीप तुंडूरवार,रवी गुडधे, सुनील पाटील, देशपांडे गुरुजी यांचे मोलाचे सहकार्य लाभले .

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या