फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमगणेश मंदिर टेकडीच्या अध्यक्षांविरुद्ध एफआयआर: महिला कर्मचारीला अश्‍लील शिव्यागीळ

गणेश मंदिर टेकडीच्या अध्यक्षांविरुद्ध एफआयआर: महिला कर्मचारीला अश्‍लील शिव्यागीळ

Advertisements

संस्थेचे कर्मचारी दहशतीत

नागपूर,ता. १४ मे: नागपूरकरांचे आरध्य दैवत असणारे गणेश मंदिर टेकडीच्या संस्थेत गेल्या अनेक महिन्यांपासून अध्यक्ष् व कर्मचारी यांचे संबंध हे अतिशय ताणतनावाचे झाले असून नुकतेच ९ मे रोजी संस्थेचे अध्यक्ष् लखीचंद ढोबळे यांनी तेथील ५५ वर्षीय महिला कर्मचारी रश्‍मी दिवाणजी यांना आई-बहींणींवरुन अश्‍लील शिवीगाळ केली. या विरुद्ध आज गुरुवार दि. १४ मे राेजी तेथील कर्मचा-यांनी सीताबर्डी येथील पोलीस ठाण्यात रितसर तक्रार नाेंदवली.

१४ डिसेंबर २०१९ रोजी लखीचंद ढोबळे हे संस्थेचे अध्यक्ष् स्थानी निवडून आले. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून ते सातत्याने संस्थेच्या कर्मचा-यांशी दूर्व्यवहार करीत असल्याचे येथील कर्मचारी सांगत आहेत. महिला कर्मचा-यांशी देखील त्यांचा व्यवहार हा सौजन्यपूर्ण नसून अतिशय अपमानकारक असल्याचे सांगितले जात आहे. घटनेच्या दिवशी या महिलेने नैवद्यासाठी लागणारे दूध हे जास्त प्रमाणात घेतले असल्याचे कारण सांगून अध्यक्ष् ढोबळे यांनी त्यांना आई-बहीणींवरुन अर्वाच्य शिवीगाळ केली. परिणामी त्या खूप घाबरल्या. दूध देणारा गवळी हा देखील तिथेच उपस्थित होता. अनेक प्रकारचे आरोप लावून ढोबळे यांनी महिलेला कामावर न येण्यास बजावले मात्र १९९७ पासून रश्‍मी दिवाण या मंदिराच्या सेवेकरी आहेत तर २०१२ पासून संस्थेतील कर्मचारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

नुकतेच ढोबळे यांनी लता भोंगाडे या सेवकरी महिलेला अर्वाच्य शिवीगाळ करुन कामावरुन काढून टाकले. आपला उदरनिर्वाह यावरच निर्भर असल्यामुळे रश्‍मी यांनी ढोबळे यांच्या विरोधात तक्रार नोंदवली नाही आणि अपमानाचा घोट गिळून गप्प बसल्या.मात्र यानंतर देखील ढोबळे हे दररोज शिवीगाळ करीत असल्यामुळे तेथील सर्व कर्मचारी मिळून आज सर्वांच्या स्वाक्ष् री निशी सीताबर्डी ठाण्यात ढोबळे यांच्या मानसिक छळाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली.

यापूर्वी देखील १९९५ मध्ये संस्थेचे तत्कालीन सचिव गणपतराव जोशी यांच्यावर ढोबळे यांनी हल्ला केला होता. नाना प्रकारचे आरोप करुन त्यांच्याकडून चाव्या हिसकावून घेतल्या होत्या. एवढेच नव्हे तर स्वत: आपल्या हातावर जखम करुन घेतली होती. ढोबळे हे आधीपासूनच गुन्हेगार प्रवृत्तीचे असल्याचे येथील कर्मचारी सांगतात. अध्यक्ष् पदी असण्यापूर्वी ते संस्थेच्या अकरा विश्‍वसतांपैकी एक होते. त्यावेळी त्यांची वर्तवणूक ही सर्व कमचा-यांशी चांगली असल्याचे सांगितले जात आहे. १९९५ साली ते या पूर्वी देखील संस्थेचे अध्यक्ष् राहीले आहेत. त्यावेळी देखील त्यांनी संस्थेच्या एका कर्मचा-याल लाथ मारली असल्याचे येथील कर्मचारी सांगतात.

एफआयआरमध्ये दाखल केलेल्या आरोपात येथील सर्व महिला कर्मचारी व इतर कर्मचारी या अतिशय मानसिक तनावात काम करीत असल्याचे सांगितले गेले आहे. कर्मचा-यांशी ढोबळे यांचे वर्तन हे माणूसकीला धरुन नसून महिला कर्मचारी यांच्याप्रति अत्यंत असंवेदनशील वर्तन ढोबळे करीत असल्याचा आरोप यात करण्यात आला आहे.

संस्थेत एकूण २२ कर्मचारी असून ७ अस्थायी कर्मचारी आहेत. लॉक डाऊनच्या काळात देखील येथील सर्व कर्मचारी ४-४ तास आळीपाळीने आपापल्या कर्तव्यावर हजर होत आहेत. आपला जीव धोक्यात घालून श्रींच्या सेवेत लिप्त आहेत मात्र नागपूरकांच्या आराध्य दैवतांसमोरच दूधासारख्या शुल्लक कारणावरुन महिलेला अश्‍लाघ्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली,याचे जास्त दू:खं असल्याचे येथील कर्मचारी सांगतात.

विश्‍वस्त कुलकर्णी यांचं राजकारण: लक्ष्मीचंद ढोबळे
२० दिवसांपूर्वीच मी संगणकामधील महत्वाचा डाटा हा डीलीट केल्याने सीताबर्डी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार नोंदवली होती.मात्र अद्याप सीताबर्डी पोलिसांनी कोणत्याही चौकशीला सुरवात केली नाही. माझ्या विरोधात सातत्याने कट कारस्थान रचले जात असून मी अतिशय शिस्तप्रिय माणूस आहे. सध्या भक्तगण नसताना दूधवाल्याकडून चक्क ८ लिटर दूध घेतले जात होते. मंदिराच्या सुरक्ष्ा रक्ष् कासह सर्वच कर्मचारी हे पेले भरुन भरुन दूध पित असल्याची बाब माझ्या कानावर आली होती म्हणून दूधवाल्याला मी सत्य काय आहे हे विचारले. महिला कर्मचारीला जाब विचारणे हे अध्यक्ष् म्हणून माझे कर्तव्य होते,मात्र मी कोणतीही शिवीगाळ केली नाही.माझ्यावरील आरोप हे खोटे आहेत. विश्‍वस्त कुलकर्णी हे या सर्व कट कारस्थानामागे असल्याचा आरोप ढोबळे यांनी खास ‘सत्ताधीश’कडे केला.

याच विश्‍वस्ताने खर्डणवीस नावाच्या भक्तावर दानपेटीतून १० हजार रु.चोरल्याचा आरोप करुन पाेलिसात तक्रार नोंदवली होती.मात्र तो भक्त हा निरपराध होता.पोलीस त्याच्या घरी पोहोचल्यामुळे या धक्क्यातून त्याने आत्महत्या केली.कुळकर्णी यांच्यावर खरे तर खूनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे होता. सध्या लॉक डाऊनमुळे फक्त अर्धा पाव दूधाचे तीर्थ बनत असतं. तर पदाधिकारी व कर्मचारी यांना २ लिटर दूध चहासाठी पुरेसं असताना ८ लिटर दूधाची मौज ही संस्थला परवडणारी नसल्याचे ते म्हणाले.

भक्तच नसल्यामुळे मोजकेच मोदक आम्ही आचारीकडून नैवद्यासाठी बनवून घेतो ते ही सुरक्ष्ा रक्ष् काकडे देऊन रस्त्यावरचे भिकारी यांना वाटून देण्यास सांगितले आहे. हे सर्व विरोधकांचे कारस्थान असून माझा शिस्तप्रिय व स्वच्छ कारभाराविषयी कोषाध्यक्ष्,सचिवांपासून संपूर्ण पदाधिकारी याची साक्ष् देतील.माझ्या विरोधातील कट कारस्थानात सुरक्ष्ा रक्षक ज्योतिष हा संपूर्णपणे सहभागी असल्याचा आरोप ढोबळे यांनी केला.

‘जय जवान जय किसान‘ संघटना करणार तीव्र आंदोलन-
गणेश मंदिर टेकडीच्या संस्थेच्या अध्यक्ष्ांचे एखाद्या महिला कर्मचारीप्रति असे वर्तन अजिबात खपवून घेतले जाणार नाही. येथील कर्मचा-यांनी आमच्या संघटनेकडे त्यांची वेदना नोंदवली आहे. लॉक डाऊनचा काळ संपल्यानंतर आम्ही ढोबळे यांची संपूर्ण चौकशी न्यायालयामार्फत करण्याची मागणी करु.जय जवान जय किसान संघटनेचे संपूर्ण बळ आम्ही संस्थेच्या गरीब,गरजू कर्मचा-यांना न्याय मिळवण्यासाठी राबवू. विश्‍वस्तांनी त्वरीत ढोबळे यांची उचलबांगडी करावी त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडावे.मंदिरात त्यांचा प्रवेश बंद करावा अन्यथा कर्मचा-यांच्या न्यायाची लढाई आमची संघटना ही न्याय मिळेपर्यंत लढणार,असा इशारा’ जय जवान जय किसान’ संघटनेचे अध्यक्ष् प्रशांत पवार यांनी दिला आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या