फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूज‘काश्‍मीर फाईल्स’मधले शेवटचे दृष्य मुस्लिम लेखकाने लिहले

‘काश्‍मीर फाईल्स’मधले शेवटचे दृष्य मुस्लिम लेखकाने लिहले

Advertisements

अभिनेता पुनीत इस्सार यांची माहिती:‘अनकट’ भाग वेबसीरीजच्या माध्यमातून येऊ शकतो

चित्रपटातील तब्बल ४० दृष्य सेंसर बोर्डने कापले:इतिहासाला स्वीकारण्याचं धाडस हवं

भविष्यातील पिढीने बोध घ्यावा म्हणून नाझींच्या अत्याचाराचे प्रतिक जर्मनीत जतन

बहूसंख्यकांच्या देशात चित्रपट दिग्दर्शकाला ‘वाय’ दर्जाची सुरक्षा हे कशाचे निर्दशक?इस्सार यांचा सवाल

नागपूर,ता.२३ मार्च २०२२ : विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ’काश्‍मीर फाईल्स’हा चित्रपट नसून भारतासारख्या संवैधानिक ‘लोकशाही’ देशात घडलेल्या एका रक्तरंजित इतिहासाची माहिती आहे.आता हा चित्रपट,चित्रपट राहीला नसून भारतीय प्रेक्षकांसाठी एक चळवळ झाली आहे.या चित्रपटातील शेवटचे दृष्य बघून माणसाच्या ह्दयाचा थरकाप उडतो मात्र हे दृष्य लिहणारा लेखक स्वत: हा मुस्लिम धर्मिय असल्याची माहिती सुप्रसिद्ध अभिनेते पुनीत इस्सार यांनी आज सेंटर पॉईंट येथे श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्टतर्फे आयोजित पत्र परिषदेत दिली.याप्रसंगी मंचावर माजी महापौर संदीप जोशी उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना इस्सार म्हणाले,की चार दिवसांपूर्वी मला संदीप जोशी यांचा फोन आला होता.अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत हा चित्रपट पोहोचण्यासाठी या चित्रपटाची नि:शुल्क प्रदर्शन ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.मला ही संकल्पना खूप भावली व मी लगेच त्यांना नागपूरातील या उपक्रमात सहभागी होण्यासाठी होकार कळवला.हा चित्रपट, चित्रपट नसून एक ‘माहितीपट’आहे जो भारतातल्या अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचने अत्यंत गरजेचे आहे.प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट बघायलाच हवा.भूतकाळात नेमके काय घडले याचे ‘भान’ आल्यावरच भविष्यात असा ‘नरसंहार’ पुन्हा घडू शकणार नाही,असे ते म्हणाले.संपूर्ण भारतात या चित्रपटाने सर्वसामान्य लोकांवर एवढा प्रभाव टाकला की,मुंबईत एका रिक्शावाल्याने चित्रपटाचे तिकीट दाखवल्यावर नि:शुल्क सवारी दिली.एका हॉटेलवाल्याने या चित्रपटाचे तिकीट दाखवल्यास नि:शुल्क भोजन देण्याची घोषणा केली.हा आता दिग्दर्शकाचा चित्रपट राहीला नसून जनता-जनार्दनाचा चित्रपट झाला आहे.आपापला ‘धर्म‘बाजूला ठेऊन फक्त ’भारतीय’म्हणून हा चित्रपट बघा,असे आवाहन त्यांनी केले.

१९४७ ला आपला देश स्वतंत्र झाला व १९८४ नंतर आपल्या देशात काय घडले?याबाबत प्रदीर्घ काळ चुप्पी साधून ठेवण्यात आली.या चित्रपटाने एक कटू सत्य जगासमोर मांडले आहे.आता ‘आग लग चूकी है,ये न बुझनेवाली आग है’असे सांगून या चित्रपटाच्या प्रेक्षकांची संख्या व बॉक्स ऑफिसची कमाई ही निरंतर गुणाकार होत आहे,लोकं हा चित्रपट वारंवार बघत आहेत.एकीकडे ‘मोदी’नावाचाही चित्रपटही चालत नाही,मोठमोठे चित्रपट जनताजनार्दन फ्लॉप केले.हा चित्रपट चांगला आहे म्हणूनच चालतो आहे.या चित्रपटात एक ही सुपरस्टार नाही जो प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत खेचून आणेल.चित्रपटाचे दोन प्रकार असतात,एखादा चित्रपट हा मेंदूला स्पर्श करतो तर एखादा चित्रपट ह्दयाला स्पर्श करुन जातो.जे चित्रपट माणसाच्या काळजाला स्पर्श करुन जातात ते सुपरडूपर हिट होतात.‘मदर इंडिया’,गंगा जमुना’,‘शोले’,‘बॉर्डर‘,गदर‘ हे याचे यशस्वी उदाहरण आहे.‘काश्‍मीर फाईल्स’ला फक्त जनताच नव्हे तर देशातील बुद्धिजीवी देखील ‘चार आणि साढे तीन स्टार’ देत आहेत,असे ते म्हणाले.

या चित्रपटाविषयी हा आमचा चित्रपट,तुमचा चित्रपट असे वादग्रस्त विधान केले जात असून स्वत:असीवुद्दीन ओवैसी यांनी चित्रपटातील नरसंहाराचे आकडे दोन ते तीन गुणा चुकीचे व वाढवून दाखवत असल्याचा दावा केला आहे,याबाबत छेडले असता, ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचे सांगून सत्याला लपवल्या जात असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.चित्रपटात दाखवण्यात आलेले आकडे तर सोडा कथानक देखील हिमनगाचे फक्त एक टोक असल्याचे ते म्हणाले,यापेक्षाही भयंकर क्रोर्य काश्‍मीरी पंडितांसोबत घडले आहे.फार मागे कशाला जाता,नुकतेच काश्‍मीरमधील दहशतवाद्यांनी एका शाळेत जाऊन सर्वांचे ओळखपत्र तपासले त्यातील एका हिंदू शिक्ष्ीकेचे व एका सिख शिक्षकाचा शिरच्छेद केला.एक बस मध्य रस्त्यात अडवून बायका मुलांना एका बाजूला उभे करुन ३० ते ५० शिख पुरुष शिख बांधवांनावर गोळ्या झाडल्या.गिरीजा टिक्कू या महिलेवर सतत पाच दिवस बलात्कार झाला व शेवटी आरामशीनमध्ये तिचे गुप्तांग,स्तन व अवयव कापण्यात आले.एकीकडे जर्मनतीत नाझींनी ज्यू लोकांवर जो अनन्वित अत्याचार केला ते लाक्षागृह जतन करुन ठेवण्यात आले,कशासाठी?तर हा इतिहास जर्मनीतील पुढील पिढीने विसरु नये.या इतिहासातून बोध घ्यावा.त्या देशात सर्वच नाझी हे क्रूर नव्हते तरी देखील ७ लाख ज्यूंचा नरसंहार झाला.जर्मन लोकांनी ॲडोल्फ हिटलरचे समर्थन किवा बचाव केला नाही मात्र आपल्या देशात कायम विपरितच घडतं.

म्हणूनच या देशातील मुस्लिम बांधवांनीच आता समोर येऊन काश्‍मीरी पंडितांसोबत काश्‍मीरमध्ये जे काही घडले त्याची उघडपणे निंदा करावी व १९ जानेवारी १९९० मध्ये त्यांच्यासोबत जे काही घडले ते फार-फार चुकीचे होते हे ठासून सांगावे,असे आवाहन इस्सार यांनी केले.माझे स्वत:चे अनेक मित्र हे मुस्लिम समुदायाचे आहे ज्यांनी हा चित्रपट बघून असं मुळीच घडायला नको हवे होते ही आमच्यासाठीही लाजिरवाणी बाब आहे,अशी वेदना व्यक्त केली असल्याचे इस्सार म्हणाले.

काश्‍मीरमधील मज्सिदमधून ऐलान केले जात होते हिंदूची कोणती घरे कोणत्या मुसलमानाना दिली जाईल,हिंदूंच्या घरांवर पत्रके चिपकवली जात होती.धर्मांतर करा,निघून जा नाही तर मरण्यास तयार रहा.आपल्या स्त्रियांना आमच्यासाठी सोडून जा!

या देशाच्या इतिहासात खिलजीचा देखील इतिहास नाही का?ज्यानी नालंदा विद्यापीठाला आग लावली.९० लाख प्राच्य विद्येचे ग्रंथ त्यात भस्म झालेत.इतिहासातच उल्लेख अाहे दोन महिने नालंदा विद्यापीठाची आग विझलीच नाही! ११९३-९७ मोहम्मद घोरीने या देशावर आक्रमण केले ज्याने हिंदूंची मंदिरे नष्ट केली.मोहम्मद गझनीचा तर अफगानिस्तानमध्ये अद्यापही एक खांब उभा आहे ज्यावर ‘दू:खतरे हिंदूस्तान,नीलामे दो दिनार’असे नमूद आहे याचा अर्थ हिंदूस्थानी स्त्रिया या ठिकाणी फक्त दोन टक्यांमध्ये विकली जात होती.अहमदशाह अब्दालीने पंजाब लृटला.त्याच्या दहशतीमुळेच पंजाबमध्ये ’खाता पिता लहोटा,बाकी सब अहमदशाह अब्दाली का’अशी म्हण प्रसिद्ध झाली होती याचा अर्थ जे काही खात पित आणि पेहराव करीत आहोत तेवढंच फक्त आपलं आहे,बाकी सर्व तर अब्दालीच लृटणार आहे. ई.सन १४०० च्या काळात परकीय आक्रमणका-यांनी वारंवार सोमनाथ लृटला,काशी,मथुरा लृटली,नागा साधूंना मंदिरे वाचवण्यासाठी लढा द्यावा लागला.राजस्थानच्या चित्तोडमध्ये तर ३० हजार राजपूतांना यमसदनी धाडण्यात आले.५० ते ७० हजार स्त्रियांनी जौहार केला,आक्रमणका-यांचा हातात पडू नये म्हणून आगित भस्म होऊन जौहार केला.हिंदूवर जिझिया कर लावणारा बादशाह भारतीय चित्रपटात महान,दयाळू दाखवला जातो!अद्यापही छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख ते ’पहाडी चूहा’म्हणून करतात.‘हैदर’चित्रपटात तर महाराणा प्रताप यांनीच मुस्लिमांवरच कसा अत्याचार झाला हे दाखवण्यात आले.तेच आता ‘काश्‍मीर फाईल्स’ला प्रोपोगंडा म्हणतात?’हैदर’चित्रपटात भगवान परशुरामांच्या मार्तंड मंदिराचा उल्लेख ‘शैतान का मकबरा’ असा करण्यात आला असून आता हेच नाव तिथे प्रसिद्ध झाले आहे.चित्रपटांच्या माध्यमातून चुकीचे नेरॅटिव्ह सेट केलेले चालतात मात्र सत्य घटनांवर आधारित चित्रपट त्यांना नको आहेत?

यूट्यूबवर ‘बिट्टा कराटे’याची मुलाखत जाऊन बघा,त्याच्या डोळ्यात काश्‍मीरी पंडितांच्या नृशंस नरसंहाराविषयी थोडी देखील लाज नाही.किती जनांना मारले?या प्रश्‍नावर तो ‘गिनती याद नही’यासारखे उत्तर देतो?यासिन मलिक सारखा दहशतवादी मुलाखतीत सांगतो ‘हो मी वायुसेनेच्या चार कमांडर्सला गोळ्या घालून मारले,त्यांच्यासोबत दोन महिला देखील मेल्या’ त्याच दहशतवाद्याला तत्कालीन केंद्र सरकार लाल गालिचा घालून दिल्लीत बोलावते?जे मानवच नाही ते मानवतेचा व्यवहार करतीलच कसे?असा संताप याप्रसंगी पुनीत इस्सार यांनी व्यक्त केला.

एवढे अनन्वित अत्याचार होऊन देखील काश्‍मीरी पंडितांनी हत्यार उचलले नाहीत.मी स्वत: या देशातील एक शरणार्थी आहे.माझे वडील फक्त १६ वर्षांचे होते तेव्हा त्यांना पाकिस्तान सोडून भारतात यावे लागले.फाळणीच्या काळात पाकिस्तानातून दिल्लीत येणा-या रेल्वेगाड्या मृतांचा खच घेऊनच येत होत्या.अशीच एक रेल्वे पंजाबमध्ये आली तेव्हा हा पंजाबी माणूस पेटून उठला व त्यांनी एका ऐवजी दोन रेल्वे गाड्या मृतांसोबत लोहाेरला पाठवल्या.भारतातून एका ऐवजी दोन गाड्या मृतांचा खच घेऊन परतत असल्याचे बघून पाकिस्तानाचा शरणार्थींसोबतचा हिंसाचार थांबला.शरणार्थींनी आधी बंदूक उचलली नाही तर त्यांना बंदूक उचलण्यास पाकिस्तानने बाध्य केलं.राष्ट्रहीत हे सर्वतोपरीच असलेच पाहिजे,असे इस्सार म्हणाले.

या चित्रपटात एकूण ४० दृष्यांवर सेंसर बोर्डने कात्री लावली याकडे लक्ष वेधले असता,पाच तासांचा हा चित्रपट होता,यातील अनेक दृष्य हे आज जरी कट झाले असले तरी लवकरच ते देखील ‘अनकट’ होतील,कदाचित वेबसिरीजच्या माध्यमातून ते जनते पुढे येईल पण येतील,असे ते म्हणाले.काश्‍मीरी पंडितांसोबतच नव्हे तर डोगरा,पंजाबी,सरदार लोकांसोबत घडलेले भयंकर क्रोर्य हे जगासमोर कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आणल्या जाईल असे त्यांनी सांगितले.

चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना वाय दर्जाची सुरक्षा केंद्र सरकारला पुरवावी लागली,याबाबत विचारले असता हा देश बहूसंख्यकांचा असतानाही हे घडतंय यावरुन कल्पना करा हेच बहूसंख्यांक जेव्हा अल्पसंख्यांक होतील तेव्हा त्यांच्यासोबत काय होईल?असा गर्भित इशारा पुनीत इस्सार यांनी दिला.

मुस्लिम हे जेव्हा कधी बहूसंख्यांक होतील तर ‘जिहाद’छिडणारच आहे.ईराण हे राष्ट्र आधी पर्शियन लोकांचे होते आज ते संपूर्णत:मुस्लिम राष्ट्र झाले आहे.इंडोनेशिया,अफगाण ही राष्ट्रे देखील याचेच ज्वलंत उदारहण आहे.फाळणीच्या वेळी पाकिस्तानात १६ टक्के हिंदू होते आता ही संख्या फक्त २ टक्के असली तरी त्यांचा ही छळच केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.प्रत्येक मुसलमान हा जिहादी नसतोच असे सांगून माझे अनेक मुस्लिम मित्र आहेत ज्यांनी या चित्रपटाची बुद्धिवादी दृष्टिकोणातून समीक्षा केली असल्याची पुश्‍ती त्यांनी जोडली.

‘काश्‍मीर फाईल्स’मधील भूमिकेबाबत विचारणा केली असता,या चित्रपटात मी एका असहाय हरीनारायण नावाच्या डीसीपीची भूमिका वठवली असल्याचे त्यांनी सांगितले.ज्याच्याकडे अधिकार असून देखील तो प्रशासकीय व्यवस्थेमुळे व राजकीय हतबलते पुढे काश्‍मीरी पंडितांचा नृशंस नरसंहार थांबवू शकला नाही मात्र तरी देखील तो ‘पद्श्री’ने सन्मानित होतो!

एका प्रश्‍नाच्या उत्तरात,काश्‍मीरचा जाज्वल्य असा खरा इतिहास सांगणारा देखील चित्रपट नक्कीच येईल,असा अाशावाद त्यांनी व्यक्त केला.आता लोकं धाडस करतील व काल्पनिक व खोट्या इतिहासाऐवजी
खरा इतिहास चित्रपटात मांडतील,असे ते म्हणाले.

भारतीय जनता पक्ष या चित्रपटाला समर्थन देत असल्याकडे लक्ष वेधले असता इस्सार यांनी चक्क मी सिलेक्टीव्ह प्रश्‍नांना उत्तर देणार नसल्याचे सांगितले.

श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टद्वारे माजी महापौर संदीप जोशी यांच्यावतीने नागपूर शहरातील २५००च्या वर प्रेक्षकांना निःशुल्क ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट दाखविण्यात येत आहे,गेल्या तीन दिवसांपासून शहरातील ऑटोचालक संघटना,घर कामगार महिला,स्लम भागातील युवा आदींना नि:शुल्क हा चित्रपट दाखवण्यात आला असून ट्रस्टने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आता या चित्रपटाचे १४ शो नि:शुल्क दाखवले जात आहे लवकरच ही संख्या २० पर्यंतही जाऊ शकेल अशी अाशा या प्रसंगी संदीप जोशी यांनी व्यक्त केली.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या