फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमकारणे दाखवा नोटीस म्हणजे कारवाई आहे का?

कारणे दाखवा नोटीस म्हणजे कारवाई आहे का?

Advertisements

(मारहाण कशी झाली याचे प्रात्यक्ष्कि दाखवताना लकडगंज पोलीस ठाण्यातील पोलीसकर्मी:अंकिता शाह यांनी हे देखील सीसीटीव्ही फूटेज आयोगासमाेर केले सादर)

ॲड.अंकिता शाह यांची मानवाधिकार आयोगासमोर सुनावणी

नागपूर,ता. २८ ऑक्टोबर: बहूचर्चित लकडगंज पोलीस ठाण्यातील ॲड.अंकिता शाह मारहाण प्रकरणाची काल दि. २७ ऑक्टोबर २०२० रोजी मुंबई येथे मानवाधिकार आयोगासमाेर पहीली सुनावणी पार पडली.यात आपली बाजू मांडताना ॲड.शाह यांनी गेल्या २१७ दिवसांपासून माझी न्यायासाठी लढाई सुरु आहे मात्र पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून मला फक्त हेच उत्तर मिळाले की दोषींना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे,सोबत ५०० आणि हजार रुपयांचा आर्थिक दंड ही ठोठावण्यात आला आहे,माझ्या नजरेत कारणे दाखवा नोटीस म्हणजे हा ‘न्याय’होऊ शकत नाही, दोषींवर कारवाई करण्यात यावी एवढीच माझी मागणी आहे.

माध्यमांना दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात उल्लेख केल्या प्रमाणे पोलिस उपायुक्त नवीनचंद्र यांनी आयोगासमोर पोलीसांतर्फे बाजू मांडली मात्र ते नवनियुक्त पोलीस अधिकारी असल्यामुळे त्यांना या संपूर्ण प्रकरणाविषयी माहिती नसल्याने आयोगाने नाराजी व्यक्त करीत पुढील सुनावणीत या प्रकरणाबद्दल ज्यांना संपूर्ण माहिती आहे त्यांनी बाजू मांडण्यास यावे,असे निर्देश दिले.नवीनचंद्र यांनी आयोगाला सादर केलेल्या तपशीलात देखील हेच नमूद आहे की दोषी वरीष्ठ पोलीस निरीक्ष् क नरेंद्र हिवरे तसेच इतरांवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. २५ मार्च रोजी माझ्यासोबत अमानवीय घटना घडली.

मी फक्त आमच्या इमारतीमधील युवकाची तक्रार देण्यास लकडगंज पोलीस ठाण्यात पाहोचले होते मात्र तिथे मला चार पोलीसांनी घेरुन उगाचच मारहाण केली,माझ्या पतीला देखील बाहेरील गेट समोरुन ओढत आत अाण्यात आले.आम्ही गुंड किवा अपराधी नव्हतो.या समाजातील सुशिक्ष्ति माणसे आहोत. लॉक डाऊनच्या काळात उपाशी श्‍वाशांना अन्न व पाणी देण्यासारख्या सामाजिक उपक्रमामध्ये इमारतीलमधील इसमाने वारंवार अडथळा आणला व लाथेने श्‍वानांचे अन्न व पाणी फेकून दिले. त्याविरोधात तक्रार देण्यासाठी लकडगंज पोलीस ठाण्यात गेले असता तिथे पोलीस उपनिरीक्ष् क भावेश कावरे यांनी वाद घालत अमानुष मारहाण सुरु केली.

या विरोधात तब्बल तीन महिन्यांनी मला कायदेशीर मार्गाने अपील केल्यानंतर सीसीटीव्ही फूटेज प्राप्त झाले.‘न्यायाला उशिर म्हणजे न्याय नाकारणे’सारखाच हा प्रकार आहे.माजी पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांनी या प्रकरणावर कोणतीही कारवाई केली नाही. तातडीने दोषींवर कारवाई करणे हे त्यांचे नैतिक कर्तव्य होते,मात्र असे घडले नाही.त्यांनीच दोषींविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश द्यायला हवे होते,असे माझे वैयक्तिक मत आहे.

एखाद्या सामान्य माणसाने पोलिसांवर हात उगारला तर तातडीने कारवाई होते,पण पोलिसांनी सामान्य माणसावर उगाचच खाकी वर्दीचा रुबाब दाखवण्यासाठी मारहाण केली तर २१७ दिवस उलटल्यानंतर ही कोणतीच कारवाई होत नाही?किंवा फक्त नोटीस किवा दंड दिला जातो?नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यातर्फे सादर झालेल्या उत्तरात ‘अद्याप चौकशी सुरु आहे’असे नमूद करण्यात आले आहे,परिणामी मला आता त्यांच्याकडूनच न्यायाची अपेक्ष्ा आहे.चौकशी पूर्ण झाल्यावर त्यांनी दोषींवर तातडीने कारवाई करावी,थातूरमातूर ५०० व हजार रुपयांचा दंड म्हणजे कारवाई होत नाही,हा ‘न्याय’देखील नाही.पोलीस आयुक्तांनी ज्येष्ठ पोलीस निरीक्ष् क नरेंद्र हिवरे यांना फक्त समज दिली आहे या पुढे अश्‍या घटना घडू नये,मात्र सामान्य माणसाने पोलिसांवर हात उगारला असता तर पोलीस आयुक्तांनी असाच समज दिला असता का?असा प्रश्‍न ॲड.शाह यांनी आपली बाजू मांडताना उपस्थित केला.

या संपूर्ण घटनेच्या चौकशीच्या अहवालात लकडगंज पोलीस ठाण्यातील सहायक पोलिस आयुक्त भालचंद्र मुंढे यांनी आयुक्तांना सोपवलेल्या अहवालात ज्येष्ठ पोलीस निरीक्ष् क नरेंद्र हिवरे यांचा स्वभाव हा आक्रमकच असल्याचे नमूद केले असून या पूर्वी देखील त्यांच्यामुळे पोलीस ठाण्यात वाद निर्माण झाले असल्याचे नमूद करुन या घटनेमुळे संपूर्ण राज्यात पोलीसांची प्रतिमाच खराब झाली असल्याचे नमूद केले आहे.

मग ज्या घटनेमुळे संपूर्ण राज्यात पोलिसांची प्रतिमा खराब झाली त्या घटनेचे गांर्भीर्य लक्षात घेऊन दोषींवर कठोर कारवाई करुन सामान्य लोकांपुढे नैतिक आदर्श पोलीस अायुक्तांनी का निर्माण नाही केला?त्यांनी कारवाई करण्याऐवजी फक्त ‘समज’ दिली!इतकी कमी शिक्षा हा न्याय होऊ शकत नाही.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या घटनेतील नवीन पुरावे समोर आल्याचे मान्य करुन पोलीस उपायुक्त परिमंडळ क्र.३ तर्फे  चौकशी सुरु असल्याचे नमूद केले आहे.आता या नवुनी पुराव्यांच्या आधारावर पोलीस आयुक्त मला न्याय मिळवून देतील अशी आशा मी व्यक्त करते.

नवीन पोलीस आयुक्त हे जेव्हा पण रुजू होतात तेव्हा ते शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात भेट देऊन पोलीसांनी फिर्याद देण्यासाठी आलेल्या नागरिकांसोबत कश्‍याप्रकारे ‘सौजन्याने’वागावे अशी शिकवण देत असतात.पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी देखील असे निर्देश सर्व पोलीस ठाण्यातील पोलीसकर्मींना दिले असताना,लकडगंज पोलीस ठाण्यातील दोषी पोलीसकर्मींनी पोलीस आयुक्तांच्याच दिशानिर्देशांचे पालन केले नसल्याकडे ॲड.शाह यांनी लक्ष् वेधले.पोलीस विभागाचे ब्रिद वाक्यच आहे ‘दूर्जनांचे र्निदालन सज्जनांचे रक्ष् ण’मात्र माझ्यासोबत घडलेल्या घटनेतून लकडगंज पोलिस विभागातील पोलीसकर्मींनी या ब्रिद वाक्याच्या विरोधी वर्तन केल्याचा आरोप ॲड.शाह यांनी केला.

न्याय न मिळाल्यास मी लवकरच न्यायालयात दाद मागील,ही माझ्या आत्मसन्मानाची लढाई असून ही घटना घडल्यानंतर तब्बल तीन महिने सीसीटीव्ही फूटेज मिळेपर्यंत मी व माझ्या पतीने खूप अपमानजनक असे आंतरिक आयुष्य सोसले आहे,परिणामी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी १२ ऑक्टोबर रोजी दोषींवर जी काही कारवाई केली त्यातून मी समाधानी नाही.जोपर्यंत दोषींवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत ही न्यायाची लढाई माझी न्यायालयामार्फत देखील सुरु राहील,असे ॲड.अंकिता शाह यांनी पत्रकात नमूद केले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या