फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमखान कुटूंबियांनी ओलांडली क्रोर्याची सीमा:नऊ वर्षीय चिमुकलीसोबत अमानवीय कृत्य!

खान कुटूंबियांनी ओलांडली क्रोर्याची सीमा:नऊ वर्षीय चिमुकलीसोबत अमानवीय कृत्य!

Advertisements


जागरुक महिलेमुळे मुलगी सुरक्षित

हूडकेश्‍वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अर्थव नगरी-३ मधील घटना

लवकरच करणार बंगलोरमधून खान कुटूंबियांना अटक:हुडेकश्‍वर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस आयुक्त गणेश बिरादार

मी माणूसकी जपली चूक केली का?प्रसिद्धी यांचा आर्त प्रश्‍न

नागपूर,ता.३१ ऑगस्ट २०२३: अवघ्या सहा वर्षाची असताना हुडकेश्‍वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अर्थव नगरी-३ मधील रहीवासी असणा-या खान कुटूंबियांनी त्या चिमुकलीला बंगलोरमधून स्वत:च्या घरी आणले.मागील तीन वर्षांपासून ही चिमुकली त्यांच्या घरी बंधक असून घरगडी म्हणून राब-राब राबविली जात होती,इतकंच नव्हे तर त्या चिमुकल्या देहावर अन्वित अत्याचार करण्याची किळसवाणी घटना आज सकाळी उघडकीस आली असून,या चिमुकलीने पोलिस व परिसरातील जागरुक नागरिकांच्या समक्ष केलेल्या कथनातून अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या.या चिमुकलीवर अनैसर्गिक अत्याचार केले जात होते,सिगारेटच्या चटक्यांनी तिचा देह पोळलेला असून तिच्या पाठीमो-या सर्वांगावर गरम तव्याच्या चटक्यांचे व्रण उमटले आहेत,हूडकेश्‍वर पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस आयुक्त गणेश बिरादार यांनी लवकरच आरोपी खान कुटूंबियांना अटक करण्यात येईल,अशी माहिती दिली.

मानव तस्करी ही कुठल्या तरी दूरस्थ देशी घडणा-या घटना आहेत असा नागपूरकरांमध्येही गैरसमज आहे.भारतात देखील मोठ्या प्रमाणात चिमुकल्या मुलांची व महीलांची तस्करी होत असून त्यांच्यासोबत माणूसकीला लाजवेल अशी कृत्य केली जातात.बेबी ताज(बदललेले नाव)नावाच्या या चिमुकलीसोबत देखील असेच अमानवीय कृत्य अगदी नागपूरात ते ही सभ्य समजल्या जाणा-या लोकवस्तीत गेल्या तीन,साढे तीन वर्षांपासून घडत होते मात्र शेजा-यांनाही याची कल्पना आली नाही कारण खान कुटूंबातील पती-पत्नी,पत्नीचा भाऊ तसेच खान कुटूंबियांच्या स्वत:च्या दोन मुली या परिसरात कोणाशाही बोलत नव्हते.रात्रीच्या वेळी ताज हीच घरातील कचरा फेकण्यासाठी फाटका बाहेर पडत असे,तेव्हाच शेजारच्या लोकांना अल्प क्षणांसाठी ती दिसत असे.

अतिशय जर्जर नियतीच्या या चिमुकलीने चित्त थरारकरित्या स्वत:ची सोडवणूक एका लहानश्‍या ग्रीलमधूल काल रात्री केली,हे बघून पोलिस देखील अचंभित झालेत.त्या ग्रीलमधून बाहेर पडणे अशक्य कोटीतील गोष्ट होती मात्र,भूकेने कासाविस झालेल्या ताजला तो अडथळा मुळीच अडवू शकला नाही.गेल्या आठ दिवसांपासून या चिमुकलीला स्नानगृहात डांबून खान कुटूंबिय हे बंगलोरला गेले असल्याची माहिती ही चिमुकली सांगते.स्नानगृहात तिच्यासाठी ब्रेड,बिस्कीट व डाेनेटचे पुडे सोडण्यात आले.स्नानगृहातच ही चिमुकली झोपत असे.तिथलेच पाणी पित असे.स्नानगृहाला तसेच त्यांच्या निवासस्थानाच्या दोन्ही दारांवर कुलूप लाऊन खान कुटूंबिय निघून गेले होते.

मात्र,खाद्या सामुग्री संपल्यानंतर ताजला भूक अनावर झाली.तिने महतप्रयासाने स्नानगृहाचे दार वाजवल्याने बाहेरुन अडकवलेली कडी निसटली.घरा बाहेर पडण्यासाठी दोन्ही दारांवर कूलूप असल्याने लहानशा ग्रीलमधून ही चिमुकली काल रात्री घरा बाहेर पडल्याची माहिती असून, परिसरातील प्रसिद्धी ठाकूर या परिचित महिलेच्या घरी जात असतानाच प्रसिद्धी यांना ती रस्त्यात दिसली.

तू किती वर्षांनी मला दिसते आहेस?कुठे निघाली,असे तिला विचारले असता,मी तुमच्याच घरी येत होती,असे उत्तर त्या चिमुकलीने दिले.महत्वाचे म्हणजे या चिमुकलीकडे पैसे असल्याने प्रसिद्धी यांच्या दोन्ही मुलींसाठी ताजने आधी एका दूकानातून चॉकलेट घेतले होते.प्रसिद्धीसोबत घरी आल्यानंतर ताज ही प्रसिद्धी यांच्या दोन्ही मुलींसोबत खेळण्यात रंगली.यावेळी तिच्या शरीरावर प्रसिद्धी यांना ठिकठिकाणी जाळण्याचे व चटके देण्याच्या खूणा दिसल्याने त्यांनी ताज यांना विश्‍वासात घेऊन विचारणा केली.

यानंतर,ताजने तिच्यासोबत घडलेल्या अत्याचारांची मालिकाच कथन केली.अवघ्या नऊ वर्षांच्या त्या चिमुरडीच्या योनिमार्गावर देखील सिगारेटच्या दोन चटक्यांचे व्रण होते.तिचे वक्षस्थळ अनेक ठिकाणी गरम चाकूने कापण्यात आले होते,तिच्यासोबत अनैसर्गिक अत्याचार करण्यात आले होते.प्रसिद्धी यांनी तातडीने आज सकाळी साढे दहाच्या सुमारास हुडकेश्‍वर पोलिस ठाण्यात जाऊन याबाबत माहिती दिली.पोलिसांनी खान कुटूंबियांच्या विरोधात भादंवि अन्वये कलम ३७६,३७७,३४३,३२४,३३७ यासोबतच बाल लैंगिक अपराधाची कलम (पोक्सो)तसेच जुवेनाईल जस्टीस एक्ट देखील आरोपींच्या विरोधात लावले असल्याची माहिती हुडकेश्‍वर पोलिस ठाण्यातील सहायक पाेलिस आयुक्त गणेश बिरादार यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत दिली.

ताज हिला आपला धर्म,जात,आई,वडील किवा मूळ शहराचे देखील नाव माहिती नाही.भूक आणि अत्याचार ,खेळण्या बाडण्याच्या वयात अविरत घरकाम हेच तिचं प्रारब्ध होतं.खान कुटूंबिय तिला कोंडून बंगलोरला गेले आणि येथेच नियतीलाही जणू तिच्या सूटकेचा मार्ग गवसला.आता ती प्रसिद्धी यांच्या घरी वास्तव्यास असून प्रसिद्धी या तिची पोटच्या मुलीप्रमाणे देखरेख करीत आहेत.मी स्वत: दोन मुलींची आई असल्याने माझ्यातील मातृत्व ताजची कर्मकहाणी ऐकून हेलावून गेल्याचे त्या सांगतात.एका निष्पाप जीवावर माणूसकीला लाजवणारे अत्याचार करणा-यांना फक्त फांशीच दिली पाहिजे,अशी संतप्त मागणी त्या करतात.

परिसरातील काही नागरिकांनी देखील आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली असून, आम्ही समाजसेवी नाही मात्र ताजच्या निमित्ताने माणूसकीची सेवा घडली असल्याचे ते सांगतात.नोबल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांच्या संस्थेच्या नागपूरच्या समन्वयक शीतल पाटील यांनी देखील बाल लैंगिक गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली तसेच परिसरातील जागरुक नागरिकांचे कौतूक केले.आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी आम्ही प्रशासनासोबत उभे असल्याचे त्या सांगतात.पोलिसांचे चांगले सहकार्य मिळत असल्याचे शीतल यांनी सांगितले. कुंदन ठाकूर यांनी देखील लहानशा चिमुरडीसोबत घडलेल्या क्रोर्याबाबत संताप व्यक्त केला.रात्री आम्हाला तिच्यासोबत काय काय घडले हे कळले.सकाळी मग आम्ही पोलिस ठाणे गाठले,असे त्यांनी सांगितले.आरोपींना लवकरात लवकर बंगलोरमधून अटक करा अशी मागणी त्यांनी केली. आम्ही जेव्हा ताजला विचारले तुला मोठे होऊन काय बनायचं आहे तर ती सांगते मला पोलिस व्हायचं.पिडीत चिमुकलीला चांगल्यात चांगले भविष्य मिळो हीच माझी व प्रसिद्धीची ईच्छा असल्याचे करण सांगतात.करण हे प्रसिद्धीचे यजमान
आहेत.

मी माणूसकी जपली,चूक केली का?प्रसिद्धी यांचा आर्त प्रश्‍न

सोसायटीचे नावे बदनाम केले असा आरोप आता माझ्यावर केला जात आहे.माध्यमांसमोर बोलत असताना एवढ्या मोठ्या सोसायटीमधून मोजके दहा जण देखील माझ्यासोबत नव्हते.एका निरागस चिमुरडीचे बालपण मी जपले,मात्र,समाजाची कोडगी मानसिकता माझ्याही वाट्याला आली.नुकताच १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिवस आमच्याही सोसायटीमध्ये उत्साहात साजरा झाला. या वेळी भगतसिंग,राजगुरु,चंद्रशेखर आजाद,महात्मा गांधी यांच्या बलिदानाचे गोडवे गायले गेले मात्र,एक लहानशी निरागस चिमुरडी ही खान कुटूंबियांकडे पारतंत्र्यात,पराकोटीचा अत्याचार सहन करीत खितपत पडली होती,तिच्या सूटकेसाठी वारंवार पसिरातील नागरिकांना विनंती करुन देखील कोणीही समोर आले नाहीत,असे खास ‘सत्ताधीश‘सोबत बोलताना प्रसिद्धी सांगते.

उलट,ते ‘खान’आहेत,उगाच कशाला संकट ओढवून घेतेस?असा उरफाटा सल्ला प्रसिद्धीला दिल्या जात होता.उगाच सोसायटीमध्ये हिंदू-मुस्लिम दंगली होतील,हा त्यांच्या घरातला अंतर्गत प्रश्‍न आहे,तू ढवळाढवळ करु नकोस,असे प्रसिद्धीला सांगितल्या जात होते.

तिच्या मनात हिंदू-मुस्लिम दंगलीची भिती भरवली जात होती मात्र,प्रसिद्धी स्वत: दोन चिमुरड्या मुलींची आई असल्याने तिच्या मातृत्वाने भारलेल्या मनाला ताजवरील अत्याचार मूकपणे सहन करने मान्य नव्हते.ताजकडे बघून तिला खात्री पटली होती की मानवी तस्करीतून ताजला बंधक बनवून ठेवण्यात आले आहे.कारण ती कधीही नैसर्गिकरित्या इतर मुलांसारखी खेळण्यासाठी बाहेर तीन वर्षात कधी पडलीच नाही.

काल रात्री तिला घरी आणल्यानंतर मात्र तिच्यावर गुदलेल्या प्रसंगाने प्रसिद्धी आणि तिचे कुटूंबिय पार हादरले.खान पत्नी ही ताजचे हात पाय धरत असे तर तिचा भाऊ तिचे लचके तोडत असे,ताजच्या योनीमार्गात व गुप्तांगामध्ये खान पत्नी ही चमचा आणि लाटणे कोंबित होती….!

खान पती-पत्नीला स्वत:च्या अडीच व दीड वर्षीय दोन मुली आहेत.स्वत: सृजनाची र्निमात्री असताना देखील एका कोवळ्या,निरागस,निष्पाप चिमुरडीसोबत खान पत्नी व तिच्या जल्लाद भावाने क्रोर्याची जी परिसिमा गाठली त्याला जगातल्या कोण्याही गुन्हेगारी कोषात शब्द ही सापडणार नाहीत.

विकृतीला जात,धर्म,पंथ,भाषा,प्रांत नसते.विकृती ही विकृतीच असते.इतकंच की हिंदू-मुस्लिम परिघातात ती जास्त क्रोर्य धारण करणारी असते.परिणामी,प्रसिद्धी ठाकूरने एक चिमुरडीला नरकातून बाहेर काढण्यासाठी हिंदू-मुस्लिम ’अवाजवी’ भीती पलीकडे, जे धाडस दाखवले,त्याचे खरे तर अथर्व नगरी-३ मधील नागरिकांनी कौतूक करायला हवे होते मात्र,असे घडले नाही.ज्या ताजने तिच्या कोवळ्या देहावर,मनावर,उज्जवल भविष्यावर पराकोटीचे दु:ख साहले,जिचे बालपण विकृत खान कुटूंबियांनी हिरावून घेतले,ती ताज अर्थव नगरी-३ मधील नागरिकांची कोणीही लागत नव्हती.वेदना हाच जिचा धर्म होता,अश्रू आणि छळ हेच जिची नियती होती,त्या ताजला माणूसकीचा आधार देणारी एखादी ’प्रसिद्धी’ याच समाजात कुठे तरी आहे,एवढंच समाधान आता मानावं लागेल.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या