

साहील सय्यद व डॉ.गंटावारमधील नीलीमा महत्वाची दूवा
नागपूर,ता. २१ जुलै: गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून विशेष: महापालिकेच्या सर्वसाधारण पाच दिवसीय सभेनंतर मनपाचे सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रवीण गंटावार व त्यांच्या पत्नी डॉ.शीलू गंटावार यांचे नाव माध्यमांध्यमांमध्ये प्रचंड गाजले.भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी सभेत साढे सहा तास आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर आरोपांची फैरी झाडली त्यातील एक प्रमुख विषय हा डॉ.गंटावार हा होता.त्याच डॉ. गंटावार यांच्या मनपा मुख्यालयातील पाचव्या माळ्यावरील केबिनमध्ये सातत्याने आरोपी नीलीमा जायसवाल यांचा मुक्काम असल्याची माहिती सूत्रांकडून खास ’सत्ताधीश’ला प्राप्त झाली.
कोराडी मार्गावरील ॲलेक्सिस हॉस्पीटलमध्ये अनियमितता असल्याचा आरोप करीत डॉक्टरला धमकी देण्यात आली होती.या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा पोलीसांकडे देण्यात आला आहे. या प्रकरणात साहिल सय्यद व त्यांच्या आठ साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यातीलच एक ’बहूचर्चित’नाव नीलीमा जायसवाल हिचे आहे.
ह्दय तपासणीचा अहवाल न दिल्याचा आरोप करीत सर्वपक्ष्ीय राजकीय पक्ष्ाचे वादग्रस्त नेते साहील सय्यद व त्याचे साथीदार रुग्णालयात घूसले.हेमवती तिवारी यांची इको तपासणी रिपोर्ट मागितली.ही रिपोर्ट आली नसल्याचे सांगताच डॉक्टरांना शिविगाळ करण्यात आली. हॉस्पीटल बंद करुन रुग्णालयावर बुलडोजर आणून भिंत पाडण्याची धमकी दिली गेली.यानंतर महापालिकेचे सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रवीण गंटावार यांना सोबत घेऊन सय्यद याने तपासणी केली होती. सय्यद याने गोंधळ घालून धमकी दिल्या प्रकरणी हॉस्पीटलचे प्रशासकीय अधिकारी डॉ.तुषार गावड यांनी मानकापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
याच डॉ.गंटावार यांच्या मनपा मुख्यायातील केबिनमध्ये या नीलीमा जायसवाल यांचा सातत्याने मुक्काम असायचा अशी माहिती येथील नाव न छापण्याच्या अटीवर काही कर्मचा-यांनी खास ‘सत्ताधीश’ला दिली. र्गुन्हेगारी पार्श्वभूमीचा साहील सय्यद याच्या सर्व कट कारस्थानामध्ये ‘ही उत्तर भारतीय सुंदर मुखाची ललना’ नीलीमा जायसवाल महत्वाची साथीदार असल्याचे सांगितले जात आहे.
बनावट कागदपत्रांच्या आधारे मृत महिलेच्या मालमत्तेवर कब्जा करणा-या साहिल सय्यद व त्याच्या साथीदारांच्या विरोधात पाचपावली पोलिस ठाण्यात देखील गुन्हा दाखल झाला आहे. रविशंकर पुरुषोत्तम सहारे वैशालीनगर असे तक्रारदाराचे नाव आहे.ते एमआयजी क्वॉर्टरमध्ये राहतात.त्यांनी येथील वसुधा वासुदेव रुपदे यांच्याकडून काही वर्षांपूर्वी त्यांची स्थावर मालमत्ता विकत घेतली होती. वसुधा रुपदे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मालमत्तेचे बनावट कागदपत्रे तयार करुन आरोपींनी मृत वसुधा यांच्या बनावट सह्या कागदपत्रांवर केल्या व लाखोंच्या मालमत्तेवर कब्जा केला. आरोपींनी सहारे यांना मारहाण करुन धमकी देऊन हाकलून लावले. २१ नोव्हेंबर २०२१ रोजी हे प्रकरण उघडकीस येताच सहारे यांनी पोलीसांकडे धाव घेतली मात्र आरोपींनी बनावट कागदपत्र्यांच्या आधारे हे प्रकरण दडपले होते. अाता पाचपावली पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून आरोपी साहील सय्यदसोबतच नीलीमा जायसवाल(तिवारी) आणि गिरीश पद्माकर गिरीधर यांना देखील या प्रकरणी आरोपी करण्यात आले आहे.
नीलीमा जायसवाल ही सय्यदच्या अनेक कृकृत्यामध्ये महत्वाची भागीदार असल्याचे सांगितले जात अाहे. ॲलेक्सिसच्या प्रकरणात तिनेच सय्यद याला या रुग्णालयाची ‘टिप’दिल्याचे बोलले जात अाहे. मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गंटावार यांच्या मदतीने तगडी रक्कम या रुग्णालयाकडून उकळली जाऊ शकते,यासाठीच हेमवती तिवारी यांच्या ह्दयाचा अहवालाला घेऊन राडा करण्यात आला होता. नीलीमा जायसवाल ही ॲलेक्सिस रुग्णालयातील जनसंपर्क विभागात रिर्पोटींगचे काम करीत असल्याचे सांगितले जात आहे.
डॉ.गंटावार व साहील सय्यद यांच्यामधील नीलीमा जायसवाल ही महत्वाची दूवा होती. याच गंटावारविरोधात सभेत दयाशंकर तिवारी यांनी ‘रणशिंग’फूंकले आणि महापौर संदीप जोशी यांनी तात्काळ प्रभावाने गंटावार यांच्या निलंबनाचे आदेश पारित केल्यामुळेच साहील सय्यद याने या दोघांविरोधात ’हनी ट्रॅप’ची योजना आखली मात्र त्याच्या दूर्देवाने त्याच्याच पंटरने तो व्हिडीयो व्हायरल केला व सय्यद हा चांगलाच अडचणीत आला.रविवारी सय्यद याला त्याच्या घरुन पळून जात असताना नाट्यमयरित्या भरारी पथकाकडून अटक करण्यात आली.
विशेष म्हणजे सय्यद याची ही पहीलीच पोलीस ठाण्यातील वारी नसून यापूर्वीही त्याने अनेकदा कारागृहांच्या भींतीत सासरपण अनुभवलं आहे. त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्याने त्याची केस लढायला फोर माेठ्या वकीलाची मदत घेतली असून सय्यद हा फार फार तर दीड ते दोन महिनेच तुरुंगात राहू शकेल,असे सांगितले जात आहे.
गंटावार यांनी घेतला सुटकेचा श्वास-
साहीलला अटक झाल्यामुळे त्याच्या जाळ्यात फसलेले डॉ.प्रवीण गंटावर यांनी सध्यातरी सुटकेचा श्वास घेतल्याचे खासगीत बोलल्या जात आहे. एक तर माध्यमात उमटणारा त्यांच्यावरील सर्व रोख हा सय्यदवर रोखल्या गेला.त्यात नीलीमा जायसवाल व साहील सय्यद यांच्या पासून तूर्तास तरी त्यांना सुटका मिळाली असल्याचे सांगण्यात येत आहे. डॉ.गंटावार यांच्या स्वत:च्या अनेक महिलांबाबतच्या ’सुरस कथा’ दयाशंकर तिवारी यांनी सभेत आयुक्तांसमोर सांगितल्या होत्या.्त्यात नीलीमा जायसवाल सारख्या अत्यंत सुंदर महिलेसोबत देखील गंटावार यांना कोणता लगाव होता,केबिनमध्ये बसून कोणत्या प्रेम कहाण्या रचल्या जात होत्या,याच्याही सुरस कथा-कहाण्या आता हळूहळू कर्मचा-यांकडून बाहेर पडू लागल्या आहेत.




आमचे चॅनल subscribe करा
