फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशकाश्‍मीरमध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला

काश्‍मीरमध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला

Advertisements

धर्म विचारुन केला गोळीबार: २६ जणांचा मृत्यू:२० पर्यटक जखमी

(छायाचित्र: नवदाम्पत्य पहलगामला गेले होते,पतीचा गोळीबारात मृत्यू झाला,पत्नी स्तब्धतेने शून्यात हरवली)

दिनांक २२ एप्रिल २०२५: ‘धरतीवरचा स्वर्ग’ असा ज्याचा उल्लेख केला जातो ती धरती पुन्हा एकदा दहशतावादांनी निरपराध मनुष्याच्या रक्ताने रक्तरंजित केली.जम्मू-काश्‍मीरमधील पहलगाम येथील बैसरन खो-यात किमान दहा ते पंधरा दहशतवाद्यांनी आज मंगळवार दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी, निष्पाप पर्यटकांना त्यांचा धर्म विचारुन गोळ्या घातल्या.ही घटना दुपारी अडीच ते तीन वाजताच्या सुमारास घडली असून अंदाजे पंधरा मिनिटे दहशतीचा हा थरारा निरपराध पर्यटकांनी अनुभवला.या दहशतवादी हल्ल्यात २२ भारतीय पर्यटक,२ विदेशी पर्यटक आणि २ स्थानिक नागरिक असे २६ जण ठार झाले.या भ्याड हल्ल्यात २० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.सन २०१९ मधील पुलवामा हल्ल्यानंतरचा हा सर्वात घातक हल्ला मानला जात आहे.या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून तातडीने भारतात परतण्यास निघाले.

गृहमंत्री अमित शहा व परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर हे काश्‍मीरमध्ये घटनास्थळी जाण्यास निघाले असून पंतप्रधान मोदी यांनी तातडीने उद्या बुधवार दिनांक २३ एप्रिल रोजी मंत्री मंडळाची उच्च स्तरीय बैठक बोलावली आहे.अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी.व्हान्स भारत दौ-यावर असताना आणि काश्‍मीरमध्ये उन्हाळ्याच्या सुटीच्या निमित्ताने पर्यटनाचा हंगाम असताना दहशतवाद्यांनी पर्यटकांना बंदूकीने लक्ष्य केले.रिसॉर्टचे शहर असलेल्या पहलगामपासून सुमारे ६ किलोमीटर अंतरावर असलेले बैसरन हे विस्तृत गवताळ पठार असून घनदाट पाइनची जंगले आणि पर्वतांनी वेढलेले निसर्गरम्य स्थळ आहे.‘मिनी स्वीत्झरलँड’अशी ओळख असलेले हे ठिकाण देशासह जगभरातील पर्यटकांसाठी आकषर्णाचे ठिकाण आहे.

या परिसरात पायी किवा खेचरावर बसूनच प्रवास करने शक्य आहे.दुपारी तीनच्या सुमारास सशस्त्र दहशतवादी या ठिकाणी आले व खाद्य पदार्थांचा आस्वाद घेणा-या,खेचरावर प्रवास करणा-या तसेच निवांत बसून निसर्गाचा आनंद लृटणा-या पर्यटकांवर अंधाधूंध गोळीबार त्यांनी सुरु केला,असे अधिकारी व प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

काश्‍मीर खो-यात पर्यटकांवर हल्ला होणारी ही दूर्मिळ घटना असून,या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला तर २० च्या वर पर्यटक जखमी झाले.पर्यटकांवर हल्ला झाल्याचे वृत्त देशभर पसरताच जम्मू-काश्‍मीरला पर्यटनासाठी गेलेल्यांचे कूटूंबियांना जबर धक्का बसला.त्यांनी आपापल्या आप्त-स्वकियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र,सर्वदूर प्रेतांचा खच व रक्तबंबाळ झालेली पहलगामची धरणी,जिवंत संवेदनांना स्तब्ध करुन गेली होती.रात्री उशिरापर्यंत जखमी व मृतांचा नेमका आकडा समजला नव्हता.या भ्याड हल्ल्याची जबाबदारी ‘द रेझिस्टन्स फ्रंट’(टीआरएफ)या दहशतवादी गटाने स्वीकारली असून बंदी घातलेल्या लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेतर्गंत हा गट काम करतो.

अमित शहा श्रीनगरमध्ये-
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंगळवारी तातडीने श्रीनगरला पाेहोचले.त्यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली.बैठकीला नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाही उपस्थित होते.हा हल्ला घडविणा-यांना साेडणार नाही,असा इशारा त्यांनी दिला.

दहशतवाद्यांना सोडणार नाही:पंतप्रधान नरेंद्र मोदी
आम्ही दहशतवाद्यांना सोडणार नाही.त्यांचे कुटील मनसुबे कधीही तडीस जाणार नाहीत.दहशतवादाविरोधात लढण्याचा आमचा निर्धार अढळ आहे आणि उलट तो आणखी दृढ होईल.

दहशतवादी पशू,अमानवी-ओमर अब्दुल्लाह(मुख्यमंत्री,जम्मू-काश्‍मीर)
दहशतवादी पशू,अमानवी असून,त्यांचा निषेध करावा तेवढा कमीच आहे.गेल्या काही वर्षातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे.या हल्ल्यामुळे मला तीव्र धक्का बसला.

काय घडले?
-पहलगामपासून ६ किमीवर असलेल्या बैसरन या ‘मिनी स्वीत्झरलँड‘अशी ओळख असलेल्या गवताळ प्रदेशात पर्यटक आनंद घेत असतानाच,मंगळवारी दूपारी ३ वाजता दहशतवादी हल्ला झाला.
-या भागात केवळ पायी किवा खेचरावरुन जाता येते
-हे दहशतवादी दक्ष्ण काश्‍मीरातील कोकरनाग मार्गे जम्मूतील किश्‍तवाडमधून बैसरनला पोहोचले असावेत,असा अंदात व्यक्त केला जात आहे.
-दहशवाद्यांनी पर्यटकांना आधी त्यांची नावे व धर्म विचारला,कलमा सांगायला लावला,यानंतर त्यांना गोळ्या घातल्या!
………………………………

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या