

विदर्भ विभाग संयोजक पदाचीही जवाबदारी
नागपूर,ता. ६ ऑक्टोबर: शहरातील युवा नाट््यकर्मी कुणाल गडेकर यांची भारतीय जनता पक्ष्ाच्या सांस्कृतिक प्रकोष्ठ विभागात, महाराष्ट्र प्रदेशच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
याशिवाय कुणाल गडेकर यांचे सांस्कृतिक चळवळीतील काम पाहता त्यांची वैयक्तीकरित्या‘ विदर्भ विभाग संयोजक’ पदी देखील नियुक्ती करण्यात आली आहे.असे पत्र त्यांना भाजपच्या सांस्कृतिक प्रकोष्ठचे संयोजक ॲड.शैलेश गोजमगुंडे यांच्याकडून प्राप्त झाले आहे.
कुणाल यांनी भाजप सांस्कृतिक सेलचे आतापर्यंत तीन वेळा महामंत्री पद भूषवले आहे. शहराच्या सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्यांचे मोलाचे योगदान राहीले आहे. दक्ष्णि मध्य सांस्कृतिक केंद्राच्या समितीमध्ये देखील ते सभासद राहीले आहेत.
त्यांनी स्वत:च्या ‘अंर्तमन’कला संस्थेच्या माध्यमातून अनेक नाटकांची निर्मिती केली आहे. वयाच्या ५ व्या वर्षांपासून बालनाट्य शिबिराच्या माध्यमातून कला क्ष्ेत्रात त्यांचे पर्दापण झाले.गेली तीन दशके सातत्याने त्यांनी शहरातील व विदर्भातील सांस्कृतिक वारसा समृद्ध करण्याचा प्रयत्न केला.
नुकतेच करोना या जागतिक महामारीच्या काळात ही त्यांनी त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून अनेक गरजू कलावंतांना मोलाची मदत केली.आठ महिन्यांपासून बंद पडलेले कलावंतांचे निवृत्ती वेतन मिळवून देण्यात त्यांनी विशेष प्रयत्न केले.
याशिवाय अनेक नवीन कलावंतांना सादरीकरणासाठी त्यांनी मंच उपलब्ध करुन दिला.वेगवेगळ्या संस्थांमध्येही त्यांचे कार्य उल्लेखनीय राहीले आहे.
कुणाल गडेकर यांच्याशिवाय महाराष्ट्रातून सुप्रसिद्ध नाट्यकर्मी लीना भागवत तसेच अभिनेते योगेश सोमण यांची देखील निवड झाली आहे.
आपल्या या यशाचे श्रेय ते केंद्रिय मंत्री नितीन गडकरी,माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष् चंद्रकांत पाटील,माजी शिक्ष् ण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, भाजपचे आमदार व माजी महापौर प्रवीण दटके व समस्त शुभचिंतकांना देतात.




आमचे चॅनल subscribe करा
