फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजकाऊंटरवर खेळ चाले.....

काऊंटरवर खेळ चाले…..

Advertisements

खासगी रुग्णालये सावध:काऊंटरवरच स्वत:च्या फोनने करुन देतात बालणे!

ऑडिटरच सांगतो’यांचं काही होणार नाही वरपर्यंत पोहच आहे!‘

फक्त सव्वा दाेन हजारसाठीही घेतले लिहून: पैसे पूर्ण भरल्यावरच मृतवत रुग्ण वोक्हार्टने सोपवला

मनपा प्रशासन, सत्ताधा-यांवर नागपूरकरांचा रोष

डॉ.ममता खांडेकर
(Senior journalist)

नागपूर,ता. ९ जून: ज्या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वैज्ञानकि आणि औद्योगिक संशोधन परिषदेची(सीएसआयआर) बैठकीत भारज आज सॉफ्टवेअरपासून उपग्रहांपर्यंत सर्वच क्ष्ेत्रात वेगाने प्रगती आणि जगाच्या प्रगतीचे ‘इंजिन’म्हणून काम करीत असल्याचे सांगत होते अगदी त्याच दिवशी प्रगत व पुरोगामी महाराष्ट्राच्या उपराजधानीत नागपूरात गांधीनगर येथील खासगी वोक्हार्ट रुग्णालयासमोर एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस अंगातले कपडे काढत होता,माझ्याजवळ आता रुग्णालयाचे पैसे भरण्यासाठी पैसेच नाही तुम्ही मला गहाण टाका,विका काहीही करा पण आमच्या रुग्णाला डिर्स्चाज करा,असा टाहो फोडत होता!

या माणसाचे सासरे प्रदीप कृष्णराव पुसदेकर वय वर्षे ६१ मूळचे अंजनगार्वसूर्जी परतवाडा येथील निवृत्त जिल्हा परिषद शाळेचे प्राचार्य यांना करोनाचे निदान झाल्यामुळे २ जून रेजी परतवाड्यातील डॉक्टरांनी रेमडिसिव्हिरचे पहीले इंजेक्शन लावले आणि इंजेक्शन घेतल्यानंतर दीड तासात त्यांची तब्ब्येत बिघडली.नागपूरातील वोक्हार्टमध्ये या पूर्वी त्यांच्यावर फूफ्फूसावरील उपचार झाले असल्याने आपली संपूर्ण केस-हिस्ट्री या रुग्णालयातील डॉक्टरांना माहीती असल्याने याच रुग्णालयात त्यांना भरती करण्यासाठी परतवाडा ते नागपूर २० हजार रुपये मोजून रुग्णवाहिकेने नागपूरात आणण्यात आले.मातृ छाया रुग्णालयाचे डॉ.कौस्तुभ पाटील यांनी प्रदीप पुसदेकर यांना आधीच गंभीर व्याधी असतानाही रेमडिस्विहर इंजेक्शन दिल्याने शेवटी त्यांची प्रकृती गंभीर झाली व त्यांना नागपूरात खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले.

रुग्णवाहीकेतून वोक्हार्टमध्ये भर्ती होण्यापूर्वी बस…त्यांच्या अवघ्या २२ वर्षीय अभियांत्रिकीच्या पहील्या वर्षात शिकणा-या मुलाने ज्याला स्वत:ला करोना संसर्ग झाला होता शुद्धिवर शेवटचे पाहीले! ३ जून रोजी वोक्हार्टमध्ये त्यांना ऑक्सीजन लावण्यात आले तर ४ जून रोजी वेंटिलेटरवर टाकले.सुरवातीलाच या रुग्णाच्या जावयाने काऊंटरवर ७५ हजार रुपयांची मागणी असताना ६५ हजार रुपये भरले कारण त्यांच्याजवळ पैसे नव्हते.उद्यापर्यंत उर्वरित रक्कम जमा करतो असे आश्‍वासन दिले.

यानंतर ‘काऊंटरवरुन’फक्त फोन येत राहीले ते ही दिवसातून ५ ते ७ वेळा! ५ जूनपर्यंत त्यांनी एक लाख ऐंशी हजारपर्यंत रक्कम वोक्हार्टमध्ये भरले.याच दिवशी सासरेबुवांच्या औषधांचे बिल पाठवले ३४ हजार रुपयांचे.लगेच ६ जून रोजी औषधांची रक्कम थकीत धरुन बिल काढले सव्वा लाख रुपये!

एवढ्या मोठ्या रकमेची तरतूद करण्याची क्ष् मता त्या अवघ्या २२ वर्षीय तरुणामध्ये नव्हतीच.दररोजचे बिल वोक्हार्ट काढत होते सव्वा लाख रुपये!परतवाडा येथे या तरुणाची आई,बहीण व आजी या देखील करोना बाधित होत्या.आईंवर परतवाडा येथील रुग्णालयातच उपचार सुरु होते.एवढे बिल भरण्यास आम्ही सर्वथा असमर्थ आहोत तुम्ही फक्त आम्हाला आमच्या रुग्णाची कंडिशन सांगा अशी विनवणी या माणसाने रुग्णालयाच्या काऊंटरवरील कर्मचा-याकडे केली.

एवढ्या मोठ्या रुग्णालयातील एक ही कंसल्टंट,एचआर,डॉक्टर,ऑडिटर कोणीही भेटायला तयार नाही.शुक्रवारी संध्याकाळी पुन्हा ७० हजार रुपये जमा करण्यास सांगितले!हा माणूस फक्त दूपारी ३ वाजेपर्यंत ३० हजार रुपये जमा करु शकलेत.मी स्वत: अमरावतीला जातो आणि पैश्‍यांची व्यवस्था करतो रात्री ८ पर्यंत उर्वरित पैसे भरतो असे सांगितले असता..तुमचे बिल रात्री ८ पर्यंत वाढतच राहील….जोपर्यंत तुमचा रुग्ण रुग्णालयात आहे त्या क्ष् णापर्यंचे बिल भरावे लागेल….रुग्णालयाचा व्यवहार…!

६ दिवसांचे वोक्हार्ट रुग्णालयांनी तीन लाख,नऊशे सत्ताचाळीस रुपये,तैतीस पैसे एवढे बिल काढले!३५ हजार रुपये फक्त सीटी-स्कॅनचे बिल होते!वेगवेगळे तज्ज्ञ राऊंडवर यायचे व ‘काऊंटरवरुन’रकमेबाबत त्यांच्या सूचना फॉरवर्ड व्हायचा.या माणसाने अक्ष् रश:रुग्णालयाची गयावया केली,आमच्या रुग्णाला सुटी द्या,आता आमची परिस्थिती नाही.आमचा रुग्ण ज्या परिस्थितीत आहे तसाच आम्ही अमरावतीला घेऊन जातो!यावर तुमच्या रुग्णाची स्थिती गंभीर आहे हलवू शकत नाही,असे उत्तर मिळायचे.

एका सुरक्ष्ा रक्ष् काने सल्ला दिला मोठ्या वोक्हार्टमध्ये जा तिथे एचआरला सांगा मात्र आतमध्ये जाऊच दिले नाही. त्याच्याच सल्ल्याने डॉ.जायसवाल यांना भेटायला शुअरटेक गाठले.तेथील परिचारिकेने तुमचा रुग्ण आमच्या येथे भर्ती आहे का विचारले.डॉ.जायसवाल यांचा फक्त रविवारीच राऊंड असतो असे तिने सांगताच या माणसाने माझे फक्त दोन मिनिटे त्यांच्याशी बोलणे करुन द्या अशी गयावया केली मात्र या ही रुग्णालयाच्या काऊंअरवर ना डॉक्टरचा नंबर दिला गेला ना भेटू दिले.शेवटी या माणसाने आपला नंबर काऊंटरवर दिला, माझ्याशी कृपया बोलायला सांगा म्हणून हताश मनाने शुअरटेक सोडले मात्र डॉ.जायसवाल यांचा फोन या माणसाला आलाच नाही….!कसा येणार हा माणूस म्हणजे कोणी ‘खासदार’नव्हता ना,ना कोणी लोकप्रतिनिधी…..!

या रुग्णालयाचे काऊंटर म्हणजे सुरक्ष्ा रक्ष् काची खोली ज्यात एक फक्त लहानशी खिडकी आहे.त्या खिडकीतूनच बिल भरण्याचा तकादा लावला जातो.शनिवारी स्पष्टपणे काऊंटरवर सांगितले,पैसे नाहीत रुग्णाला डिस्जार्ज करा,दररोजचे सव्वा लाख रुपये आम्ही नाही भरु शकत.यावर एचआर विभागातील महिला सांगते ’पैसे नाही भरले तर आम्ही रुग्णाचे औषधोपचार बंद करु!’(देशाचा कायदा रुग्णावरील उपचाराबाबत काय सांगतो?)एकूण ३ लाखांचे बिल या माणसाच्या डोक्यावर वोक्हार्टने काढले,यापैकी आधीच त्यांनी १ लाख ५२ हजार भरले होते.एवढं बिल!तुम्ही आधी का सांगितलं नाही दररोजचा सव्वा लाख रुपये खर्च येणार?

उत्तर मिळालं,येथे एवढे काेविड रुग्ण भर्ती आहेत प्रत्येकाल सांगायला एवढा वेळ आमच्याजवळ नाही!’आयुष्याची कमाई देऊन टाकली,कर्जबाजारी झालो आहोत आता पुन्हा १ लाख ५२ हजार रुपये कोणाला मागू?त्या महिलने अंबाझरी पोलिस ठाण्यात फोन लावला…दोन मिनिटात पोलिसांचा ताफा हजर…!

हा माणूस अंगावरचे कपडे काढतोय…पैसे भरत नाही…पीआय तिच्यावरच आेरडली…तुमचे हे नेहमीचेच झाले…हा एक साधा माणूस आणि हा २२ वर्षाचा मुलगा तुमचे हातपाय जोडतात आणि तुम्ही हे राडा करतात म्हणून तक्रार करता?या माणसाने पीआयला सांगितलं यांची फॉर्मेसी आतच आहे,खरंच एवढ्या हजारांची औषधे लावली का?वेंटिलेटरवरच आमच्या रुग्णाला ठेवलं आहे का?कसं कळणार?एकाही विश्‍वस्ताशी बोलू देत नाही,जेव्हापासून पैसे देणे बंद केले ७-७ विश्‍वस्त आज बघा साक्ष्ात समाेर उभे झाले!
खरंच खूप चूक झाली.वोक्हार्टवर भरवसा ठेवला.‘आपले नेहमीचे खात्रीचे रुग्णालय’समजून रुग्णाला नागपूरला आणले.याच वेळी…पुसद मधली एक विवाहिता ही टाहो फोडत होती.तिच्या नव-याचा मृत्यू वोक्हार्टमध्ये झाला होता.आपल्या २ लहान- लहान भावंडांना घेऊन ती पतीचे शव घेण्यासाठी सकाळी ९ वा.पासून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत तिथेच घुटमळत होती..शेवटी ५.३० वाजता मनपाची काही माणसे तिथे आली आणि……!

पीआयला या माणसाने सांगितले माझी ऐपत १ लाख ५२ हजार रुपये भरण्याची नाही.माझ्याजवळ फक्त ३५ हजार रुपये आहेत ते ही मला रुग्णवाहीकेने रुग्णाला पुन्हा अमरावतीला न्यायचे आहे.मी म्हणूनच कपडे काढून देत होतो.मला नागडा करा,बाजारात विका मात्र आमच्या रुग्णाला डिर्स्चार्ज करा.ना मी शिविगाळ केली ना काही बोललो!

मात्र तरीही पूर्ण पैसे भरल्यावरच काऊंटरवरुन अंतिम बिले मिळाली.तुमच्या रुग्णाची १२ हजार रुपयांची औषधे उरली तेवढी रक्कम कमी करुन देतो असे सांगत तेवढे पैसे कमी केले.(मृत्यूनंतर कफनसाठी ठेवावे जणू पैसे तसे)अमरावतीला रुग्णाला घेऊन जाण्यास पुन्हा २५ हजार रुपयांची रुग्णवाहिका केली.४५ हजार रुपये फक्त रुग्णावाहिकेतच जाण्यायेण्यात गेले. तेथील सुपर हॉस्पीटलने सांगितले फक्त १० टक्के शक्यता आहे वाचण्याची….शेवटी मध्यरात्री सासरेबुवा यांनी जगाचा निरोप घेतला…त्यांच्या पत्नीला त्यांच्या ३५ वर्षांच्या सौंसारानंतरही आयुष्याच्या जोडीदाराचे अंतिम दर्शन नाही घेता आले..परतवाड्यातील डॉक्टरांनी सांगितले,तुम्ही करोना पॉझिटीव्ह आहात..जबरदस्ती गेलात तर पोलिसांना कळवू…..!

सासरेबुवा हे निवृत्त प्राचार्य होते.एक मुलगी १० वीत शिकतेय तर २२ वर्षीय मुलगा अभियांत्रिकीच्या पहील्याच वर्षात आहे.वोक्हार्टने ज्या साढे चार लाख रुपयांची लृट फक्त ६ दिवसांच्या उपचारासाठी केली तेवढ्या पैशात कदाचित पुढेमागे मुलीचे लग्न झाले असते,त्या विद्यार्थ्याचे शिक्ष् ण पूर्ण झाले असते,विलास उजदेकर हे पेंशनधारक होते,फक्त पेंशनवर घर चालायचं मात्र तो ही पैसा या पूर्वीच त्यांच्याच उपचारांवरच खर्च झाला होता…!

वोक्हार्टने आधीच सांगितलं असतं दररोज एवढा खर्च होणार आहे तर साढे चार लाख रुपयांचा कर्जाचा डोंगर अवघ्या २२ वर्षाच्या मुलाच्या डोक्यावर नसता चढला.काऊंटरवर एका ही डॉक्टरचा फोन नंबर मिळत नाही,आम्हाला आमच्या रुग्णाविषयी कोणतीही माहिती त्यामुळे मिळाली नाही,आम्हाला डॉक्टर्स मंडळीसोबत व्हॉट्स ॲप चॅटिंग नसते खेळायचे असते.आमचा रुग्ण बरा करुन दिला असता तर घर ही विकलं असतं….फक्त बिलांमध्ये लिहलं हे इंजेक्शन्स दिले….पुरावा काय?

त्यांनी लृटावं….आम्ही फक्त रडावं…..!

कुठे आहे नागपूर महानगरपालिकेचे प्रशासन,ऑडिटर्स,सत्ताधारी?शेवटी या शहरातील खासगी रुग्णालये कोणाच्या भरवश्‍यावर एवढी मुजोर झाली…या माणसाचा एक ‘सारगर्भित‘प्रश्‍न!

………………..

स्थळ मानकापूर येथील अलॅक्सीस रुग्णालय-
तिचा ३९ वर्षीय पती या रुग्णालयात ११ मे रोजी करोनामुळे भर्ती झाला.आधीच ‘काऊंटरवर’सर्वच प्रकारच्या कागदपत्रांवर सह्या घेण्यात आल्या.मग काऊंटरचे काम उरले फक्त ‘फोन,पेमेंट आणि स्वाक्षरी’….११ मे रोजी भर्ती झालेल्या या रुग्णाला काल ७ जून रोजी रात्री ११ वाजता सुटी मिळाली ते ही ऑक्सीजनसहित!अद्याप घरी या रुग्णाला ऑक्सीजन सिलेंडरच लागले आहे.या रुग्णालयानी बिल काढले ४ लाख ९० हजार रुपये!

अडीच लाख रुपये भरल्यानंतर या रुग्णालयाचा पैशांचा संपूर्ण व्यवहार बघणारे अब्दूल कादीर म्हणाले ‘तुम्हाला या रुग्णालयाचा खर्च झेपणार नाही,आम्हाला बेड खाली करुन हवा आहे तुमचा पेशंट हलवा,उरलेले २ लाख रुपये भरुन टाका’३१ मे रोजी त्यांची ही ‘मानवीय‘सूचना होती!

काल सकाळी १२ वाजता रुग्णाला हलवायचे होते मात्र अलॅक्सीसने बिलांची संपूर्ण औपचारिकता पूर्ण करण्यासाठी सायंकाळचे ६ वाजवले.तोपर्यंत मॅनेजमेंटचा एक ही जवाबदार व्यक्ती रुग्णालयात हजर नव्हता.ऑडिटरसोबत बोलले असता ‘हे आमचेच ऐकत नाही,याचं काही होणार नाही,वर पर्यंत पोहोच आहे!‘तुम्हीच कागदपत्रांवर सही केली आहे त्यामुळे याचं कोणीही वाकडं करु शकत नाही….!न्यायालयसुद्धा नाही…..!करोना काळात काय जबरदस्त ‘युती’ झाली आहे नागपूर महानगरपालिकेच्या प्रशासनाची,सत्ताधा-यांची आणि…खासगी रुग्णालयांची…..!सामान्यांचा वाली कोण?दहन घाटातील कर्मचारी?

रात्रीचे ९.३० वाजले,२८ दिवस घरापासून दूर राहीलेल्या या रुग्णाला घरी जाण्याची ओढ होती,रुग्णाची पत्नी हिला ही हूरहूर लागली होती,काहीही झाले तरी आज पतीला घरी न्यायचेच.रुग्णाला ऑक्सीजन सिलेंडर लावणारा व्यक्ती हा देखील बाहेर सायंकाळी ७ वाजतापासून तातकळत उभा होता.रात्री ८.३० वाजता ही बिलांचे ऑडिट झाले नव्हते.शेवटचे २ हजार २०९ रुपये भरण्यासाठी कमी पडले होते.

या २ हजार २०९ रुपयांसाठी अलेक्सीस हॉस्पीटलने आधारकार्ड मेलवर घेऊन लिखितमध्ये लिहून घेतले एवढे पैसे शिल्लक आहेत व तुम्ही उद्या मंगळवार ८ जून रोजी येऊन भरणार आहात…..!४ लाख ८० हजार पैकी फक्त २ हजार २०९ रुपये शिल्लक होते तरी देखील बिलाचे ऑडिट काल अलेक्सीसने केले नाही,आज मंगळवारी हे २ हजार २०९ रुपये जमा केल्यानंतर ऑडिट करुन दिले.

रात्री ११ वा.पर्यंत आपल्या रुग्णाला सुटी मिळावी म्हणून काऊंटरवर तातकळत उभे असणारे रुग्णाची पत्नी,पत्नीचा भाऊ,काका,यांचा धीर सुटत चालला होता.काेणाशी तरी बोलणे करुन द्या…वारंवार विनंती केल्यावर काऊंटरवरील कर्मचा-याने स्वत:च्या फोनवरुन बोलणे करुन देण्याचे मान्य केले(विम्स हॉस्पीटलचे संचालक डॉ.राजेश सिंघानिया यांचा कॉल रेकॉर्ड झाल्यावर शहरातील इतर रुग्णालये झाली सावध)माजी महापौर संदीप जोशी यांचाही फोन या रुग्णालयात ऑडिटरला आला असल्याचे सांगितले गेले मात्र फक्त २ हजार २०९ रुपयांसाठी ना रुग्णाला वेळेवर सोडले ना बिलाचे ऑडिट करुन दिले.ना फाईल,ना बिल ना बिलांवर स्टॅम्प…..!

शेवटी गोंधळ उडालाच…..काऊंटरवर लिखितमध्ये लिहून घेतल्याशिवाय रुग्णाला सोडलेच नव्हते…ते ही ४ लाख ७० हजार रुपये बिलातील त्या वेळी रात्री फक्त २ हजार २०९ रुपये कोणाजवळही नव्हते म्हणून…..!
आणि…पंतप्रधान म्हणतात‘पुढील दशकांतील गरजांसाठी सज्ज रहा….!

गेल्या ७० वर्षात रुग्णालयांचे खासगीकरण झालेच नसते तर……संपूर्ण देशात किमान अारोग्य व्यवस्था तरी पूर्णत: शासकीयस्तरावरच राहीली असती तर…..!खासगी व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून खरंच ‘डॉक्टर’बाहेर पडला की संधीसाधू‘बिजनेसमॅन’?आता तरी देशात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची व शासकीय रुग्णालयांची संख्या पंतप्रधान वाढवणार आहेत का?की शहरातील व ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला या खासगी रुग्णालयांच्या ‘काऊंटरवर’जीवघेणा मनस्ताप व दु:खाच्या अधीनच सोडणार आहेत?७० वर्षात जी मूलभूत आरोग्य व्यवस्था काँग्रेसने दूर्लक्ष्ि ली तेच मोदी करणार आहेत का?शतकाच्या या महाभयंकर महामारीच्या तडाख्यात सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांना सर्वस्वी भ्रष्ट अश्‍या महानगरपालिकेच्या ‘भरवश्‍यावर’या देशातील केंद्र सरकार व राज्य सरकार आणखी किती दशके सोडणार आहेत…..?

हा प्रश्‍न वोक्हार्टसमाेर कपडे काढणारा तो लाचार माणूस आणि अलॅक्सीसच्या काऊंटरवर घुटमळणारी ती पत्नी आज व्यवस्थेला विचारत होते….!

आज खासगी रुग्णालयांप्रति जनतेच्या मनातली प्रतिष्ठा आणि डॉक्टर्सविषयी असणारी मनातली श्रद्धा आणि विश्‍वास पार संपुष्टात आली आहे……..शतकाच्या या महामारीने ‘डॉक्टर‘या समुदायावरच कायमची अविश्‍वासाची जी फूली मारली आहे त्याचे आत्मचिंतन ही मंडळी तरी करणार आहे का?

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या