फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजगडकरी यांच्या प्रचार रॅलीत शालेय विद्यार्थी!

गडकरी यांच्या प्रचार रॅलीत शालेय विद्यार्थी!

Advertisements

उमेदवार ॲड. चव्हाण यांनी केली आचार संहितेच्या भंगाची तक्रार

नागपूर,ता.१ एप्रिल २०२४: लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने सध्या प्रचाराचे जोरदार प्रदर्शन होत असून विविध पक्षांच्या उमेदवारांकडून विविध भागात प्रचार रॅली काढल्या जात आहे मात्र,केंद्रिय मंत्री व नागपूरचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीमध्ये शालेय विद्यार्थ्याचा वापर करण्यात आल्याने ,या विरोधात अपक्ष उमेदवार ॲड.संतोष चव्हाण यांनी आदर्श आचार संहिता भंगाची तक्रार सी-विजिल आयडीवर नोंदवली तसेच या तक्रारीची दखल घेतली गेली असल्याचा संदेश त्यांना मोबाईलवर प्राप्त झाला.

आज सोमवार दिनांक १ एप्रिल रोजी वैशाली उद्यानाजवळून गडकरी यांची भव्य प्रचार रॅली काढण्यात आली.रॅलीत भाजपचे नेते तसेच कार्यकर्ते यांच्यासोबतच गडकरी यांच्या स्वागतासाठी शाळेच्या संचालकांनी शिक्षक तसेच विद्यार्थी यांच्या हातात फलक देऊन भर रस्त्यात उन्हात त्यांना उभे केले.या प्रचार रॅलीत सहभागी झालेल्या दुचाकीस्वार समर्थकांनी कायद्याची धज्जीया उडवून विना हेलमेट गाड्या चालवल्या.रॅली मार्गावरील विविध चौकात कर्तव्यावर उपस्थितीत वाहतूक पोलिसांनी नियम मोडणा-या गडकरींच्या समर्थकांवर कोणतीही कारवाई केली नाही व फक्त बघ्याची भूमिका स्वीकारली.

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी निवडणूक कार्यक्रम १६ मार्च रोजी घोषित केला.त्या दिवसापासून देशात तसेच नागपूर शहरातही आदर्श आचार संहिता लागू झाली आहे.यात विविध सूचनांसह प्रचारासाठी लहान मुलांचा वापर करण्यावर बंदी आहे.मात्र,गडकरी यांच्या समर्थनासाठी चक्क शालेय मुलांना वेठीस धरुन त्यांना भर उन्हात रस्त्यावर उभे करण्याचा प्रताप शाळेच्या संचालकांनी केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

स्थानिक नागरिकांनीही निवडणूक प्रचारात अश्‍या रितीने शालेय विद्यार्थ्यांचा उपयोग केल्यामुळे संबंधित शालेच्या संचालकांच्या तसेच व्यवस्थापकांच्या विरोधात फौजदारी गुन्हे नोंदविण्याची मागणी केली आहे.आदर्श आचार संहितेचा भंग केल्यास फौजदारी गुन्हे दाखल केले जातात.

(छायाचित्र :ॲड.संतोष चव्हाण यांची तक्रार)

निवडणूक आयोगाने या घटनेचे सज्ञान घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.नागपूरातून लोकसभेची निवडणूक लढणारे अपक्ष उमेदवार ज्यांचे निवडणूक चिन्हच ‘पाटी’आहे त्यांनी या घटनेची दखल घेऊन, निवडणूक आयोगाने तक्रारीसाठी दिलेल्या सी-विजिल आईडीवर या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
…………………..

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या