

३२८००० रुपयांचे रोष बक्षीस : ८ जानेवारीपर्यंत करा नोंदणी
नागपूर. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या सहाव्या खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत १२ जानेवारी २०२४ रोजी मॅरेथॉन व युवा दौड चे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (१२ जानेवारी) सकाळी ५ वाजता कस्तुरचंद पार्क येथून मॅरेथॉन आणि युवा दौडला सुरूवात होणार आहे.
मॅरेथॉनमध्ये प्रवेशासाठी अंतिम तारीख ८ जानेवारी तर युवा दौडसाठी अंतिम तारीख १० जानेवारी असून या निर्धारित तारखांपूर्वी स्पर्धकांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.
१२ जानेवारी ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत मॅरेथॉन आणि युवा दौडने महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. खुला गट पुरूष, महिला आणि १६ वर्षाखालील मुले व मुली या गटामध्ये मॅरेथॉन तर युवा दौड सर्वांसाठी खुली असणार आहे. दोन्ही स्पर्धांसाठी प्रत्येकी ५० रुपये प्रवेश शुल्क निर्धारित करण्यात आलेले आहे. युवा दौडमध्ये सहभागी प्रत्येक स्पर्धकाला मेडल्स, प्रमाणपत्र आणि टी-शर्ट प्रदान करण्यात येईल.
मॅरेथॉनमध्ये पुरूषांसाठी १० किमी, महिलांसाठी ५ किमी, १६ वर्षाखालील मुलांसाठी ५ किमी आणि १६ वर्षाखालील मुलींसाठी ३ किमी अंतर निर्धारित करण्यात आले आहे. चारही गटातील पहिल्या १० विजेत्यांना रोख बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे. पुरूष आणि महिला गटातील विजेत्यांना १ ते १० क्रमांकांसाठी अनुक्रमे, २१ हजार रुपये, १९ हजार रुपये, १७ हजार रुपये, १५ हजार रुपये, १२ हजार रुपये, १० हजार रुपये, ९ हजार रुपये, ७ हजार रुपये, ६ हजार रुपये आणि ४ हजार रुपये बक्षीस दिले जाईल. १६ वर्षाखालील मुले आणि मुलींच्या गटात अनुक्रमे पहिल्या ते सहाव्या क्रमांकासाठी १० हजार रुपये, ७ हजार रुपये, ५ हजार रुपये, ४ हजार रुपये, ३ हजार रुपये २ हजार रुपये तर सात ते दहा क्रमांकासाठी प्रत्येकी १ हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे. याशिवाय चारही गटात ५ स्पर्धकांना १ हजार रुपये प्रोत्साहन बक्षीस देखील प्रदान करण्यात येणार आहे. १६ वर्षाखालील मॅरेथानमध्ये १ जानेवारी २००८ नंतर जन्म झालेल्या स्पर्धकांना सहभागी होता येणार आहे.
९ ते ११ जानेवारीदरम्यान मिळणार टी-शर्ट आणि चेस्ट नंबर
मॅरेथॉन आणि युवा दौड मध्ये सहभागी होणा-या प्रत्येक स्पर्धकाला टी-शर्ट देण्यात येणार आहे. ९, १० आणि ११ जानेवारी या कालावधीमध्ये स्पर्धकांना खासदार क्रीडा महोत्सवाच्या कार्यालयांमधून टी-शर्ट आणि चेस्ट नंबर प्रदान करण्यात येणार आहे. खासदार क्रीडा महोत्सवाचे मुख्य कार्यालय ग्लोकल मॉल, नक्षत्र सभागृह प्रतापनगर, यश कॉम्प्लेक्स भरत नगर चौक, चिटणीस पार्क महाल, माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान रेशीमबाग चौक, गिरनार क्रेडिट को-ऑपरेटिव्ह बँक लि. सुनील हॉटेल जवळ, जिंजर मॉल जरीपटका, पं. बच्छराज व्यास विद्यालय मेडिकल चौक या कार्यालयांपैकी ज्या कार्यालयांमध्ये स्पर्धकांनी नोंदणी केली असेल त्याच कार्यालयांमध्ये टी-शर्ट आणि चेस्ट नंबर प्रदान करण्यात येणार आहेत.
मॅरेथॉसंबंधी अधिक माहिती मिळविण्यासाठी आणि नोंदणी करण्यासाठी सचिन देशमुख (9766893380), जितेंद्र घोरडदेकर (9823016521) राम वाणी (9579374554) यांचेशी तर युवा दौड संदर्भात माहिती मिळविण्यासाठी नरेंद्र (बाल्या) बोरकर, पारेंद्र पटले, शेखर सुर्यवंशी, नितीन शिमले, निलेश राउत, यश शर्मा, सनी राउत, रितेश पांडे, विक्की पांडे, पंकज करपे यांचेशी संपर्क साधावा.
…………………………..




आमचे चॅनल subscribe करा
