फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजकॉंग्रेस ईवीएम वर गप्प कां : आ.कृष्णा खोपडे

कॉंग्रेस ईवीएम वर गप्प कां : आ.कृष्णा खोपडे

Advertisements

नागपूर : विजय मिळविला की, आमचा विजय आणि पराजय मिळाल्यास ईवीएम वर खापर फोडायची कॉंग्रेस पक्षाची जुनी सवय असून यावेळी मात्र कॉंग्रेस राज्यात चौथ्या क्रमांकावर असून देखील ईवीएम च्या बाबतीत गप्प का ? असा सवाल पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी यावेळी केलेला आहे.

आमदार कृष्णा खोपडे पुढे म्हणाले की, वारंवार होत असलेल्या पराजयामुळे कदाचित कॉंग्रेस पक्ष हताश झाला असावा किंवा “अर्ध्या हळकुंडातच पिवळी झाले कि काय?” अशी अवस्था कॉंग्रेस पक्षाची झालेली आहे. नागपूर जिल्ह्यात निवडणूक लढण्यास अनेक बड्या नेत्यांनी माघार घेतली, आता मात्र काही ठिकाणी विजय मिळविल्यामुळे त्यांचे डोळे वधारले आहे. जाती –पातीच्या राजकारणाचा आधार घेऊन नकारात्मक मताचे ध्रुवीकरण करीत नागपूर जिल्ह्यात काही जागेवर मिळविलेला विजय फार काळ टिकणारा नाही. हे कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लक्षात ठेवले पाहिजे असेही ते म्हणाले. ईवीएमच्या बाबतीत कॉंग्रेस पक्षाची ही भूमिका निवडणूक आयोगाला सुखावणारी जरी असली, तरी निदान कॉंग्रेस पक्षाने पराजय पचविण्याची क्षमता स्वत:मध्ये निर्माण केल्याचे लक्षात येते.

      या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष असून देखील स्वत:च्या पक्षातील नेत्यांना हिरो म्हणवून घेणारे कॉंग्रेसचे सहकारी पक्ष सुद्धा ईवीएम च्या बाबतीत गप्प असल्यामुळे मागील काळात कॉंग्रेस पक्षाचा झालेला पराजय त्यांना मान्य असल्याचे सिद्ध होते असेही ते म्हणाले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या