Advertisements

पंचवीसपेक्षा अधिक मजूर दबल्याची आंकाक्षा
स्थानिक विरोधकांचा मंदिर संस्थानाच्या कारभारावर तीव्र रोष
नागपूर,ता.९ ऑगस्ट २०२५: कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थानात मोठी दुर्घटना घडली असून २५ च्या वर मजूर लोखंडी स्लॅब खाली दबल्याची चर्चा आहे.मंदिराच्या निर्माणाधीन प्रवेश द्वार आज रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास कोसळले व त्याखाली अनेक मजूर दबल्याचे स्थानिक सांगत आहेत.या दुर्घटनेमुळे जगदंबा मंदिर संस्थानाच्या कारभारावर टिकेची झोड उठली आहे मात्र,संस्थानाच्यावतीने मंदिर परिसरातील बांधकाम हे एनएमआरडीएच्या माध्यमातून होत असून ,या बांधकामाशी मंदिर संस्थानाचा संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या प्रसंगी रत्नदिप रंगारी या प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार २५ च्यावर मजूर स्लॅबखाली दबले असून ९ जखमींना बाहेर काढण्यात आले असून त्यांना नंदिनी रुग्णालयात दाखल करण्यात आले.कालच या परिसरात दूर्घटना घडून वीजेच्या धक्क्याने दोन म्हशी मरण पावल्या आज मजूरांचा मृत्यू झाला असल्याचा दावा त्यांनी स्थानिक माध्यमांशी संवाद साधताना केला.इतक्या मोठ्या प्रमाणात बांधकाम होत असताना या ठिकाणी कोणताही सुरक्षा अधिकारी उपस्थित नसतो,असा आरोप त्यांनी केला.
व्यवस्थापक देखील गायब झाल्याचे ते म्हणाले.बीव्हीजी कंपनीतर्फे हे बांधकाम होत असून कुठेही या बांधकामाचे सुपरव्हिजन होत नसल्याचे त्यांनी सांगितले.या कंपनीचा साईट इंचार्ज,मॅनेजर सगळे गायब झाले असल्याचे ते म्हणाले.एक महिला या ठिकाणी रडत रडत आली,तिला नंदिनी रुगण्यालयात तिच्या पतीला भर्ती केल्याची माहिती दिल्याने ती सैरभैर होत नंदिनी रुग्णालयाकडे धावली असे रंगारी यांनी सांगितले.
कोराडी जगदंबा परिसरातील सर्वाधिक बांधकाम बीव्हीजी कंपनी करीत असून आजच्या दूर्घटनेसाठी या कंपनीच्या अधिका-यांवर गुन्हा दाखल करुन त्यांच्या निष्कृष्ट बांधकामाची चौकशी व्हावी,अशी मागणी स्थानिकांनी केली.
महत्वाचे म्हणजे निर्माणाधीन प्रवेश द्वार कोसळल्याने या ठिकाणी पुढील महिन्यात येणा-या नवरात्रात भाविकांची तूफान गर्दी असताना, त्यांच्यावर ते कोसळले असते तर या दूर्घटनेची व्याप्ती गंभीररित्या वाढली असती,असा दावा स्थानिकांनी केला.या मजूरांच्या जीवाचे काहीच मोल जगदंबा संस्थान व बीव्हीजी कंपनीच्या अधिका-यांना नाही का?असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.
दुर्घटनेची माहिती कळताच एनडीआरएफची चमू त्या ठिकाणी पोहोचली व बचाव कार्यास सुरवात केली.जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्यासह पोलिस विभागाचे मोठे अधिकारी या स्थळी पोहोचले.पोलिस अधिका-यांनी कुठल्याही प्रकारची जिवित हानी अद्याप झाली नसल्याचे सांगितले तरी देखील कोणाच्याही दबण्याची शक्यता असल्यास आम्ही मलबा हटवित आहोत व तपास करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
जवळपास १७ लोकांना किरकोळ जखमा झाल्या असून काही लोकांना नंदिनी तर काही लोकांना मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी कोणाच्याही हताहत होण्याच्या चर्चेला अफवाह सांगितले. मी पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या संपर्कात असून त्यांचा दोन-तीन वेळा मला फोन आला असून एनडीआरएफ,पोसिल प्रशासन,महसूल प्रशासन हे कोणत्याही प्रकारची दुघर्टना घडल्यानंतर ज्या प्रोटोकॉलनुसार काम करते,त्यानुसार सर्व मिळून काम करीत असल्याची माहिती माध्यमांना जिल्हाधिकारी यांनी दिली.मोठ्या वेगाने मलबा काढत असल्याचे त्यांनी सांगितले.या दुर्घटनेत अनेक मजूर दबले ही अफवा असल्याचे व त्यात कोणतीही सत्यता नसल्याचे इटनकर यांनी सांगितले.
कोराडी मंदिराच्या हे निर्माणाधीन अवाढव्य प्रवेशद्वार कोसळताच एकच हलकल्लोळ माजला.लोकांनी दुर्घटनास्थळी धाव घेतली.अनेकांनी त्याचे व्हिडीयोज समाज माध्यमांवर व्हायरल केले.मलब्याखाली दबलेले जखमी मजूरांचे छायाचित्रण त्यात दिसून पडत होते.तरी देखील प्रशासकीय विभागातील शीर्षस्थ अधिका-यांनी या गंभीर दुर्घटनेला किरकोळ ठरविण्याचा प्रयत्न केल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.महत्वाचे म्हणजे,हे बांधकाम एनएमआरडीएच्या माध्यमातून होत असल्याचे स्वत: आयुक्त संजय मीणा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.श्री जगदंबा मंदिर संस्थानाने परिसरातील बांधकामाशी आपला संबंध नसल्याचे सांगून एनएमआरडीएवर जबाबदारी ढकल्याचे दिसून पडतंय.
मात्र,ज्या बीव्हीजी कंपनीला हजारो कोटींच्या या संपूर्ण बांधकामाचे कंत्राट दिले गेले आहे,त्या कंपनीचा खरा ‘आका’शोधणे अश्या प्रशासनाला दुरापस्त असल्याचा दावा स्थानिकांनी केला.
……………………….
Advertisements

Advertisements

Advertisements
