

आईच्या प्रेमाची स्पष्टोक्ती
मानसोपचातज्ज्ञ म्हणतात उपचार व समुपदेशाची नितांत गरज
‘गरज’ फाऊंडेशनने दिला मदतीचा हात
नागपूर,ता. २ जून: सासूसोबत झालेल्या वादामुळे राग डोक्यात घालून एका आईने आपल्या ६ महिन्याच्या चिमूकल्याला बेदम मारहाण केली.क्रोर्याची परिसिमा ओलांडावी अश्यारितीने त्या आईने सासूवरचा राग चिमूकल्यावर काढला.जीवाच्या आकांताने रडणा-या बाळावर आई म्हणून जन्मदात्री म्हणून तिला थोडी देखील दया नाही आली,तिची घृणा,तिचा संताप,तिचा राग,तिची चीड त्या क्ष् णी फक्त आणि फक्त सासूवर होती,सासूसोबत वाढत जाणा-या वादावादीत तिने आपल्याच चिमूकल्याला अमानूष मारहाण केल्याचा व्हिडीयो चांगलाच व्हायरल झाला आणि समाजमन ते बघून सुन्न झालं!
माध्यम प्रतिनिधींनी आज पांढराबोडी येथे राहणा-या त्या आईची भेट घेतली असता ‘तुम्ही असं का केलं?’या प्रश्नावर ‘मला खूप राग आला होता पण माझी चूक झाली मला आपला सासू व नव-यावरचा राग लेकरावर नव्हता काढायला हवा होता,अशी स्पष्टोक्ती त्या मातेने दिली.काल समाजमन सुन्न करणा-या या व्हिडीयोमधील तीच आई आज सामान्य वाटत होती एवढंच नव्हे तर काल जीवाच्या आकांताने रडणारे आणि अतिरेकी वेदनेने मूक होणारे ते बाळ वारंवार आपल्या आईला वारंवार बिलगत होतं!
६ महिन्याच्या त्या निरागस बाळाला कालचं आपल्या आईचं पराकोटीचं क्रोर्य व आजचा लाड हे समजण्यापलीकडचंच होतं.कशीही असली तरी ती त्याची ‘आई’होती त्यामुळे तो वारंवार तिच्याचकडे झेप घेत असतानाचे दृष्य हे निसर्ग आणि मानवी मनाच्या आकलनाच्या पलीकडचं होतं. हा विषय आणि त्या आईचं वर्तन हे तज्ज्ञ मानसोपचराच्या चिकित्सेतून त्यामुळेच बघणेही गरजेचं होतं.
ही महीला सासू,नणद व नव-यासोबत पांढराबोडी येथील एका लहानश्या खोलीत राहते. दोन वर्षापूर्वी तिचे ढोलकवादक असलेल्या युवकासोबत लग्न झाले.तिला ६ महिन्याचा मुलगा आहे.करोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन झाले आणि गेल्या दीड वर्षांपासून तिचा नवरा हा बेरोजगार झाला.सासू मोलकरणीचे काम करीत असून त्याच कुटुंबांचे पालनपोषण करतात आहेत.
२४ मे रोजी या महिलेचा सासूसोबत वाद झाला.त्यामुळे संतापून तिने आपल्याच चिमूकल्याला बेदम मारहाण केली. रविवारी हा व्हिडीयो व्हायरल झाला.अनेकांचे मन हा व्हिडीयो बघून सुन्न झाले.सामाजिक कार्यकर्ते डॉ.अमित हेडा यांनी हा व्हिडीयो पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना टॅग करुन व्हायरल केला.नंतर हा व्हिडीयो उपायुक्त विनिता शाहू यांच्यापर्यंत पोहोचला.
त्यांनी अंबाझरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्ष् क नरेंद्र हिवरे यांना व्हिडीयोची सत्यता पडताळण्याचे निर्देश दिले.हिवरे यांनी शहनिशा केली.व्हिडीयो पांढराबोडी येथील या महिलेचा असल्याचे स्पष्ट झाले.मुलाची सुटका करीत बाल सरंक्ष् ण अधिका-यांना याबाबत माहिती देण्यात आली.
सोमवारी सकाळी अधिकारी अंबाझरी पोलिस ठाण्यात पोहोचले.त्यांनी या आईचे समुपदेशन केले.पोलिसांनी आईविरुद्ध मारहाण व बाल हक्क संरक्ष् ण कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
हा व्हिडीयो व्हायरल कोणी केला?याबाबत तिच्या नणदेला माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता घरी आलेल्या एका नातेवाईकाने तिच्या नकळत तिच्या मोबाईलवरुन मोबाईल कॉपी केला व त्यानंतर तो कसा व्हायरल झाला याबाबत माहीती नसल्याचे ती सांगते.मात्र व्हिीडीयो व्हायरल झाला ते चांगलेच झाले अशी देखील पुश्ती जोडते.
या महिलेचा पती गेल्या दीड वर्षांपासून बेरोजगार असल्याचे कळताच रामेश्वरी येथील ‘गरज‘फाऊंडेशनच्या दृष्टि यांनी पांढराबोडी येथे जाऊन या महिलेला धान्याची किट दिली व पुढे ही धान्य लागेल तेव्हा मला संपर्क करा असा मदतीचा हात दिला. अनेकांना लाखो रुपये खर्च करुनही मुले होत नाही,तुम्हाला एवढे सुंदर बाळ आहे त्याची किंमत काहीच कशी वाटत नाही असा या आईसोबत संवाद साधला असता,घरी खायला काही नाही,नवरा ऐकत नाही,सासू वाद घालते म्हणून सगळा राग मुलावर निघत असल्याची कबुली दिली.खूप मोठी चूक झाली,असे ती आता सांगते.
मनोरुग्णपणाचीच लक्ष् णे- डॉ.सुशील गावंडे(सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ)
हा व्हिडीयो बघून एवढ्या शॉर्ट हिस्ट्रीवरुन या महिलेच्या स्वभावाविषयी काही सांगणे हे कठीण आहे मात्र ज्या पद्धतीने तिने आपल्या निरागस बाळासोबत हे क्रोर्य केले आहे ते बघता तिच्यात विक्ष्प्तिपणाचीच लक्ष् णे असल्याचे दिसून येत आहे.कोणतीही साधारण आई आपल्या बाळासोबत असे अमानवीय वर्तन करणार नाही.या महिलेचे वर्तन बघता त्यांनी या आधी देखील बाळाला अनेकदा मारहाण केल्याचे सांगितले जात आहे याचा अर्थ त्यांना विक्ष्त्पिपणाचे दौरे पडत असावे आणि ही लक्ष् णे मनोरोगाकडे वाटचाल करणारीच असतात मात्र स्लम एरियामध्ये राहत असल्याने व कुटुुंबियांना या रोगाविषयी माहिती नसल्याने त्यांना उपचाराविषयी देखील कल्पना येणे शक्य नाही.
ही महिला ज्या पद्धतीने आपल्या बाळाला मारहाण करतेय त्यामुळे त्या बाळाला वेदना होत आहे याची देखील तिला जाणीव होत नव्हती!यालाच विक्ष्त्पिपणा म्हणतात.यावर उपचार करणे खूप गरजचे असून केवळ समुपदेशन करुन उपयोग होणार नाही.कितीही समुपदेशन केले तरी समाेरच्या व्यक्तिची ते स्वीकारण्याची तयारी देखील हवी असते.त्यामुळे समुपदेशन आणि उपचार हे दोन्ही या महिलेसाठी आवश्यक आहेत.




आमचे चॅनल subscribe करा
