फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजखासदार क्रीडा महोत्सवाचा उद्या रविवारी होणार शानदार समारोप

खासदार क्रीडा महोत्सवाचा उद्या रविवारी होणार शानदार समारोप

Advertisements
‘सनम बँडच्या लाईव्ह इन कॉन्सर्ट‘ची पुन्हा एकदा नागपूरकरांना सुरेल मेजवानी

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस,  नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती
दिव्यांग पॅरालिम्पिक युवा खेळाडू शीतल देवी यांची विशेष उपस्थितीती
नागपूर.१ फेब्रुवरी २०२५: केंद्रीय मंत्री  नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेला खासदार क्रीडा महोत्सव नागपूर शहरासह संपूर्ण विदर्भातील खेळाडूंसाठी महत्वाचे व्यासपीठ ठरले आहे. मागील २० दिवसांपासून सुरू असलेल्या क्रीडा महोत्सवाचा रविवारी २ फेब्रुवारी २०२५ रोजी समारोप होत आहे.
यशवंत स्टेडियम येथे सायंकाळी ५.३० वाजता सातव्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाला सुरुवात होईल. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती असेल. अध्यक्षस्थानी खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रेरक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राहतील. प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे महसूल मंत्री व नागपूरचे पालकमंत्री  चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहतील. विशेष म्हणजे, दोन्ही हात नसतानाही पॅरालिम्पिक तिरंदाजी स्पर्धेमध्ये कांस्य पदक पटकावून सर्वात तरुण भारतीय पॅरालिम्पिक पदक विजेती ठरलेली शीतल देवी या कार्यक्रमाला विशेषत्वाने उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सुप्रसिद्ध सनम बँडच्या लाईव्ह इन कॉन्सर्ट चे समारोपीय कार्यक्रमाला आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेत खासदार क्रीडा महोत्सवाचे सचिव डॉ. पीयूष आंबुलकर,  सुधीर दिवे, महोत्सवाचे सहसंयोजक डॉ.पद्माकर चारमोडे, नागेश सहारे, अशफाक शेख उपस्थित होते.
खासदार क्रीडा महोत्वाच्या समारोपीय कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट क्रीडा संघटक, उत्कृष्ट क्रीडा संघटन, उत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षक तसेच क्रीडा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यंदा सुनील रायसोनी यांना उत्कृष्ट क्रीडा संघटक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट क्रीडा संघटन पुरस्कार दोन संघटनांना विभागून देण्यात येणार असून मराठा लॉन्सर्स आणि भारत व्यायाम शाळा यांना उत्कृष्ट क्रीडा संघटन पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यासोबतच तीन क्रीडा प्रशिक्षकांना सुद्धा सन्मानित करण्यात येणार आहे. तिरंदाजी स्पर्धेचे प्रशिक्षक मोहम्मद झिशान, बॅडमिंटन प्रशिक्षक किरण माकोडे आणि दिव्यांग क्रीडा स्पर्धांमधून अनेक खेळाडूंना नवी दिशा देणारे विनय उपासनी यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येईल. प्रत्येकी ५१ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह प्रदान करुन उत्कृष्ट क्रीडा संघटक, उत्कृष्ट क्रीडा संघटन आणि उत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षकांना सन्मानित करण्यात येणार आहे. यावर्षी विविध खेळांच्या २९ खेळाडूंची क्रीडा भूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे. या खेळाडूंना प्रत्येकी ३१ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह प्रदान करुन सन्मानित करण्यात येईल, असेही श्री. संदीप जोशी यांनी सांगितले.
समारोपीय कार्यक्रम सर्वांसाठी नि:शुल्क आहे. मात्र कार्यक्रमस्थळी यशवंत स्टेडियम येथे प्रवेशासाठी प्रवेशिका अनिवार्य आहेत. कार्यक्रमाच्या प्रवेशिका नागरिकांकरिता खासदार क्रीडा महोत्सवाच्या विविध कार्यालयांमध्ये तसेच यशवंत स्टेडियम येथे उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. कार्यक्रमाच्या प्रवेशिका खासदार क्रीडा महोत्सवाचे सीताबर्डी येथील ग्लोकल मॉल मधील मुख्य कार्यालय, यशवंत स्टेडियम, नक्षत्र सभागृह प्रतापनगर, यश कॉम्प्लेक्स भरत नगर चौक, चिटणीस पार्क महाल, माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान रेशीमबाग चौक, गिरनार क्रेडिट को-ऑपरेटिव्ह बँक लि. सुनील हॉटेल जवळ आणि जिंजर मॉल जरीपटका या ठिकाणी उपलब्ध आहेत. नागरिकांनी आपल्या प्रवेशिका प्राप्त करुन समारोपीय कार्यक्रमाला मोठ्या संख्येत उपस्थित रहावे, असे आवाहन खासदार क्रीडा महोत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे.
१२ जानेवारी २०२५ खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रेरक केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांच्या हस्ते खासदार क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन झाले. २० दिवस शहरातील ७३ क्रीडांगणांवर ५८ खेळांच्या स्पर्धा पार पडल्या. विविध ५८ खेळांच्या तब्बल २९०० चमू, ६००० ऑफिसियल्स, ८० हजार खेळाडूंचा महोत्सवात समावेश होता. एकूण १३१०० स्पर्धा खेळविण्यात आल्या यात खेळाडूंना १२३१७ मेडल्स आणि ७६२ ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या. स्पर्धेतील विजेत्यांना १ कोटी ५० लक्ष रुपयांचे बक्षीस प्रदान करण्यात आले.
खासदार क्रीडा महोत्सव-७चे क्रीडा भूषण पुरस्कार विजेते-
सुनिल भास्कर पांडे (आट्या-पाट्या), हर्षल विलास चुटे योगा, सिया देवधर (बास्केटबॉल), प्रांजल पवन खोब्रागडे (कुस्ती), रोहन रवि गुरबानी (बॅडमिंटन), मनिषा रायसिंग मडावी (खो-खो), नेहा विशाल ढबाले (अॅथलेटिक्स), मिताली दिपक भोयर (मॅरेथॉन), मृणाली प्रकाश पांडे (दिव्यांग (ब्लाइंड बुद्धीबळ)), प्रतिक मंगेश मोपकर (टेबल टेनिस (एम.आर)), निधी विनोद तरारे (मुकबधिर (अॅथलेटिक्स)), हेरंभ सुरज पोहाणे (लॉन टेनिस), श्री. साईप्रसाद राजेन्द्र काळे (ज्युदो), हिमानी शरद गावंडे (हॉकी), अनन्या लोकेश नायडू (रायफल शुटींग), क्षितीजा नरेन्द्र सावरकर (कबड्डी), रहनुमा सरवर आलमशेख (सॉफ्टबॉल), दिग्विजय शरद आदमने (स्वीमींग), नील शैलेन्द्र हिंगे (धनुर्विद्या), समक्षा प्रदिप सिंग (बॉक्सींग), विवान विजय सारोगी (बुद्धीबळ), ईशान प्रशांत काळबांडे (जिमनॅस्टिक), कस्तुरी दिनेश ताम्हनकर (स्केटिंग), यश शुक्ला (फुटबॉल), ओम महेन्द्र मारशेट्टीवार (तायक्वाँदो), शहनवाज खान (सेपक टॅकरा), स्नेहल जोशी (ट्रायथोलॉन), रूतीका व्ही. अरायकर (कराटे), निखिल विलास लोखंडे (कॅरम).
………………………..
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या