फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर मनपाखासगी दवाखाने ‘सील’करणे यात समाजाचेच मोठे नुकसान- डॉ.कृश झूनझूनवाला

खासगी दवाखाने ‘सील’करणे यात समाजाचेच मोठे नुकसान- डॉ.कृश झूनझूनवाला

मनपाने दहाही झोनमध्ये’ फिव्हर ओपीडी’ सुरु करावी, आयएमए पूर्ण सहकार्य करेल

नागपूर: जरीपटका येथील कराेना पोझिटिव्ह रुग्णाने जरीपटका येथे उपचार तसेच रामदासपेठ येथील दोन खाजगी रुग्णालयात तपासणी केल्याने या तिन्ही रुग्णालयांना ‘सील’करण्याचे काम महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे काल दि. ३१ मार्च रोजी करण्यात आले मात्र त्या रुग्णाला रक्त तपासणीसाठी तसेच सी.टी.स्कॅनसाठी जेव्हा या रुग्णालयात पाठवण्यात आले होते तेव्हा तो करोना पोझिटिव्ह नव्हता,शेवटी काेणत्याही रुग्णाची तपासणी केल्यानंतरच त्याचा नेमका रोग डॉक्टर्स लोकांना कळू शकतो,याच उद्देशाने जरीपटका येथील जनता हॉस्पीटलने त्या रुग्णाला विविध तपासण्या करण्यासाठी रेनबो व पॅनोरमा एमआरआय सेंटरला पाठवले होते.यात या रुग्णालयांच्या व्यवस्थापकांचा,डॉक्टर्स आणि ट्रेण्ड स्टॉफचा काय दोष होता? आज हे तिन्ही रुग्णालय ‘सील’केल्याने समाजाचे व इतर रुग्णांचे मोठे नुकसान झाल्याची खंत नागपूर इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष् डॉ.कृश झूनझूनवाला यांनी खास ‘सत्ताधीश‘कडे व्यक्त केली.

त्यामुळे जे झाले ते चूकीचे झाले असे मी मानतो. सर्व तपासण्या केल्यानंतर तो रुग्ण करोना पॉसिटिव्ह आढळला. त्याच्यावर या खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले नव्हते मात्र तरी देखील समाजात हा संदेश गेला खासगी डॉक्टर्स शासनाचे दिशानिर्देश डावळून करोना रुग्णांची लपून चिकित्सा करीत आहे. मूळात खासगी रुग्णालयांना इंडियन मेडिकल असोसिएशनने आधीच सक्त दिशानिर्देश दिले होते,ते कोणतीही जोखीम पत्करणार नाहीत. संपूर्ण काळजी घेऊनच प्रत्येक रुग्ण तपासल्या जात होता.. जरीपटक्याचा रुग्ण हा देखील सर्दी,ताप,खोकल्याची तक्रार घेऊन जरीपटक्यातील रुग्णालायात दाखल झाला होता. परिणामी, तपासणी करण्याकरीता त्याला रेनबोमध्ये तसेच पॅनोरमामध्ये रक्ततपासणी व सीटी स्कॅनसाठी थोड्या वेळासाठी आणण्यात आले होते.

आता मात्र असे मोठे रुग्णालयच प्रशासन ‘सील’करु लागली तर तज्ज्ञ डॉक्टर्स,ट्रेण्ड स्टॉफचीच कमतरता पुढे प्रशासनाला भासण्याची शक्यता आहे. रेनबो तसेच पॅनोरमामधील तज्ज्ञ डॉक्टर्स व ट्रेण्ड स्टॉफच संपूर्णत: कोरोंटाईन झाला आहे.परिणामी त्यांच्या सेवेच्या लाभाला समाजच मुकला.हे रुग्णालय आयएमएने जारी केलेले ‘एस ओ पी’ म्हणजे ‘स्टॅर्ण्ड ऑपरेटिंग सिस्टिम’चे पूर्णत: पालन करीत होते. तरी देखील चूकीचा मॅसेज समाजामध्ये पसरला हे खरंच दू:खद आहे.

मनपाने दहाही झोनमध्ये ‘फिव्हर ओपीडी’ची सुरवात करावी-
आम्ही मनपाला सूचित केले आहे त्यांनी नागपूर शहरातील दहाही झोनमधील त्यांच्या दवाखान्यात तातडीने एक ‘फिव्हर ओपीडी’ची सुरवात करावी. यामुळे आजूबाजूच्या वस्तीतील व इतर रुग्ण ज्यांना ताप,सर्दी,खोकला आहे ते एकाच ठिकाणी तपासणी करायला येतील. यात खासगी डॉक्टर्स ही परिपर्णू मदत करायला तयार आहे. दररोज त्या-त्या भागातील खासगी डॉक्टर्स हे तीन-चार तास सेवा मनपाच्या दवाखान्यात पुरवतील. यामुळे लोकांच्या मनातील भीती देखील निघून जाईल आणि ते तपासणी करण्यासाठी पुढे येतील.

१५ एप्रिल नंतर कदाचित करोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यास अश्‍या परिस्थितीत आयएमए संपूर्ण सहकार्य प्रशासनाला करणार आहे.शेवटी आम्ही देखील या राष्ट्राचाच एक भाग आहोत. आमच्यासाठी रुग्णसेवा ही राष्ट्रसेवाच असल्याने रुग्णालये ‘सील’करण्याचे पाऊल मनपाने उचलू नये.यामुळे एक्सरे मशीन, सीटी स्कॅन मशीन,पॅथोलॉजी लॅबही बंद झाले व इतर रुग्णांना याचा फटका बसला. प्रशासन व खासगी डॉक्टर्स आम्ही सर्व मिळूनच या राष्ट्रीय आपत्तीचा सामना करु शकतो. मनपा प्रशासनाने आयएमएला विश्‍वासात घेऊन काम केले पाहिजे.

इतर देशांच्या तुलनेत भारतात करोना प्रतिबंधसाठी सर्वाधिक प्रभावी पाऊले उचलण्यात आली असल्याचे मी मानतो. जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे व मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासोबत आयएमएचा अध्यक्ष् म्हणून मी देखील दररोज बैठकींना उपस्थित राहतो. प्रशासनाच्या कार्याला आयएमएचा कोणताही विरोध नाही, उलट संपूर्ण सहकार्यच आहे मात्र ‘कारवाई’ करण्यापूर्वी मनपा प्रशासनाने आयएमएची बाजू देखील समजून घेतली पाहिजे,ऐवढीच आमची अपेक्ष्ा आहे.

आज ज्या खाजगी डॉक्टर्सने आपले क्लिीनीक व रुग्णालये बंद ठेवली आहे,त्यांना आयएमएने आवाहन केले आहे,स्टॅर्ण्ड ऑपरेटिंग सिस्टीमचा उपयोग करुन त्यांनी त्यांचे रुग्णालय व क्लिीनीक जनतेच्या सेवेसाठी तातडीने उघडावे.सर्दी,खोकला,तापेचे रुग्ण ही त्यांनी योग्य ती खबरदारी घेऊन तपासावे. केंद्र सरकारच्या दिशानिर्देशाचे संपूर्णपणे पालन करुन अश्‍या रुग्णांची नोंद मनपाच्या आरोग्य विभागाला कळवावी,असे आवाहन त्यांनी केले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या