फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजखासदार सांस्कृतिक महोत्सव स्थळाचे थाटात भूमिपूजन

खासदार सांस्कृतिक महोत्सव स्थळाचे थाटात भूमिपूजन

Advertisements

नागपूरकरांना मिळणार सांस्कृतिक मेजवानी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या ‘खासदार सांस्कृतिक महोत्सव’ स्थळाचे सोमवारी ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात भूमिपूजन करण्यात आले.

कार्यक्रमाला दक्षिण मध्‍य क्षेत्र सांस्‍कृतिक केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर, खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्‍मे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अजय संचेती, महापौर नंदा जिचकार, भाजप शहराध्यक्ष प्रवीण दटके, खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव आयोज‍न समितीचे अध्‍यक्ष आमदार प्रा. अनिल सोले, आमदार कृष्‍णा खोपडे, गिरीश व्‍यास,,डॉ. मिलिंद माने, जयप्रकाश गुप्ता, शिवानी दाणी यांच्यासह ईश्वर देशमुख महाविद्यालयाचे सूर्यकांत जऊळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. दीपक खिरवडकर यांनी महोत्सवाला शुभेच्छा देतानाच खासदार सांस्कृतिक महोत्सवामुळे विदर्भाच्या सांस्कृतिक विकासात मोठी भर पडली असल्याचे सांगितले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी महोत्सवाच्या विविध कार्यक्रमांचा आढावा घेतला. नंदा जिचकार यांनी या महोत्सवासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आयोजन समितीचे मोठ्या प्रमाणात परिश्रम घेत असल्याचे सांगितले. खासदार अजय संचेती यांनी महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.

हनुमाननगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या या पटांगणावर २९ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान या ‘खासदार सांस्कृतिक महोत्सवा’चे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवासाठीच्या तयारीला प्रारंभ झाला आहे. महोत्सवाचे यंदाचे हे तिसरे वर्ष असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची नागपूरकरांना मेजवानी मिळणार आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या