
लैंगिक शोषणाला प्रोत्साहन देण्यासाठीच संस्थेला करतात आहेत हद्दपार
बाबा ताजुद्दीन ट्रस्टचा नवनियुक्त पदाधिकारी गडकरी यांचा ‘बोेलता पोपट’
‘ऑक्सीजन मॅन’ने कोंडला महिलेचा श्वास!
मोक्याच्या जागेवर कोणाचा डोळा?खोट्या गुन्ह्यात फसवून दिला जातोय मानसिक त्रास
‘
मंत्री मिडीयाने’बाजू न ऐकताच छापले आत्मसन्मान दुखावणारे वृत्त!
‘
फरारी‘ असते तर पत्र परिषदेत कशी आली असते?रुबिना पटेल यांचा माध्यमांनाच सवाल
नागपूर,ता.१७ फेब्रुवारी २०२२: बारा वर्षापूर्वी २००० मध्ये हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टच्या जागेतच मुस्लिम महिलांसाठी सामाजिक उपक्रम राबवणारी रुबी सोशल वेलफेअर सोसायटीचे काम सुरु झाले.या संस्थेने मुस्लिम समुदायातील महिलांचे सामाजिक,भावनिक,मानसिक,शारिरिक व आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी आजपर्यंत खूप भरीव काम केले मात्र अचानक या ट्रस्टचे पदाधिकारी बदलले जातात,एका मोठ्या केंद्रिय मंत्र्याचा ‘बोलता पोपट’या पदावर बसवला जातो,त्याच्या करवी ही संस्था ताबडतोब खाली करण्याचे फरमान काढले जाते,फोानवर धमक्या दिल्या जातात,एका शाळेची ही पडकी जागा होती,पडकी जागा असल्यानेच येथील शाळा दूसरीकडे शिफ्ट करण्यात आली,त्या पडक्या शाळेला रंगरंगोटी करुन राहण्यायोग्य केले.दहा खोल्यांच्या त्या इमारतीला माणसांच्या राहण्याजोगे बनवले.निराधार महिला,मुली व वृद्धांचे ते हक्काचे आश्रयस्थान बनले,सुप्रसिद्ध धार्मिक स्थळ असल्याने या ठिकाणी अनेक विमनस्क अल्पवयीन मुली,निराधार महिला आश्रय घेत होत्या,आजूबाजूला झोपडपट्टी असल्याने रात्री अपरात्री अवांछित तत्व त्यांचे लैंगिक शोषण करीत होते,मी स्वत: १३ वर्षाच्या मुलीला शासकीय बाल सुधारगृहात सोडून आले,रुबी सोसायटीचे काम जेव्हापासून या भागात सुरु झाले,महिलांच्या अश्या लैंगिक शोषणाला आळा बसला,दिवस रात्र आमचा पहारा असतो मात्र या ट्रस्टचे पदाधिकारी बदलताच आमच्या संस्थेला जागा सोडून निघून जाण्याचे फरमान देण्यात आले,ही संस्था येथून हालवून पुन्हा या ठिकाणी महिला व बालके यांच्या लैंगिक शोषणाला ताजुद्दीन बाबा ट्रस्टला प्रोत्साहन द्यायचे आहे का?असा जळजळीत प्रश्न रुबी सोशल वेलफेयर सोसायटीच्या संचालिका व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता रुबिना पटेल यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत केला.
याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले,की करोनाच्या काळात आमच्या संस्थेने जीवावर उदार होऊन मुस्लिम समुदायासाठी काम केले.आरोग्यविषयक बाबींचा पाठपुरावा केला,शासनाच्या मदतीने सर्व्हे केला,मदत पोहोचवली,जनआरोग्य विभागाच्या सोबतीने काम केले,जिल्हाधिकारी यांच्यासोबत करोनाकाळातील त्रासदी नियंत्रणात आणण्यासाठीच्या बैठकांमध्ये सहभाग नोंदवला,करोना कुटूंब पुर्नवसन समितीची स्थापना याच काळात महाराष्ट्राच्या १९९ संस्था मिळून झाली,या संस्थेची प्रकल्प अधिकारी म्हणून देखील सर्व शासकीय कागदपत्रांचा पाठपुरावा करण्याची जवाबदारी माझ्यावर आली,कराेनाचा कहर हा किती जीवघेणा होता हे संपूर्ण जगानेच अनुभवले आहे,अनेक महिला या विधवा झाल्या,एकल करोना नियोजन समितीच्या माध्यमातून ८० ते ९० ऑन लाईन फॉर्म त्यांना मदत मिळवून देण्यासाठी भरुन घेतले,महाराष्ट्र शासनाला पाठवले,या विभागाच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील शासनाच्या या समितीत काम करण्याची संधी उपलब्ध करुन दिली,कराेनासंबंधीच्या अश्याच स्वरुपाच्या कामाबाबत एका घरातून करोनाबाधित असल्याची माहिती मिळाली.त्या घरी गेली असता मला बघून तेथील घरमालकीण खूप घाबरली,तीन चार लोक माझ्या व्हिडीयाे काढू लागले,हे असे का करतात आहे?मला याचा उलगडाच झाला नाही,मी त्यांना म्हणाले,घाबरु नका,तुम्हाला सहकार्य नाही करायचे असेल तर नका करु,त्या घर मालकीणीच्या भाडेकरु या करोनाबाधित होत्या मात्र त्या घरमालकीणीचा व्यवहार बघता आम्ही तिथून निघून आलो.
यानंतर कळले की त्या घरमालकीणीने या भागातील कुख्यात डॉन आबू याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे व मला त्या अबू गँगशी जुळलेल्या समजत होत्या.
अबू डॉनसोबत माझा कोणताही संबंध नाही मात्र करोना काळात अन्नदान किवा तत्सम सामाजिक कार्याच्या संदर्भात फक्त सहयोग लाभला होता.ही घटना गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्याची आहे.
यानंतर अचानक माझ्या विरोधात नंदनवन पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली,एवढंच नव्हे तर माध्यमांना ती पुरवण्यात आली.मी आबू गँगची गुर्गी असून मी अबू विरोधात तक्रार करणा-याला महिलेला धमकावले व तसे करताना मी व्हिडीयोमध्ये दिसत असल्याचा दावा करण्यात आला मात्र त्या वेळी मीच त्या घरमालकीणीला ओळखत नव्हते तर धमकावण्याचा प्रश्नच कसा निर्माण होतो की मी तिला अबू विरुद्धची तक्रार मागे घेण्यासाठी धमकावले?असा प्रश्न रुबिना यांनी याप्रसंगी उपस्थित केला.
हे वृत्त छापून येताच माझ्या स्वाभिमानाच्या चिंधड्या झाल्या.मला मानसिक धक्का बसला,एका दैनिकाने तर मला आजच्याच वृत्तात मी ‘फरार’असल्याचेही छापून टाकले.एका वृत्त वाहिन्याने ’खुद को समाजसेवी बतानेवाली महिला झूठी एनएमसी की कर्मचारी बताते हुये आबू खान व उसके परिवार के खिलाफ की गई शिकायत वापस ले,वापस ना लेने पर जान से मारने की धमकी दी’असे वृत्त चालवले.एका हिंदी दैनिकाने मला ’आबू की गुर्गी‘सुद्धा ठरवून टाकले आणि हे सर्व माझ्या आत्मसन्माला ठेच पोहोचवणारे होते.माध्यमांनी माझ्याशी कोणताही संवाद न साधला एकतर्फी वृत्त प्रसिद्ध करुन माझ्या सामाजिक प्रतिष्ठेला मलीन केले.यामुळे माझा रक्तदाब वाढला,माझी तब्येत बिघडली यामुळेच मी मंगळवार दि.१५ फेब्रुवारी रोजी नियोजित पत्र परिषद ही नाही घेऊ शकले.
२९ ऑगस्ट रोजी करोना संबधी कोणाच्या घरी गेल्याने मी गुन्हेगार ठरते का?नागपूर महानगरपालिकेसोबत जुळून करोनासंबधीचे आरोग्य विषयक उपक्रम पार पाडताना मी मनपाची कर्मचारी आहे,असा दावा मी कधी केला?मी स्वत: पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे गेले व त्या तथाकथित व्हिडीयोमध्ये माझा एक-एक शब्द ऐकून घ्या अशी विनंती केली,त्यात धमकीचा एक जरी शब्द ऐकू आला तर नक्की मला तुरुंगात टाका,अशी विनंती केली मात्र आयुक्तांनी माझे काहीही ऐकून न घेता मला अतिशय वाईट पद्धतीने हाकलून लावले!एवढंच नव्हे तर महीला पोलिस अधिकारीसोबत देखील बोलू दिले नसल्याचे रुबिना पटेल यांनी सांगितले.
या शहरातील ‘मंत्री मिडीया’ किवा इतर शासकीय व्यवस्था अखेर कोणत्या मंत्र्यांच्या दवाबाखाली काम करतात?‘असा उद्विग्न सवाल त्यांनी केला.माझी संस्था ही ७ लोकांची संस्था आहे त्यांना एका रात्रीत जागा रिकामी करुन हवी तो निर्णय मी एकटी कसा घेऊ शकते?एक वर्षापूर्वी आमच्या संस्थेला दिलेल्या जागेबाबत, ट्रस्टसोबतचा करारा संपला आहे हे जरी मान्य केले तरी पर्यायी जागेचा शोध घेण्यासाठी,वृद्धाश्रम,असहाय महिलांना हलवण्यासाठी एवढ्या मोठ्या जागेची व्यवस्था तर करावी लागेल ना?आम्ही आमच्या वकीलांचा सल्ला घेतला व ट्रस्टच्या या निर्णयाविरुद्ध न्यायालयात दाद मागितली,सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट अाहे,मात्र मंत्र्यांच्या त्या पदाधिका-याला आम्हाला हाकलण्याची एवढी घाई झाली की आमचे शौचालय बंद केले,गच्चीवर कुलूप ठोकले,दहा पैकी ४ खोल्यांमध्ये मनपाचे वंदे मातरम हेल्थ पोस्ट सुरु केले त्याचे भाडे देखील मला भरण्यास सांगण्यात आले,धमकीचे फोन येतात,ट्रस्टी प्यारे खान हा मला ’तू मनपा में कसे गई?तेरा इलाज करना पडेगा’अश्या शब्दात धमक्या देतो.
ताजुद्दीन बाबा ट्रस्टमध्ये इतर संस्था राहू शकत नाही,असे प्यारेखान सांगतो त्यावेळी मी माझ्या संस्थेचे नाव बदलून रुबी सोसायटी ऐवजी ’ताज आशियाना’ठेवते पण निराधार मुस्लिम महिलांसाठी हा आशियाना उधवस्त करु नका अशी देखील विनंती प्यारे खान यांना केली मात्र त्यांना साम,दाम,दंड,भेद नीतीचा वापर करुन संस्थेची जागा ताब्यात घ्यायची आहे.आम्ही न्यायालयात गेल्याने आता खोट्या एफआयआरद्वारे बदनामीचा कट रचला जातोय.आम्ही जागेच्या भाडेचे धनादेश देतो तर प्यारे खान धनादेश फेकून देतो.
खरे तर भारतीय जनता पक्षाला मुस्लिम समुदायाचा जनाधाराच नाही, अश्यात करोना काळात अचानक प्यारे खान हा ’ऑक्सीजन मॅन’म्हणून प्रसिद्धीस अाला आणि केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी प्यारे खान यांना गळाला लाऊन ताजुद्दीन बाबा ट्रस्टच्या प्रमुख पदी बसवले.या ऑक्सीजन मॅननीच आता समाजासाठी चांगलं काम करणा-या एका मुस्लिम महिलेचाच श्वास कोंडला..गडकरी यांना सूतगिरणी,शामबाग झोपडपट्टीच्या जागेवर मोठा प्रकल्प राबवायचा आहे मात्र माझी रुबी सोसायटी ही मधोमध ठाण मांडून असल्याने त्यांच्यासाठी खूप मोठी अडचण निर्माण झाली आहे.यासाठीच आता सात महिन्यापूर्वीच्या एका तथाकथित व्हिडीयोचा आधार घेऊन बदनामीचा घाट घातला जात असल्याचा आरोप रुबिना पटेल यांनी केला.या विषयावर मदत मागायला गडकरी यांच्याकडे गेले असता,जो प्यारे खान बोल रहा है,वही करना पडेगा,असे ते म्हणाले.यावर मी माझ्या निराधार महिला,वृद्ध लोकांना घेऊन कुठे जाऊ?असे विचारले असता,आपकी मर्जी है किधर भी जाओ,हम क्या कर सकते है तुम्हारे लिये?प्यारे खान जो बोलता है वो ही करना पडेगा’असे उत्तर गडकरींनी दिले असल्याची माहिती याप्रसंगी रुबिना पटेल यांनी दिली.
दूसरीकडे प्यारे खान जागा खाली करण्यासाठी धमक्या देतो.नंदनवन पोलिसाचे तत्कालीन पोलिस निरीक्षक यांना सात महिन्यांपूर्वीच्या घटनेवर एफआयआर दाखल होऊ शकते का?असे विचारले असता पोलिस निरीक्षक मा.शेख यांनी व्हिडीयोच्या आधारावर कारवाई होऊ शकत नसल्याचे सांगितले होते मात्र विद्यमान पोलिस निरीक्षकानी नगराळे यांनी तर ना केवळ एफआयआर दाखल केली तर एका लोकल वाहिनीवर माझ्या विराेधात बदनामीकारक गरळ ही ओकली!
प्यारे खानची माणसे तेच सर्व फूटेज व वृत्तपत्रातील बातम्यांचे फोटो व्हाॅट्स ॲपवर आमच्या कार्यकर्त्यांना लार्ज करुन पाठवत असून आमची टिंगल उडवली जात आहे.केंद्रिय मंत्र्यांच्या दवाबात येऊन सतत मानहानि केली जात आहे,सतत बदनामी होत असल्यानेच मी आज पत्र परिषद घेण्याचे ठरवले.तुम्ही प्यारे खानविरुद्ध धमकीबाबत एफआयअार का नोंदवत नाही?असे विचारले असता मला कोणत्याही वादात पडायचे नाही मला फक्त माझी व माझ्या संस्थेची प्रसार-प्रचार माध्यमांना हाताशी धरुन चाललेली बदनामी थांबवायची असल्यानेच मी पत्र परिषद घेतली असल्याचे रुबिना यांनी सांगितले.

धमकी देनेवाले हम होते कौन?प्यारे खान(हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे अध्यक्ष)
या संपूर्ण आरोपाबाबत ‘सत्ताधीश’ने प्यारे खान यांच्याशी संवाद साधला असता,धमकी देनेवाले हम होते कौन?असा सवाल त्यांनी केला.जमीन हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टची आहे.आम्ही येथील नोकर आहोत.आम्ही मालक नाही.आमची नेमणूक न्यायालयाने केली,चॅरिटी कमिशनने केली आहे.आम्हाला ट्रस्ट्रच्या जागेची देखभाल करायची काम आहे.रुबिना पटेल यांच्यासोबतचा ट्रस्टचा करार दीड वर्षांपूर्वीच संपुष्टात आला आहे.गेल्या दोन वर्षांपासून त्या जागचे दहा हजार रुपये प्रति महिना भाडे देखील देत नाहीत.एका कुख्यात गुंडाच्या विराेधात तक्रार देणा-या महिलेलाच पटेल यांनी धमकी देण्याचा प्रयत्न केला.माझा तर स्वत:चा व्यवसाय आहे.माझ्याच कंपनीकडून मी पटेल यांना ५० लाख रुपयांची देणगी सीएसआर फंडातून त्यांच्या सामाजिक कार्यासाठी देण्याची ऑफर देऊ शकतो,त्या पैश्यातून त्यांनी चांगले काम करुन दाखवावे,पण हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट अंतर्गत सुरु असणा-या प्रकल्पात इतर दूसरी संस्था काम करु शकत नाही.लिहून देतो, त्यांनी आमच्या सोबत जुळावे.आमच्यासोबत आल्यास त्यांना मिळणारा शासकीय फंड बंद होऊन जाईल.त्यामुळेच त्यांचा विरोध आहे.ट्रस्टच्या ६-७ हजार चौ.मी.जागेवर त्यांनी आलिशान बगिचा निर्माण केला,स्वत:च्या राहण्याची व्यवस्था करुन घेतली.ट्रस्टसोबत करार संपला असल्याने त्यांना ही जागा रिकामी करावीच लागेल.करारात हेच नमूद आहे ट्रस्टला जेव्ही ही गरज पडेल त्यांची संस्था १५ दिवसात ट्रस्टची जागा रिकामी करुन देईल,ते तर न्यायालयात गेले.त्यांच्या संस्थेसाठी दूसरीकडे त्यांना ब्लॉक घेऊन देतो मात्र ट्रस्टच्या जागेवर कब्जा करु देणार नाही.आम्हाला याचे उत्तर द्यावे लागणार आहे.
धार्मिक स्थळी होणा-या लैंगिक शोषणाविषयी विचारले असता,आमचा विरोध संस्थेला नाहीच आहे.त्यांनी तर चांगल्या कामासाठी चार-पाच संस्था आणखी मदतीला घ्यावी आणि आम्हाला गरीबांची झोपडपट्टी तोडायची आहे हा जो आरोप आहे ही अफवाह असून‘बस्ती तोडकर गरीबो को कहां भेजेंगे?’असा प्रतिप्रश्न प्यारे खानच करतात.या ठिकाणचे क्रिमिनल के घर टूट गये इनको ज्यादा तकलीफ हो रही है,राहीला प्रश्न खोटी तक्रार दिल्याबद्दलची तर ज्यांनी एफआयआर नोंदवली त्यांचा बँड वाजवा ना्!मी तर तक्रार नाही नोंदवली?तीनशे लोकांसमोर मी बोललो मी पैसे देतो समाजकार्यासाठी,पण त्या ऐकत नाहीत त्यासाठीच फोनवर बोललो’इलाज कराना पडता है’.
रुबी सोसायटीचे शौचालय,गच्चीवर कूलूप ठोकले,याबाबत विचारणा केली असता,शासानाचे वंदे मातरम हेल्थ पोस्ट येथे उघडले असून त्या चार खोल्यांमध्ये डॉक्टर राहतात,या ठिकाणी चार शौचालय आहेत पण मॅडम डॉक्टरांनाच अडवते.त्यांनाच सांगते जागा खाली करा!महिलांना त्रास होतो आहे तर दोन लाख रुपये देतो,४ शौचालय बांधून घ्या पण हेल्थ पोस्ट आणि डॉक्टरांना तिथून हटू देणार नाही.

सहा महिन्यांनी एफआयआर नोंदवली जाऊ शकते का?ज्वाला धोटे यांचा सवाल
सहा महिन्यांपूर्वीचे गडे मुर्दे उखडून एखाद्या महिलेच्या विरोधात एफआयआर नोंदवली जाऊ शकते का?पहीले तर माझा हा सवाल आहे.कोणत्याही महिलेचं फक्त राजकीय सूड घेण्यासाठी चारित्र्यहनन होता कामा नये.कोण तो आबु गुंड,त्याची तक्रार करणारी महिला,तिला धमकी दिल्याचे पुरावे पोलिसांजवळ आहेत का?कोणाच्या सांगण्यावरुन नंदनवन पोलिसांनी रुबिना पटेल यांच्या विरोधात एफआयआर नोंदवली?ते ही सहा महिन्या पूर्वीच्या घटनेवर?आम्ही तर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सास-यांविरुद्ध खंडीभर पुरावे देऊनसुद्धा काहीच कारवाई पोलिसांनी केली नाही.मग काही तक्रारींच्या बाबतीत पोलिस विभाग इतका सक्रीय आणि काहींच्या बाबतीत इतका निष्क्रिय कसा राहतो?रुबिना पटेल यांनी मला मदत मागण्या संदर्भात फोन केला होता.माननीय शरद पवार यांचेच धोरण आहे ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण,एका महिलेची हेतुपुरस्सर बदनामीकारक वृत्त छापून आणून पोलिस विभागाला नेमके काय साधायचे आहे?वृत्तपत्रांनीही त्यांची परंपरा ही टिळक आणि आंबेडकरांच्या परंपरेशी निगडीत आहे,याचे तरी भान ठेवावे.एका महिलेची आबु की गुर्गी म्हणून तिची हेटाळणी करता,बदनामीकारण वृत्त छापून आणता,यातून टिळक,आंबेडकरांच्या पत्रकारितेच्या परंपरेला गालबोट लागता कामा नये,याचे तरी भान राखावे.राष्ट्रवादी अर्बन सेलच्या शहर अध्यक्ष् तसेच अन्याय निवारण समितीच्या अध्यक्ष या नात्याने सामाजिक कार्यकर्त्या रुबिना पटेल यांच्या आत्मसन्मानाच्या लढाईत त्यांच्यासोबत आम्ही असणार आहोत.




आमचे चॅनल subscribe करा
