फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजकॉटन मार्केटमध्ये भीषण आग:जिवित हानि नाही

कॉटन मार्केटमध्ये भीषण आग:जिवित हानि नाही

Advertisements

उन्हामुळे लागली आग उन्हामुळेच वाचलो:स्थानिक दूकानदारांची प्रतिक्रिया

नागपूर,ता. २७ मे: शहराच्या मध्यवर्ती भागतील सर्वात मोठे भाजी बाजार केंद्र असणा-या कॉटन मार्केटमध्ये दूपारी ४ वाजताच्या सुमारास भीषण आग लागून २० ते २५ दूकाने ही आगीत भस्म झाल्याचे येथील स्थानिक दूकानदार सांगत आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून उन्हामुळे शॉट सर्कीट झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

आगीत दलाल आेळीतील दूकानांनी बघता-बघता रौद्र रुप धारण केले. आगीचे गोळे आकाशात फेकल्या जाऊ लागले,काळ्याशार धूरानी संपूर्ण परिसर व्यापला. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी येथील व्यापारांना सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत व्यवसाय करण्याची परवानगी दिली असली तरी सध्या शहरात तापलेले रणरणते ऊन,नवतपाचा भाजून काढणारा अंगार आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, बाजारात ग्राहकांची वर्दळ ही नव्हतीच.शिवाय अनेक दूकाने ही बंद होती,नेहमीसारखा माल ही व्यवसायिकांनी भरुन ठेवला नव्हता.परिणामी ‘उन्हामुळे आग लागली आणि उन्हामुळेच वाचलो’अशी प्रतिक्रिया येथील स्थानिक दूकानदारांनी या घटनेनंतर व्यक्त केली.

सिलेंडरचा स्फोट-
या घटनेत एका दूकानातील सिलेंडरमध्येही स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. आगीचा व्हिडीयो काढत असणारे येथील काही ठोक विक्रेते हे स्फोट झाल्यानंतर घाबरुन पळत असताना खाली पडले.आगीचे रौद्र रुप बघता स्थानिक दूकानदारांच्या काळजाचा थरकाप उडाला.मात्र मनपाच्या अग्निशमन विभागाचे पाच बंब हे अवघ्या दहा मिनिटांच्या अवधीत घटनास्थळी पोहोचले व अल्पावधीत आग आटोक्यात आणली.

मे महिन्यातील उन्हाळ्यात आगीच्या घटना या वारंवार घडून येतात. मात्र आधीच कोरोनामुळे’ दुष्काळात तेरावा महिना’झेलत असणा-या कॉटन मार्केट येथील स्थानिक दूकानदारांनी आज झालेल्या अपरिमित नुकसानामुळे हताशा व्यक्त केली.ग्राहक नाही,आवक नाही,मनपाचे दूकानांचे भाडे हे थकीत आहे.यातून सूट मिळावी,नुकसान भरपाई मिळावी तरच आता आगीच्या भक्ष्य स्थानी पडलेल्या दूकानदारांना जगता येईल,अशी भावना व्यक्त केली जात आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या