
टायगर पॅराडाईज रिसॉर्ट ॲण्ड वॉटर पार्कचे संचालक डॉ.राजेंद्र पडोळे यांचा आरोप
आयोजकांना एकदा सभागृह दिल्यानंतर संचालकावर जवाबदारी निश्चित होत नाही
पाहूण्यांचे खासगीपण जपने हॉटेल व्यवस्थापनाचे काम
नागपूर ग्रामीण पोलिसांची उमरेड- करहांडलामध्ये जाऊन कारवाई वादग्रस्तच! संचालकाचा सूर
धाडीच्या अर्ध्या तासांपूर्वीच आमच्या रिर्सोटमध्ये पोलिसांची पार्टी संपली होती!पडोळे यांची माहिती
नागपूर,ता.५ जून २०२३ : मंगळवार ३० मे २०२३ रोजी नागपूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांनी करहांडमधील ‘टायगर पॅरेडाईज रिर्सोर्ट ॲण्ड वॉटर पार्क ’या माझ्या रिर्सोर्टवर जी धाड टाकली ती माझ्या रिर्सोटला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक खोटी धाड असल्याचा आरोप या रिर्सोटचे संचालक डॉ.राजेंद्र पडोळे यांनी प्रेस क्लब येथे अायोजित पत्रकार परिषदेत केला.यावेळी या रिर्सोर्टचे व्यवस्थापक अरुण मुखर्जी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना ते म्हणाले,की माझे रिर्सोट हे तीन वर्षांपूर्वी २०२० मध्ये सुरु झाले व हे तिसरेच वर्ष आहे मात्र,माझ्या रिर्सोटच्या प्रसिद्धीवर जळणारे काही स्थानिक असू शकतात ज्यांनी काही पोलिसांना हाताशी धरुन हेतूपुरस्सर माझ्या रिर्सोटवर धाड टाकून माझ्या रिर्सोटला बदनाम करण्याचा डाव साधला.
दूपारपासून दोन पोलीस साध्या वेषात ग्राहक बनून माझ्या रिर्सोटमध्येच होते.रात्री ११ वाजता ही बनावट धाड टाकण्यात आली.दुस-या दिवशी पहाटेपर्यंत धाडीची कारवाई सुरु होती.महत्वाचे म्हणजे धाडीची कारवाई केल्यानंतर पुढील कारवाईसाठी हे प्रकरण स्थानिक पोलीस ठाण्याच्या पोलिसांना सोपवणे गरजेेचे होते.परंतू एलसीबीने तसे केले नाही.धाडीचा खोटेपणा सिद्ध होऊ नये म्हणून सीसीटीव्हीच्या हार्डडिक्समधील संपूर्ण डेटा नष्ट करण्यात आल्याचा अारोप या प्रसंगी डॉ.पडोळे यांनी केला.
या धाडीमागे व्यवसायिक वैमनस्य आणि स्थानिक राजकारण असल्याचा स्पष्ट आरोप त्यांनी केला.रिर्सोटमध्ये कोणतीही अश्लीलता चालणार नाही,नियम मोडले जाणार नाही याची पूरेपूर काळजी आम्ही घेत असतो. या देखील धाडीत पोलिसांना काय गवसले तर दारुच्या दोन बाटल्या!आजकाल दारु पिण्याचे परवानेच ग्राहक सोबत घेऊन फिरत असतात त्यामुळे रिर्सोटवर दारु पिने हा गुन्हा होऊ शकत नाही. ज्या सभागृहात पोलिसांनी धाड टाकली ते सभागृह एका खासगी पार्टीसाठी बूक झाले होते.सभागृहाला एकच दरवाजा आहे.सभागृहाच्या आत नाच गाण्यांचा कार्यक्रम होत असेल व त्यात नियम मोडण्यात येत असेल तर मालक कसा दोषी होऊ शकतो?
असा सवाल करीत,या करिता पोलिसांनी त्या पार्टीच्या आयोजकांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा व कारवाई करावी.रिर्सोट संचालकांना ग्राहकांच्या खासगीपणाच्या मध्ये येता येत नाही.आमच्या रिर्सोटमध्ये सीसीटीव्ही कॅमरे लागले आहेत,मात्र,प्रत्येक ठिकाणी ग्राहकांचा खासगीपणा जपला जावा यासाठी सीसीटीव्ही कॅमरे लावले जाऊ शकत नाही.याशिवाय रिर्सोटमध्ये येणा-या प्रत्येक ग्राहकाकडून आम्ही नियमाप्रमाणे ओळखपत्र म्हणून आधारकार्डची प्रत घेत असतो व त्याचे रेकॉर्ड ठेवले जातात.पोलीस-हॉटेल रिर्सोट असोसिएशनच्या मार्गदर्शक तत्वानुसारच ग्राहकांना प्रवेश दिला जातो.
मात्र,कमी कपड्यांमध्ये नृत्यांगना अश्लील नृत्य करीत असल्याची माध्यमांना पोलीसांनी दिलेली माहिती ही सपशेल खोटी व बदनामीकारक असून, नृत्य करणा-या मुलींच्या अंगावर योग्य ती वस्त्रे होती,याशिवाय त्यांच्या अंगवार पैसे उधळले जात असल्याची माहिती दिशाभूल करणारी,खोटी आणि मुद्दाम रिर्सोटला बदनाम करण्यासाठी असल्याचा आरोप यावेळी डॉ.पडोळे यांनी केला.
ग्राहकांचा खासगीपणा जपने हे संचालक म्हणून आमचे कर्तव्य आहे.त्यांच्या मागणीप्रमाणे आम्ही त्यांना कॉन्फरन्स हॉल,खोल्या आणि ध्वनि व्यवस्थेची उपलब्धता करुन देत असतो.आम्ही त्यांच्या खासगीपणाम ढवळाढवळ करु शकत नाही कारण आधीच संपूर्ण चौकशी करुनच त्यांना आम्ही प्रवेश देत असतो,असा दावा डॉ.पडोळे यांनी केला..
विशेष म्हणजे आमचे रिर्सोट योग्य नसते तर धाडी पूर्वी म्हणजे रात्री साढे दहा वाजता आमच्या रिर्सोटमध्ये पोलिसांची पार्टी का म्हणून झाली?रात्री साढे दहा वाजता त्यांची पार्टी संपली ,त्यांनी भूगतान ही केले आणि लगेच अर्ध्या तासात आमच्या रिर्सोटवर धाड टाकण्यात आली.
याप्रकरणात उमरेडचे काही स्थानिक पत्रकारही सहभागी असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.मूळात आमच्यावर ज्या कलमा लावण्यात आल्या त्या २९४,६५(ई),११०,११२,या सर्व कलमा सार्वजनिक ठिकाणी कायद्याचा भंग करण्यासाठी लागू होतात.आमच्या रिर्सोटमध्ये खासगी सभागृहात ती पार्टी सुरु होती त्यामुळे आम्ही कोणत्याही सार्वजनिक शांततेचा भंग किवा कायद्याचे उल्लंघन केला नसल्याचा दावा डॉ.पडोळे यांनी केला.
उद्या एखाद्या लग्न समारंभाला आम्ही रिर्सोटमधील सभागृह दिले व त्यात आपापसातील भांडणात एखाद्याचा खून झाला तर रिर्सोटचा संचालक जवाबदार कसा?असा प्रश्न पडोळे यांनी उपस्थित केला.त्या घटनेत माझा सहभाग असेल तेव्हा मला जवाबदार धरला येईल फक्त माझी मालमत्ता आहे म्हणू जगातला कोणताही कायदा मला दोषी धरु शकत नाही,असे पडोळे म्हणाले.
स्थानिक पोलिसांनी नव्हे तर नागपूर ग्रामीण पोलिसांनी तुमच्या रिर्सोर्टवर तिथे येऊन धाड टाकली याचा अर्थ नागपूर ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्थेचे सगळे प्रश्न सुटले आहेत व ग्रामीण पोलिसांना आता काहीच उद्योग धंदे नसल्यामुळे व पोलिस आता इतके रिकामटेकडे झाले आहेत की त्यांनी तिथे येऊन धाड टाकली,असे तुमचे म्हणने आहे का?कारण तुम्ही पोलिसांची धाड खोटी ठरवत आहात,असा प्रश्न केला असता,मी फक्त स्वत:ची बाजू मांडण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतली असून माझा तसा संशय आहे की यात स्थानिक व्यवसायिक,काही पत्रकार व पोलिसांची मिलीभगत असू शकते,ही शंका फक्त मी व्यक्त केली असल्याचे ते म्हणाले.
पोलिसांनी संचालकाला नव्हे तर अशी पार्टी तिथे झाली असेल तर आयोजकांवर कारवाई करावी असे सांगत,माझी नाहक बदनामी करण्यात आली असून आम्ही जी हार्डडिस्क पोलिसांना सोपवली त्याचे रिसायकल व रिमेक न करता रिकव्हर करण्याची आमची मागणी आहे.
या धाडीची उच्चस्तरावर चौकशी करुन दोषींवर त्वरित कारवाई करावी अन्यथा आम्ही न्यायालयात दाद मागू,असा इशारा डॉ.पडाेळे यांनी यावेळी दिला.
………………..




आमचे चॅनल subscribe करा
