फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजकोरोना:१३ दिवसात २४ मृत्यू,शहरात आज आणखी १०२ बाधित

कोरोना:१३ दिवसात २४ मृत्यू,शहरात आज आणखी १०२ बाधित

Advertisements

मेयोत कोरोनाचे दोन बळी: मोमीनपुऱ्यातील महिलेसह टिमकीतील वृद्ध दगावला

-उपराजधानीत ४७ व्या मृत्यूची नोंद: ६५ जण कोरोनातून बरे: बाधितांचा आकडा पोहचला २८७६ वर

नागपूर, ता. १८ : अनलॉक-१ हा १ जून रोजी उघडल्यानंतर कोरोना विषाणूचा संसर्ग ज्या गतीने उपराजधानीत वाढत आहे, त्याच गतीने मृत्यू देखील वाढत आहेत. ३० लाखाच्या शहरात कोरोनाबाधिताची संख्या कमी आहे, परंतु दर दिवसाला होणारे मृत्यू नजरेआड करता येत नाही. ५ जुलैपासून सुरू झालेले मृत्यूसत्र थांबत नाही. अवघ्या १३ दिवसात २४ मृत्यू झाले असून ही बाब प्रशासनासाठी चिंताजनक बनली आहे. शुक्रवारी एकाच दिवशी पाच जण कोरोनाने दगावल्यानंतर लगेच शनिवारी (ता.१८) आणखी दोन कोरोनाचे मृत्यू झाले. तर १०२ जणांना कोरोनाची बाधा झाली. यामुळे मृत्यूचा आकडा ४७ वर तर बाधितांचा आकडा २८७६ वर पोहचला आहे.

मेयो रुग्णालयात शनिवारी दुपारी बारा वाजता २६ वर्षाची महिला दगावली. कोरोनासदृश्‍य लक्षणे असल्यामुळे तिला १६ जुलै रोजी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. शहरातील हॉटस्पाट ठरलेल्या मोमीनपुऱ्यातील ही महिला असल्यामुळे कोरोनाची चाचणी करण्यात आली. चाचणीचा अहवाल कोरोनाबाधित आढळून आला. दरम्यान २० दिवसांपुर्वी या महिलेस क्षयरोग असल्याचे आढळून आले होते. त्यातच कोरोनाची बाधा झाली. उपचारादरम्यान व्हेंटिलेटरची गरज पडली. मात्र अम्बु बॅगच्या भरवशावर ती होती. शरीरातील हिमोग्लोबीन कमी झाले होते. शनिवारी प्रकृती अधिकच बिघडली, अखेर दुपारी १२ वाजता ती दगावली.

यासोबतच टिमकी येथील ७२ वर्षीय वृद्धाचा कोरोनाच्या संसर्गाने शनिवारी पहाटे साडेसहा वाजता मृत्यू झाला . २९ जून पासून या वृद्ध व्यक्तीवर मेयोच्या सारी वॉर्डात उपचार सुरू होते. दरम्यान त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे प्रयोगशाळेतून पुढे आले आहे. २० दिवसानंतर त्यांचा मृत्यू झाला. शहरात ४७ व्या मृत्यूंची नोंद झाली आहे. उपराजधानीत मेयो, मेडिकल, एम्ससह कोविड सेटंरमध्ये उपचाराखाली दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शनिवारी प्रथमच एक हजार पार गेली आहे. मेडिकलमध्ये १६९, मेयोत १९४, एम्समध्ये ५५ तर कामठी ग्रामीण रुग्णालयात २९, खासगी रुग्णालयातील २१, आमदार निवास कोव्हिड केअर सेंटरममध्ये २९३, मध्यवर्ती कारागृहातील १३३ तसेच रुग्णालयात दाखल होण्याच्या मार्गावर असलेल्या १३७ रुग्णांचा समावेश आहे.

१७९८ कोरोनामुक्त

नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड वाढली आहे. चार महिन्यात बाधितांचा आकडा २८७६ वर पोहचला आहे. मात्र त्याच गतीने कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कोरोनातून मुक्त झालेल्यांची संख्या १७९८ आहे. कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ६२ टक्के आहे. शनिवारी उपराजधानीत दिवसभरात बिनाकी मंगळवारी, भरतनगर, मिसळ ले- आऊट, लक्ष्मीनगर, गणपती नगर(झिंगाबाई टाकळी) , माऊंट कॉर्मेल स्कूल, रामेश्वरी, मिनीमातानगर, नारी , शंकर नगर , उमंग कॉम्प्लेक्‍स (आरबीआय चौक) , कळमना रोड , तिरुपती अपार्टमेंट , पोलीस लाईन , सिताबर्डी (आदर्शवाडी) , कुराडकर पेठ , मध्यवर्ती कारागृह , नरेंद्र नगर , सोमवारी क्वार्टर , आझादनगर (मोठा ताजबाग) , हसनबाग (मोठी मस्जित) , भगवान नगर , वकीलपेठ , गोरेवाडा , लकडगंज (एव्हीजी ले- आऊट), व्यंकटेश नगर , राम नगर , नेहरू नगर , कमाल चौक , निर्मल नगरी रुग्णासह इतरही भागात रुग्ण आढळले आहेत.

असे आहेत कोरोनाचे ४७ मृत्यू-

-एप्रिल: २ मृत्यू
-मे: ९ मृत्यू
-जून:१४ मृत्यू
-जुलै : २४ मृत्यू

मेडिकल २० तर मेयोत २५ मृत्यू, खासगीत २ मृत्यू
नागपुरात १०३१ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू
-वकीलपेठ , गोरेवाडा, निर्मलनगरीसह रामनगरात कोरोनाचा शिरकाव

करोना संसर्गामुळे नाही..भीतीमुळे मृत्यू अधिक!काय दिला ललित अरोरा या तरुणाने संदेश-

 

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या