फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमगणतंत्र दिवस...आंबेडकरी कन्या आणि...क्रोर्याची परिसीमा!

गणतंत्र दिवस…आंबेडकरी कन्या आणि…क्रोर्याची परिसीमा!

Advertisements


२६ वर्षीय करिष्मा कायमची जायबंद:४ थ्या मजल्यावरुन सास-याने ढकलले

पती-पत्नी दोघेही उच्च विद्याभूषित अभियंता

‘सत्ताधीश’ऑन द स्पॉट

डाॅ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता.२६ जानेवारी: गणतंत्र दिवस…क्रांतीसूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी २६ जानेवारी १९५० रोजी सार्वभौम, भारत देशाला संविधान दिले,या संविधानाप्रमाणे भारत देश हा ‘लोकांचा,लोकांसाठी,लोकांद्वारे’तत्वावर चालणारा देश झाला मात्र….संविधान लागू झाल्याच्या ७२ वर्षांनंतर देखील आम्ही थोर अश्‍या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या उदात्त विचारांची उंची गाठू शकलो आहोत का?दूर्देवाने याचे उत्तर ‘नाही’असेच द्यावे लागेल कारण नुकतीच २३ डिसेंबर रोजी सांयकाळी ४ ते ५ वा.च्या दरम्यान एक २६ वर्षीय आंबेडकरी कन्या लग्नाला फक्त ३ महीनेच झाले असताना २० लाखांच्या हुंड्याच्या लोभापायी आंबेडकरी कुटुंबियांद्वारेच इतकी छळल्या गेली की….तिच्या सास-याने चक्क तिला स्वयंपाक खाेलीच्या चाैथ्या माळ्यावरुन खाली ढकलून दिली…..!

(भीमराव तामगाडके)

काहीच महीन्यांपूर्वी आपल्या आईच्या अंगणात हसत खेळत बागडणारी ही संगणक अभियंता मूलगी आज आपल्याच आईच्या घरी एका खोलीत…पाठीचे स्पायनल कॉड्स मोडल्यामुळे कायमची जायंबद होऊन वेदनेने विव्हळत पडली आहे…!तिच्या आईचे अश्रू अविरत वाहत असून सासरे भीमराव तामगाडगे यांच्या या कृत्यावर काळजातून श्राप देत आहेत….!करिष्मा ही फक्त साढे चार वर्षाची असताना तिचे पितृछत्र हरवले.ते पंजाब नॅशनल बँकेत कार्यरत होते.आई हीच तिचे सर्वस्व झाली.‘लॉर्ड बुद्धा’चॅनलमध्ये कार्यरत व्हिडीयोग्राफर इंगळे यांच्याशी करिष्माच्या आईने पुर्नविवाह केला.दुस-या लग्नातून करिष्मा हीला एका जीवाभावची धाकटी बहीण मिळाली मात्र २०१८ साली दुस-या पिताचे पितृछत्र हरवले.

परिणामी आईनेच आपल्या लाडक्या लेकीसाठी चांगल्याश्‍या स्थळाचा शोध सुरु केला.पिंपरी-चिंचवड येथील HumaneBits या साॅफ्टवेअर कंपनीचे साॅफ्टवेअर अभियंता असणा-या साकेत भीमराव तामगाडगे यांचे स्थळ करिष्मा हीच्या आईला पसंद पडले. ऐन करोनाच्या काळात २५ लाेकांच्या उपस्थित मात्र तरीही अतिशय थाटामाटात आपल्या लाडक्या लेकीचे त्यांनी लग्न लावले.जवळपास साढे चार लाख रुपये खर्च केल्याचे त्या सांगतात मात्र आपल्या लेकीच सुखी संसार आता डोळ्यांनी पाहता येणार अशी आशा उराशी बाळगणा-या या मातेचे काळीचच तामगाडके या हुंड्याच्या लोभी दाम्प्तयाने उधवस्त नाही केले तर…या मातेच्या गर्भाचेच अस्तित्वच जणू खुरडून काढले..ऐवढे क्रोर्य ऐन २६ वीत त्या नवपरिणितेच्या वाट्याला लोभी सासरे भीमराव तामगाडके यांच्या लोभामुळे आले.

 

 

(ललिता तामगाडके)

२३ डिसेंबरला सकाळी दहा पासूनच करिष्मा हीची नणद प्राची वासनिक व तिचे यजमान जे पूर्वी एचडीएफसी लाईफ येथे कार्यरत तर नागपूरातच टाटामध्ये सध्या विद्यमान नोकरी करणारे राहूल वासनिक यांनी करिष्माचा मानसिक छळ सुरु केला,असे करिष्माने हुडकेश्‍वर येथील पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये नाेंदवले आहे.राहूल वासनिक हे देखील उच्च शिक्ष्ि त असून मॅनेजरपदावर आहेत.करिष्मा यांच्या आईने लग्नात फक्त सोन्याचा गोफ आणि आंगठी दिली,२० लाखांची कार दिली नाही,एफडी करुन दिली नाही इ.अश्‍या शब्दात तिला सासू ललिता भीमराव तामगाडगे,नणद प्राची व सासरे भीमराव टोमणे मारु लागले.नव-याच्या आठवणीने करिष्माला रडू कोसळले ती स्वत:च्या खोलीत बसून रडू लागली.मात्र तिथे ही तामगाडगे कुटुंबियांनी तिचा जबरदस्त छळवाद मांडला.सायंकाळी ४ वा.नणद प्राची वासनिक हीने चहा करुन आणला मात्र करिष्माने चहा घेण्यास ठामपणे नकार दिला. करिष्मा स्वयंपाक खोलीत आली तिच्या मागे सासरे भीमराव देखील आले व तिला चहा पिण्यास बाध्य करु लागले,ती गॅलरीत येतात सासरे भीमराव यांनी तिला….खाली ढकलू दिले…..!ती जीवाच्या आंकातांने किंचाळली…सिमेंटच्या जमीनीवर कोसळली….शुद्ध हरपून धरणीमायच्या कुशीत विसावली….!

(साकेत तामगाडके)

तामगाडके व वासनिक कुटुंबियांनी तिला मानेवाडा रोडवरील त्यांच्या कौटूंबिक जिव्हाळ्याचे संबंध असणारे डॉ.वैरागडे यांच्या रुग्णालयात दाखल केले व तिथून पसार झाले.आईला निरोप कळताच वा-याच्या वेगाने ही माऊली तिथे पोहोचली,मात्र करिष्माला शुद्धच नव्हती,दुस-या दिवशी मात्र करिष्माने शुद्ध येताच पोलीसांना बयाण दिले…सासरे भीमराव तामगाडगे यांनी तिला स्वयंपाक खोलीच्या गॅलरीतून चौथ्या मजल्यावरुन खाली ढकलले…मग माहिती नाही पुढे काय झाले….?

(प्राची राहूल वासनिक)

डॉ.भीमराव आंबेडकरांनी शतकानुशतके आपल्या दलित,शोषित,पीडीत,माणूसकीला वंचित समाजाला एक संदेश दिला होता ’शिका,संगठीत व्हा,संघर्ष करा’आज त्यांच्याच समाजातील एका सुशिक्ष्ति, उच्च विद्याभूषित अभियंता तरुणाने शिक्ष् णाचा अर्थ फक्त ‘माया जमवणे’असाच घेतला असून…संगठीतपणे एका निरागस २६ वर्षीय तरुणीच्या विरोधात क्रोर्याची परिसीमा गाठून तामगाडगे व वासनिक कुटुंबियांनी करिष्मा गायकवाड हिच्या आईच्या व बहीणीच्या नशीबी रक्ताळलेला ‘संघर्ष’आणला असल्याची साक्ष् ही घटना देत आहे…. आणि…आपण आज ही अभिमानाने संविधान देशाला लागू झाला तो गणतंत्र दिन फार दिमाखात साजरा करीत आहोत.स्वातंत्र्यांच्या ७५ वर्षानंतर देखील आपण…अद्याप १२ शतकातील बुरसटलेल्या श्रेष्ठ-कनिष्ठत्वाच्या मानसिकतेतच जगत आहोत….पंलगावर वेदनेने अक्ष् रश:विव्हळ पडलेली करिष्मा…याचीच साक्ष् देत नाही का?

[राहूल वासनिक]

घटना २३ डिसेंबरला पंचनामा गणतंत्र दिनी!
माणूसकीला काळीमा फासणारी ही घटना २३ डिसेंबर रोजी घडली असताना हुडकेश्‍वर पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी पारधी यांनी आज २६ जानेवारी गणतंत्र दिनी घटनास्थळाचा पंचनामा केल्याची माहिती ‘सत्ताधीश’ला मिळाली!घटना घडताच तामगाडगे कुटुंबिय व वासनिक दाम्प्तय पोलीसांच्या लेखी ‘फरार’होते, मात्र अटकपूर्व जामिन मिळताच पारधी यांनी आज पंचनामा करताना आरोपी प्राची वासनिक हिचे सासरे जे पंचानाम्यासाठी उपस्थित होते त्यांना अनाहूत सल्ला दिला…..‘आता तुम्ही घरी राहयला येऊ शकता!’
गणतंत्र दिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची भ्रष्ट शासकीय व्यवस्था आणखी किती क्रूर थट्टा करु शकते याचे आणखी एक उदाहरण म्हणजे घटना २३ डिसेंबर रोजी घडली,एफआयआर २६ डिसेंबर रोजी हुडकेश्‍वर पोलीस ठाण्यात नोंदवल्या गेली मात्र सासू ललिता तामगाडगे,नणद प्राची व नणदेचा नवरा राहूल वासनिक यांनी २३ डिसेंबर रोजीच जामिनासाठी अर्ज सादर केला व त्यांना आता जामिनही मंजूर झाला तर सासरे यांना सात दिवसांचा अंतरिम जामीन २१ जानेवारी रोजी मिळाला ज्याची मुदत उद्या २७ जानेवारी रोजी संपत आहे.
आरोपी सास-याला अटकपूर्व जामिन मिळवण्यास भ्रष्ट सरकारी नोकरांनी कोणतीही कसूर ठेवली नसल्याचा आक्रांत करिष्माच्या आईने आज मांडला.कोर्टा पुढे सादर केलेल्या कागदपत्रात अनेक महत्वाचे मुद्दे गाळण्यात आले….करिष्माला ढकलले नाही तर तिला उडी घेताना एका साक्ष्ीदाराने पाहीले….डॉ.वैरागडे यांचा वैद्यकीय अहवाल तसेच वैडागडे यांनी काँग्रेस नगर येथील ज्या ब्हीवीजी सीटी स्कॅन मधून अहवाल दिला त्या अहवालात सांगण्यात आले..करिष्माच्या मेंदूला कोणतीही दुखापत झाली नसल्याने ती नॉर्मल आहे…..!कोर्टापुढे जी कागदपत्रे आलीत त्या आधारावर आरोपी सास-याला अटक पूर्व जामिन मिळणे अपरिहार्यच होते मात्र तरीही सत्र न्यायालयाचे न्यायमूती रोहीत देव यांनी पोलीसांच्या तपास कार्यावर शेरा ओढत हुडकेश्‍वर पोलीस ठाण्यातील पीएसआय पंकज लहाने यांना पंचनामा रेकॉर्ड सादर नाही केला,गॅलरीला रेलिंग होती का?किती फूटांची होती?या सर्व बाबींसाठी झापले व तात्पुरती ७ दिवसांची बेल आरोपी सासरे भीमराव तामगाडगे यांना मंजूर केली.कोर्टाच्या दणक्यानंतर आज गणतंत्र दिनी प्रीती वासनिक यांचे सासरे व करिष्मा यांच्या आईला पंचनाम्यासाठी शारदा कॉम्पलेक्स,प्लाट नं १३, गजानन नगर, म्हाळगी नगर चौक येथे करिष्माच्या सासरी पंचनाम्यासाठी हूडकेश्‍वर पोलीसांकरवी बोलावण्यात आले….!

या संवैधानिक राष्ट्रात शासकीय कारभार अश्‍याचप्रमाणे चालत असला तरी आपल्या समाजातील भ्रष्ट कारभार केवळ येथेच थांबत नाही तर….डॉ.वैरागडे व काँग्रेस नगरच्या ब्हीवीजी सीटी स्कॅनने करिष्माचा ‘मॅनेज ’केलेला वैद्यकीय ‘नॉर्मल’असल्याचा अहवाल हा देखील एका आईचे काळीज पोखरणारा व तेवढाच धक्कादायक दस्तावेज आहे. सात दिवस करिष्माला डॉ.वैरागडे यांनी सुटी देण्यास सातत्याने नकार दिला मात्र तिची एकंदरीत प्रकृती बघता तिला पंचशील चौकातील केअर रुग्णालयात तिच्या कुटुंबियांनी दाखल केले….आणि या रुग्णालयाने तिच्या सीटी स्कॅनचा दिलेला अहवाल हा देखील तेव्हढाच धक्कादायक आहे….!केअरने दिलेल्या अहवालात तिच्या मणक्याचे हाड हे पूर्णपणे मोडले असून….तिची प्रकृती गंभीर असल्याचे नमूद केले अाहे…!आज करिष्मावर केअरचे डॉ.बोरकर हे जर्जर तुटलेल्या हाडांवर,डॉ. नाकाडे हे पाठीच्या मणक्याजवळील काळ्या पडलेल्या त्वचेवर तर डॉ. सांघावी हे तिच्या स्पायनल कॉड्सवर उपचार करीत आहेत….!

उपचारासाठी जेव्हा करिष्माला तिच्या खोलीतून स्ट्रेचरवर झोपवल्या जातं व केअर रुग्णालयात आणल्या जातं…तेव्हा ती जिवाच्या आंकाताने ओरडते…..!ती वेदना असहनीय असते…केअरमध्ये आता पर्यंत दोन शस्त्रक्रिया झाल्या असून तीन महिन्यांनी तिसरी शस्त्रक्रिया करणार असल्याचे हे तज्ज्ञ डॉक्टर्स सांगतात.सध्या तिची प्रकृती अतिशय नाजूक असून….काहीही सांगता येत नसल्याचे तिच्या कुटुबियांना सांगण्यात आले..एकाच पेशातले डॉक्टर्स मात्र….????डॉ.वैरागडे आणि केअरच्या वैद्यकीय अहवालात मात्र किती तफावत???
घटनेच्या दुस-या दिवशी करिष्माचा आयुष्याचा जोडीदार साकेत यानी डॉ.वैरागडेकडे बहीण जावई राहूल रुपचंद वासनिक याच्यासोबत करिष्माची भेट घेतली.आयसीयूमध्ये येऊन या नवपरिणीतेला एखाद्या पतीने काय म्हणावे?तर…पोलीस तक्रार मागे घे…सांग…कपडे वाळवताना खाली पडले….मी तूला पुण्याला सोबत घेऊन जाईल…!

ज्या जोडीदाराकडे बघून विश्‍वासाने आईचा उंबरठा जिने ओलांडला त्याने लग्न होताच तिला सांगितले…मी लग्न केले फक्त आई-वडीलांना सून हवी होती म्हणून..तूला येथेच राहवे लागणार त्यांची सेवा करीत…तूला मी पुण्याला सोबत घेऊन जाणार नाही…..आणि..खरंच तो त्या नवपरिणीतेला जिचे हळवे,सोनेरी स्वप्ने निष्ठरतेने तुडवित…प्रणयाचे,सुखाचे क्ष् ण सोबत न घालवताच…तो निष्ठूरतेने तिला झिडकारुन पुण्यात निघून गेला….!आज ‘सत्ताधीश‘ने तिच्याशी संवाद साधला असता….अश्‍याही जिवघेण्या वेदनेत तिने कबूल केले…तो…फार सुंदर आहे…माझे खूप प्रेम होते त्याच्यावर…पण?या वेडीला देहाच्या सुंदरते मागे दडलेली क्रूरता दिसलीच नाही…!

भाजपच्या नगरसेविकेचे माणूसकीला काळीमा फासणारे वर्तन!
तामगाडके कुटुंबियांच्या विरोधात तक्रार दाखल होताच यात भाजपच्या एका नगरसेविकेने लागलीच उडी घेत करिष्माच्या आईची भेट घेतली.आपली संगठना ही पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभी राहील…करिष्माला न्याय मिळून देईल….असे आश्‍वासन दिले…करिष्माच्या आईच्या जळत्या-तळमळत्या मनाला थोडी उभारी मिळाली…खचलेल्या मनाला धीर आला.त्या नगरसेविकेने संगठनेच्या महिलांसोबत दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निवेदन आयुक्त अमितेश कूमार यांना साेपवले…वृत्तपत्रात फोटे ही छापून आणले……..आणि?
त्या माऊलीला घास..गिळताच आला नाही!

रुग्णालयात भरती असताना करिष्माला दोन घास चारल्यानंतर स्वत:च्या जेवणासाठी त्या माऊलीने डबा उघडलाच होता की भाजपच्या त्या नगरसेविकेचा फोन त्याच वेळी खणाणला….आमचे काम येथपर्यंतच होते..या पुढे आता आम्ही तुम्हाला कोणतीही साथ देऊ शकणार नाही….!हे शब्द कानी पडताच हातातला घास खाली पडला…घश्‍याला कोरड पडली…डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागल्या….!काहीच कळत नव्हते अचानक असे काय झाले की शेवटपर्यंत न्यायाच्या या लढाईत साथ देण्याचे आश्‍वासन देणा-या भाजपच्या या नगरसेविकेने अचानक असा पवित्रा बदलला?तामगाडगे कुटुंबियांनी पैश्‍यांची थैली तर नाही ओतली?असा विचार येताच लढण्याची संपूर्ण हिंमत ही माऊली हरली…..!
आज ‘सत्ताधीश’जवळ बोलताना करिष्माच्या आईचे हेच शब्द होते…ताई..कोणाकाेणाशी लढू..तुम्हीच सांगा?पोलीस,डॉक्टर,संघटना……!कोणावर विश्‍वास ठेऊ?वैरागडे रुग्णालयात भर्ती असताना राहूल वासनिक याने करिष्माला आयसीयूत हेच धमकावले होते…हुडकेश्‍वर पोलीस माझ्या खिशात आहे….!हे संभाषण देखील करिष्माच्या आईने ‘सत्ताधीश’ला ऐकवले….!

करिष्माला चौथ्या माळ्यावरुन सास-याने ढकलून दिल्याच्या बातमीची सर्वच वृत्तपत्रांनी लहानशी का असेना दखल घेतली मात्र पोलीस ठाण्यातून पत्रकारांना मिळणारी एफआयआरची कॉपी आणि त्या कॉपीमध्ये नमूद केलेली काही ठराविक अक्ष् रे या पलीकडेही एक मानवी जिवंत संवेदना असते…ठसठसणारी…२६ वर्षीय करिष्माचे संपूर्ण आयुष्यच आता कदाचित बिछान्यावरच जाईल..किवा…..काही अघटीत देखील घडू शकतं…तिचे स्वप्न..तिच्या ईच्छा..तिची प्रेमाची भूक…तिचे तारुण्य..तिची नैसर्गिक तृप्तीची गरज….या संवेदनांचा कुठेही उल्लेख एफआयआरच्या कॉपीमध्ये नसतो…तो एफआयआर लिहीणा-याच्या मानवी संवदनेच असायला हवा असतो..मात्र असे घडत नाही कारण….या देशातील काही शासकीय नोकर डॉ.बाबासाहेबांचे गणतंत्र मानीत नसून भष्ट्रतंत्रावरच चालणारे असतात…आणखी कोणी नाही तरी….बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून घेणारे यांनी तरी पैश्‍यांच्या लोभापायी माणूसकीला काळीमा फासणारे असे वर्तन करु नये…एवढीच रास्त अपेक्ष्ा आहे…करिष्मा आणि साकेत भीमराव तामगाडके यांच्या लग्न पत्रिकेत भगवान गौतम बुद्धाचे सुंदर छायाचित्र आहे….ज्या गौतम बुद्धांनी जगाला धम्म दिला…अपार करुणा दिली…भूतदया दिली….साकेत सारख्या उच्च विद्या भूषित तरुणाने त्या भगवान बुद्धांच्या करुणेला ही बट्टा लावण्याचेच कृत्य केले…असेच आता म्हणावे लागेल.

‘सत्ताधीश’च्या वाचकांना विनंती-
करिष्माची आई ही मानकिस,भावनिक,आर्थिकरित्या पूर्णपणे कोलमडली असून आपल्या तरुण मुलीच्या भयाण वेदना त्यांना सहन होत नाही,तरी देखील समाज म्हणून आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे,या कठीण समयी त्यांच्या मागे भक्कमपणे उभे राहण्याची.त्यांचा भ्रमण संवादक क्रमांक ९९२२२०२३५५ हा असून जी काही मदत शक्य आहे,माणूसकीच्या नात्यातून करावी,ही कळकळीची विनंती)

(अस्वीकरण-
उपरोक्त बातमीत अनेकांची नावे अधोरेखित झाली असून ‘सत्ताधीश’ने प्राप्त व उपलब्ध कागदोपत्री पुराव्यांच्या अाधारावर ती प्रस्तुत केली आहे. या मागे कोणाच्याही बदनामीचा हेतू नसून तथ्य मांडणे,एवढाच हेतू अाहे. ज्यांना या बातमीबाबत त्यांची बाजू मांडायची आहे त्यांनी देखील ‘सत्ताधीश’ला संपर्क करावा,त्यांची देखील बाजू ‘सत्ताधीश’प्रसिद्ध करेल.)

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या