फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजकोव्हिड लसीकरणासाठी मनपा यंत्रणा सज्ज:२४५०० आरोग्य सेवकांना दिली जाईल लस

कोव्हिड लसीकरणासाठी मनपा यंत्रणा सज्ज:२४५०० आरोग्य सेवकांना दिली जाईल लस

Advertisements

महापौरांनी घेतला तयारीचा आढावा

नागपूर, ता. १३ : महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या दिशा निर्देशानुसार कोव्हिड लसीकरणासंदर्भात नागपूर महानगरपालिकेनी सर्व तयारी पूर्ण केली असून १६ जानेवारीला होणा-या लसीकरणासाठी मनपाची यंत्रणा सज्ज झालेली आहे. १६ जानेवारी रोजी शहरातील २४ हजार ५०० आरोग्य सेवकांना शहरातील ५ केंद्रांवर लस देण्याची सुरुवात होणार आहे.

यासंदर्भात बुधवारी (ता.१३) महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनपाच्या तयारीचा आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत उपमहापौर मनीषा धावडे, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक संजय बंगाले, प्रतोद दिव्या धुरडे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन डॉ.प्रदीप दासरवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.चिलकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.नरेंद्र बहिरवार, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी, टाटा ट्रस्टचे डॉ.टिकेश बिसेन आदी उपस्थित होते.

याशिवाय मनपा आयुक्त  राधाकृष्णन बी. दररोज लसीकरण संदर्भात बैठक घेऊन तयारीचा आढावा घेत आहेत. कोव्हिड-१९ ची लस मनपाच्या लसीकरण संग्रह केंद्रात महाल मध्ये ठेवण्यात येणार आहे. मनपा दवाखान्यात व लसीकरण संग्रह केंद्रामध्ये मुबलक प्रमाणात फ्रीजची व्यवस्था करण्यात आली आहे. मनपाला आरोग्य सेवकांना देण्यासाठी पहिला डोज भेटणार आहे. दुस-या टप्याा त फ्रंटलाईन वर्कर्स जसे पोलिस, मनपा व राजस्व विभागाचे कर्मचारी असतील. तिस-या टप्यासणत ५० वर्ष पेक्षा अधीक वयाचे नागरिकांना लस देण्यात येईल. यासाठी नोंदणी शासनाचे दिशा निर्देशानुसार सुरु करण्यात येईल.

पहिल्या टप्प्यामध्ये मनपाकडे नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचा-यांना लस दिली जाणार आहे. यासाठी शहरामध्ये ५ लसीकरण केंद्र तयार केली आहेत. महाल रोगनिदान केंद्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय (मेयो), एम्स, डागा हॉस्पिटल या ५ ठिकाणच्या कोव्हिड लसीकरण केंद्रावर आरोग्य कर्मचा-यांना लस देण्यात येईल. प्रत्येक केंद्रावर दररोज कमाल १०० कर्मचारी याप्रमाणे सर्व कर्मचा-यांना लस दिली जाणार आहे. लसीकरण केंद्रावर सुरक्षेच्या सर्व कोव्हिड प्रतिबंधक उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले असून प्रत्येक केंद्रावर मनपाचे ४ आरोग्य कर्मचारी व एक पोलिस कर्मचारी तैनात राहतील.

पहिल्या टप्प्यात डॉक्टर, नर्स, सफाई कामगार, रुग्णालयांचे इतर कर्मचारी, आंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर अशा एकूण २४५०० आरोग्य सेवकांना लस देण्यात येणार आहे. यामध्ये मनपासह ७९ शासकीय रुग्णालयांतील १२ हजार व ३५० खाजगी रुग्णालयांतील १२५०० आरोग्य कर्मचा-यांचा समावेश आहे.

लसीकरण केंद्रामध्ये प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निगरानी कक्ष तयार करण्यात आले आहेत. लस लावण्यापूर्वी कर्मचा-यांच्या नावाची तपासणी केली जाईल. त्यानंतर त्यांचे तापमान घेऊन सॅनिटाइज करुन प्रतीक्षा कक्षात त्यांच्या बसण्याची व्यवस्था केली जाईल. लसीकरण करण्यापूर्वी त्यांच्या परिचय पत्राची चाचणी केल्यानंतर पोर्टलवर त्यांच्या नावाची नोंदणी केली जाईल. त्यानंतर लसीकरण कक्षामध्ये त्यांचे लसीकरण केल्यानंतर त्यांना अर्धातास निगरानी कक्षामध्ये बसावे लागेल. निगरानी कक्षामध्ये कुठल्याही प्रकारचे लक्षणे आढळल्यास संबंधित व्यक्तीला योग्य उपचाराची व्यवस्थाही करण्यात आली आहे. यासाठी शासकीय तसेच मनपाच्या रुग्णवाहिका तैनात करण्यात आलेल्या आहेत. रुग्णवाहिकेतून संबंधित व्यक्तीला आवश्यक उपचारासाठी त्वरीत रुग्णालयात हलविण्यात येईल.

ऐछिक व नि:शुल्क लस-
‘कोव्हिन’ ॲपवर नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचा-यांना लस देण्यात येणार असली तरी ती बंधनकारक करण्यात आलेली नाही. लस ही ऐच्छिक आहे. विशेष म्हणजे लस पूर्णत: नि:शुल्क आहे. जर आरोग्य सेवकांनी लस घेण्यास नाकार दिला तर तशी नोंद ॲपवर केली जाईल. सध्या शहरात ५ केंद्रावर लसीकरण होणार असून लवकरच या केंद्रांची संख्या वाढवून ६० पर्यंत केली जाणार आहे. यामध्ये शासकीय रुग्णालय, मनपाच्या आरोग्य केंद्रांसह खाजगी रुग्णालयांचाही समावेश राहणार आहे. या सर्व केंद्रांवरही नि:शुल्क लस देण्यात येणार आहे. लसीकरणासाठी नोंदणी झालेल्या आरोग्य कर्मचा-यांना लसीकरणाच्या २४ तास अगोदर ‘एसएमएस’वरून केंद्राची माहिती, वेळ आदी माहिती दिली जाईल. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत एका केंद्रावर दररोज जास्तीत १०० नोंदणीकृत आरोग्य कर्मचा-यांचे लसीकरण केले जाणार आहे.

कोव्हिड चाचणी केंद्र ९ ते २ या वेळेत सुरू ठेवणे अनिवार्य-
शहरातील कोव्हिड चाचणी केंद्रावर अनेक प्रकारची गैरसोय होत असल्याची तक्रार बैठकीमध्ये करण्यात आली. चाचणीसाठी गेलेल्या नागरिकांना निर्धारित वेळेचे कारण दाखवून परत पाठविण्यात येत असल्याची तक्रार मांडण्यात आली. शहरातील प्रत्येक कोव्हिड चाचणी केंद्र हे सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत सुरू राहणे अनिवार्य आहे. यानंतरचा वेळ केंद्रावरील कर्मचा-यांना कार्यालयीन कामासाठी देण्यात आलेला आहे. मात्र अनेक कर्मचारी कार्यालयीन कामकाजाचा वेळ असल्याचे सांगून नागरिकांना परत पाठवितात ही चुकीची बाब आहे. त्यामुळे शहरातील सर्व चाचणी केंद्र हे ९ ते २ या वेळेतच सुरू ठेवावेत या निर्धारित वेळेमध्ये नागरिकांची कोव्हिड चाचणी न झाल्यास केंद्रावर मनपाचे संपर्क क्रमांक देण्यात येणार आहे. या संपर्क क्रमांकावर फोन करून नागरिकांनी तक्रार करावी, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या