

गड्डीगोदाम खलासी नगर येथील सारीचा होता रुग्ण:परिसर सील
नागपूर,ता. १६ मे: कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे आज शनिवार दि. १६ मे रोजी पाचवा मृत्यू झाला. शहरातील गड्डीगोदाम खलासी नगर येथे राहणारा हा ६५ वर्षीय रुग्ण सारीचा रुग्ण होता. १३ मे रोजी या रुग्णाला मेडीकलमध्ये सायंकाळी ७.३० वा.भरती करण्यात आले होते. मात्र आज १६ मे रोजी उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला.आता शहरात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या ही ५ झाली आहे.
शहरात कोरोनाचा पहीला बळी हा ५ एप्रिल रोजी गेला होता.सतरंजीपुरा येथील ६८ वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.३० एप्रिल रोजी मोमिनपुरा येथील ७० वर्षीय रुग्ण हा कोरोनामुळे मृत पावला होता. तिसरा बळी हा ५ मे रोजी पार्वतीनगर येथील २२ वर्षीय तरुणाचा गेला.एकाच आठवड्याच्या आत ११ मे रोजी पांढराबोडी येथील ३९ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला.कोरोनासोबतच हा रुग्ण सारीचा देखील रुग्ण होता. आज शनिवार दि.१६ मे रोजी गड्डीगोदाम येथील ६५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू कोरोनामुळे झाला असल्याची अधिकृत माहिती मेडीकल प्रशासनाकडून प्राप्त झाली. सारीने पीडीत या रुग्णाला १३ मे रोजी मेडीकलमध्ये भरती करण्यात आले होते.
सारीच्या रुग्णांना कोरोनाचाही विळखा पडत असल्याचे यातून निर्दशनास येत आहे. सारी आणि कोरोनाबाधित असल्यामुळे मृत्यू पावलेल्या मृतकांची संख्या ही आज ३ झाली आहे. फक्त सारीनेच नागपूर शहरात आतापर्यंत १४ रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत.यावरुन या रोगाची चिंताजनक परिस्थिती दिसून पडतेय.सारी आजाराने पीडीत रुग्णाची संख्या ही मेयो-मेडीकलमध्ये त्रिशतकापर्यंत गेली आहे. यामुळे नागपूर शहरावर कोरोनासोबतच सारी आजाराचे दूहेरी संकट पडल्याचे दृष्य दिसत आहे. सारी आजारीची लक्ष् णे ही देखील कोरोनासारखीच असून सारीच्या रुग्णाला एकदम सर्दी,ताप येतो.तपाचं प्रमाण हे अत्यधिक असतं.खूप अशक्तपणा जाणवतो.न्यूमोनिया, श्वसन दाह, छातीत दुखणे,रक्त शुद्धिकरण क्ष् मता कमी होणे आदी लक्ष् णेही असतात.
तर कोरोनाच्या रुग्णामध्ये सर्दी,ताप,खोकला,श्वसनाचा त्रास ही लक्ष् णे दिसून पडतात. रुग्णालयात सारीच्या ब-याच रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याची गरज पडते. कोरोना व सारीची लक्ष् णे सारखीच असल्यानेच कोव्हिड रुग्णालयात सारीच्या रुग्णांसाठी विशेष कक्ष् ठेवण्यात आला आहे. मार्चपासून काेरोनाचा शिरकाव नागपूर शहरात झाला त्याच दरम्यान सारीनेही अलगद या शहराला कवेत घेतल्याचे दिसून पडतंय.एकट्या मेडीकलमध्ये मार्चपासून २६५ सारीग्रस्तांची नोंद झाली आहे. मेयोसह इतर खाजगी रुग्णालयातदेखील सारीच्या रुग्णांची संख्या ही ३८ पेक्ष्ा अधिक असल्याचे सांगितले जात आहे. तीन दिवसांपूर्वीच १२ मे रोजी उपराजधानीत सारीचे ५ नवे रुग्ण आढळले होते.यातील २९ वर्षीय तरुण हा पांढाबोडीतला होता. तर मोमिनपुरा भागातील टिमकी येथील ३९ वर्षीय महिला,हनुमान नगर येथील जुनी शुक्रवारी भागातील ५९ वर्षीय महिला,दिघोरी येथील ५० वर्षीय पुरुष,पार्वतीनगर येथील ३२ वर्षीय पुरुष तसेच चंदननगरचा भाग असलेल्या भगवाननगर येथील ३३ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश होता.
३ पोलीसकर्मी हे देखील कोराेना पॉझिटीव्ह!एकूण संख्या ३४१
नागपूरात पहील्यांदा २ पोलीसकर्मी व एका पोलीस सुरक्ष्ा बळाच्या जवानासह ३ पोलीसांना शनिवारी कोरोनाने विळखा घातला. गोरेवाडा,कामठी रोड व तहसील परिसरातील हे पोलीसकर्मी असून नागपूरात आता नव्या भागात कोरोनाने आपला प्रादुर्भाव वाढवल्याचे यावरुन दिसून पडतंय.प्रशासनाची चिंता यामुळे पराकोटीची वाढली असून कोराेनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न हे अपूरे पडत असल्याचे द्योतक आहे.माफसूच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या या तीन पोलीसकर्मींचा अहवाल आज शनिवार दि. १६ मे रोजी पॉझिटीव्ह आले.मेयो रुग्णालयात या पोलीसकर्मींना भरत करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगितले जात आहे.
जवाहरनगर येथील आणखी दोघे पॉझिटीव्ह-
आज शनिवार दि.१६ मे रोजी जवाहरनगर येथील आणखी दोघे हे पॉझिटीव्ह निघाले.व्हीएनआयटी येथे त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते,असे सांगितले जात आहे. ३४ वर्षीय व २५ वर्षीय महिलांच्या कोरोना चाचणीचा अहवाल हा आज मेडीकल येथील प्रयोगशाळेत पॉझिटीव्ह निघाला. हे कोराेना बाधिताच्या अगदी जवळून संपर्कात आले होते.
मेडीकलमध्ये ट्रामा केंद्रात सारीचे सायंकाळी ५.३० वाजे पर्यंत एकूण ९ रुग्ण भरती होते. यात जुने ५ तर नव्याने ४ रुग्ण भरती झाले.यात ५ पुरुष तर ४ या महिला रुग्ण आहेत.आज सांयकाळी ६.३० वा.पर्यंत मेडीकलमध्ये कोव्हिड वॉर्डमध्ये एकूण १८१ रुग्ण भरती असून यातील ८३ रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. ३ मृत्यूंची नोंद आहे. ट्रामा केंद्रात ७१ तर वॉर्ड क्र.४९ मध्ये २४ रुग्ण भरती असल्याची माहिती मेडीकलचे वैद्यकीय अधिक्ष् क डॉ. अविनाश गावंडे यांनी दिली.
तर मेयोमध्ये आज एकूण ८६ रुग्ण तपासण्यात आले. कोणाचाही अहवाल हा पॉझिटीव्ह आला नाही. अमरावती येथून काल ज्या रुग्णाला मेयो येथे भरती करण्यात आले त्या रुग्णाचा अहवाल मात्र ‘पॉझिटीव्ह ’ आला असल्याची माहिती मेयोचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलिया यांनी दिली.अमरावतीच्या रुग्ण संख्येत यामुळे आणखी एका कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाची या अहवालामुळे भर पडली. अमरावतीत आणखी २ रुग्णांचा अहवाल हा आज पॉझिटीव्ह आल्यामुळे अमरावतीत कोराना बाधितांच्या संख्येने आज शतक गाठले हे विशेष!
काल शुक्रवार दि. १५ रोजी सायंकाळपर्यंत नागपूर शहरात एकूण १३ काेरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले होते.मात्र रात्री उशिरा आणखी ५ रुग्णांची यात भर पडली व मध्यरात्रीपर्यंत बाधितांच्या आकड्याने १८ पर्यंत मजल मारली. काल नागपूरात कोरोना बाधितांची एकूण संख्या ही मध्यरात्री ३३६ झाली होती तर आज अाणखी ५ पॉझिटीव्ह रुग्ण निघाल्याने ही संख्या वर ३४१
पोहोचली असल्याचे दिसून पडतंय.
सतरंजीपुरा येथील ५ रुग्णांना सुटी-
सतरंजीपुरा येथील ५ रुग्ण सुटी होऊन घरी परतले. यात १० वर्षीय बालक,४० वर्षीय महिला,२८ वर्षीय पुरुष,७० वर्षीय पुरुष तसेच ६२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. कोरोनावर मात करुन सुखरुप घरी परतणा-यांची संख्या ही आज १९६ झाली.
गड्डीगाेदामचा काही परिसर सील-
नागपूर महानगरपालिका हद्दीतील मंगळवारी झोन क्र. १० अंतर्गत येणा-या गड्डीगोदाम प्रभाग क्रमांक ०९ या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरु नये व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता काही परिसर सील करण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.
या आदेशानुसार प्रभाग क्रमांक ०९ च्या दक्षिण पूर्वेस युवराज साखरे यांचे घर, दक्षिण- पश्चिमेस जयस्वाल रेशन शॉप, दक्षिण -पश्चिमेस किशोर शाहू यांचे घर, पश्चिमेस अन्नपूर्णा मंदीर, पश्चिमेस गड्डीगोदाम चौक, उत्तरेस गुरुव्दारा जवळील रेल्वे अंडर ब्रिज, पूर्वेस फेमस लायब्ररी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या भागात येणारे व जाणारे सर्व मार्ग तात्काळ बंद करून या भागाची सीमा आवागमनासाठी पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. सदर भागातील नागरिकांना प्रतिबंधित क्षेत्राचे बाहेर जाण्यास व सदर प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील नागरिकांना सदर क्षेत्रात येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खाजगी डॉक्टर, परिचारीका, मेडीकल स्टोअर्स दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका, पोलिस विभागामार्फत पासधारक असलेले जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे व्यक्ती यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.





आमचे चॅनल subscribe करा
