फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजकाँग्रेसने फक्त ‘हात’दाखवण्याचे केले काम: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची टिका

काँग्रेसने फक्त ‘हात’दाखवण्याचे केले काम: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची टिका

Advertisements

लोकसभेच्या निवडणूकीत एनडीएला मिळणार ४०० पार

मोदींचा संकल्प हा फक्त ट्रेलर,पिक्चर अभी बाकी है

देशाच्या हितासाठी ‘वन नेशन वन इलेक्शन’गरजेचे

नागपूर,ता.१५ एप्रिल २०२४: भारतीय जनता पक्षाचा ‘संकल्पपत्र’ काल रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला.हा संकल्पपत्र देशातील महिला,युवा,शेतकरी,गरीब यांच्यासाठी महत्वपूर्ण असून हे संकल्पपत्र देशातील युवांच्या हातांना काम देणारे आहे.काँग्रेसने फक्त ‘हात’दाखवण्याचे काम केले,अशी टिका आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत केली.

पुढे बोलताना ते म्हणाले,की ’अब की बार मोदी सरकार ४०० पार’येणार असून संपूर्ण देशाला हा विश्‍वास आहे.महाराष्ट्रात एनडीएला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला.२०१९ मध्ये मोदी यांनी देशाच्या अमृतकाळाची नीव ठेवली.जे काम काँग्रेस पक्ष ५० वर्षात नाही करु शकली ते मोदी सरकारने १० वर्षात केले. २०१४ पर्यंत देशात स्टार्ट अप किवा ‘मेक इन इंडिया’ या सारख्या योेजना नव्हत्या. मोदी सरकार चार पिलरवर काम करतेय.महिला,युवा,शेतकरी आणि गरीब यांच्या उत्थानासाठी विविध योजना पंतप्रधान मोदी यांनी संकल्पपत्रात जाहीर केल्या.अंत्योदयातून शेवटच्या घटकापर्यंत आमच्या सरकारच्या योजना पोहोचणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.

महिला सन्मान याेजनेमध्ये पंतप्रधान आवास योजनेतील महिलांच्या नावाचे घरे असणार आहेत.,हर घर शौचालयाची योजना माेदींनी राबवली.‘बेटी बचाओ बेटी पढाओ’योजना मोदींनी साकार केली.संसदेत ३३ टक्के महिलांना आरक्षण देणारे विधेयक पारित केले.ट्रिपल तलाकचे विधेयक मंजूर केले.युवा शक्तींना विविध याेजनांच्या माध्यमातून हात दिला.

युवा शक्तीचा उपयोग देशाच्या उत्कर्षासाठी करण्यासाठी कौशल्य विकासाचे तीन टप्पे राबविण्यात आले.चाळीस वर्षात नाही घडले ते राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू केले.विकसित भारताची नीव ठेवली.
मुद्रा कर्ज,स्टार्ट अप इंडिया या सारख्या योजनांमधून रोजगार निर्माण केले.पहील्यांदा देशात किसान सन्मान योजना राबविण्यात आली.दूधवाले,मच्छीमार आदी रोजगार करणा-यांना मोदींच्या गॅरंटीने कर्ज मिळाले.शेतकरी अन्नदाता म्हणून समोर आला.काँग्रेस ही जाती-पातीमध्ये भेदभाव करुन राजकारण करणारा पक्ष असल्याची टिका याप्रसंगी सावंत यांनी केली.मोदींच्या कार्यकाळाचे दहा वर्ष काँग्रेसच्या ५० वर्षांच्या सत्ताकाळापेक्षा सरस आहेत.त्यांच्या काळात ५० वर्षात फक्त ५० विमानतळ होते तर मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात विमानतळांची संख्या ही १७४ झाली.वैद्यकीय महाविद्यालये ही ३७४ होती ती ७८६ झाली.कॉंग्रेसच्या काळात देशात ७ एम्स होते आता २३ झाले.प्रत्येक क्षेत्रात मोदी सरकारने दुप्पट विकास केला असल्याचे सावंत यांनी सांगितले.

मोदींनी आपल्या तिस-या टर्मच्या कार्यकाळासाठी देशातील गरीबातील गरीबांसाठी अनेक योजना जाहीर केल्या आहेत.प्रधानमंत्री आयुष्यमान योजना ही देशात २०१४ पूर्वी नव्हती.या योजनेमुळे गरीबांना पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्यासाठी पैसे मिळतात.वीजेच्या संदर्भात ‘झिरो वीजेचे बिल’ची योजना यंदा लागू होणार आहे.‘लखपती दिदि’ची संख्या देशात १ लाख एवढी झाली आहे.ही संख्या आता ३ कोटी होणार आहे.‘शासन आपल्या दारी’उपक्रम आणखी मोठ्या प्रमाणात राबविला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतक-यांना वार्षिक ६ हजार रुपये दिले जात असून,पंतप्रधान फसल योजनेतून शेतक-यांना लाभ मिळत आहे.याशिवाय श्रमिक सन्मान,एमएसएमई द्वारे टॅक्सी ड्रायव्हर,ऑटो चालक यांना या योजनेचा लाभ झाला आहे.

केंद्र सरकारने सीएए विधेयकाची अंमलबजावणी या कार्यकाळात होणार असून‘वन नेशन वन इलेक्शन’,‘युनिफॉर्म सिव्हिल कोड’या कार्यकाळात देशात लागू करणार आहेत.मोदी यांनी आपल्या १० वर्षांच्या कार्यकाळात शंभर टक्के दिलेली गॅरंटी पूर्ण केली असल्याचे सावंत म्हणाले.आज भारत देश जागतिकस्तरावर तिसरी महाशक्ती म्हणून उदयास येणार आहे.हे घडवून आणण्यासाठी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात एनडीएला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

काँग्रेसकडे ना नेता आहे ना नेतृत्व,अशी टिका त्यांनी केली.मोदी सरकारच्याा कार्यकाळात देशाचा झालेला विकास हे फक्त ट्रेलर आहे,पिक्चर अजून बाकी आहे,असे ते म्हणाले.

काल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे नागपूरात होते त्यांनी मोदी सरकार देशाचा संविधान बदलणार असल्याचा आरोप केला,मोदी यांची तुलना रशियाचे हूकूमशहा पुतीन यांच्यासोबत केली,याकडे लक्ष वेधले असता,खर्गे हे लोकांच्या मनात खोटी भीती निर्माण करीत असून मी त्यांच्या विधानाचा निषेध करतो,असे सावंत म्हणाले.

मोदी यांनी आपल्या संकल्पपत्रात ’वन नेशन वन इलेक्शन’चा मुद्दा समाविष्ट केला आहे मात्र,देशा,तील अनेक बुद्धीजीवींनी याचा विरोध केला असून देशाच्या लोकशाहीसाठी हे घातक असल्याचे सांगितले.त्यामुळे मोदी हे कोणतेही धोरण राबविताना देशातील जनतेला विश्‍वासात का घेत नाही?अग्नीवीर योजनेच्या विरोधात तरुणाईने देशभर आंदोलन केले असता,एका ही आंदोलनकर्त्यावर गुन्हा दाखल झाल्यास त्यांना या योजनेतून बाद करण्यात येईल,असा दम देण्यात आल्याने आंदोलनकर्त्यांना नाईलाजाने ही योजना स्वीकारावी लागली,यावर प्रश्‍न केला असता,‘वन नेशल वन इलेक्शन’योजना देशाच्या हितासाठी असल्याचे सावंत यांनी सांगितले.यासाठी समिती गठीत करण्यात आली होती,त्या समितीने या योजनेची शिफारस केली.देशातील सर्व विधान सभेतून दोन तृतीयांश बहूमताने मंजूर झाल्यावरच ही योजना देशात लागू होईल,असे ते म्हणाले.

पेट्रोलजन्य पदार्थ जीएसटीमध्ये आणणार का?असा प्रश्‍न केला असता याचा निर्णय जीएसटी काऊंसिलमध्ये होऊ शकतो,असे ते म्हणाले.हा मुद्दा येथे गैरलागू असल्याचे ते म्हणाले.मोदी यांना यावेळी दक्ष्ण राज्यांमधून देखील चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सावंत यांनी सांगितले.मोदी यांना ४०० पार जागा मिळणार हा माझा नाही तर देशवासियांचा विश्‍वास असल्याचे ते म्हणाले.

देशातील सरकारी नोक-यांमधील लाखो रिक्त पदे काँग्रेसची सरकार आल्यावर भरेल असे वचन खर्गे यांनी दिले आहे,याकडे लक्ष वेधले असता,खर्गे यांना रिक्त जागा भरण्यासाठी सत्तेत येण्याची गरज नाही,मोदी हेच या जागा भरतील,असे उत्तर सावंत यांनी दिले.खर्गे यांचा संकल्प सांगणार,होणार,करणार,मिळणार कधी?अशी टिपण्णी त्यांनी केली.

‘अब की बार गोळीबार सरकार’अशी टिका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सलमान खान यांच्या घरावरील गोळीबारातून केली आहे,याकडे लक्ष वेधले असता,सुळे या स्वत: कुटूंबातील भांडणात फसल्या आहेत,त्या काय बोलतात हे त्यांनाही कळत नसल्याचे सावंत म्हणाले.

भाजपचा जाहीरनामा ही नुसती ’जुमलेबाजी’असल्याचे विरोधक टिका करतात,असे विचारले असता,हा जनतेचा जाहीरनामा असल्याचे सावंत म्हणाले.

पणजीमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पात एक हजार कोटींचा घोटाळा झाला,नागपूरातून अम्ली पदार्थ गोवा,पणजी येथे मोठ्या प्रमाणात सप्लाय होतात.उत्खननात देखील घोटाळ्याचा आरोप केजरीवालांकडून होत असल्याकडे लक्ष वेधले असता,पणजीत स्मार्ट सिटीचे काम काही कारणांमुळे रेंगाळले,मात्र आत ते मार्गी लागले असल्याचे सावंत यांनी सांगितले.अटल सेतूचे काम पूर्ण झाले आहे.स्मार्ट सिटीचे काम बघून अर्बन डेव्हलपमेंट मंत्रालयाने आणखी १०० कोटी रुपये दिले अाहेत.मायनिंगचा घोटाळा हा २०१२ साली काँग्रेसच्या कार्यकाळात झालेला आहे.आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या दिशानिर्देशानुसार मायनिंगमधून उत्खननाचे काम करीत आहोत,अम्ली पदार्थांच्या विक्रीवर वचक ठेवण्यासाठी गोवा नार्कोटिक्स एण्टी विभाग मोठ्या प्रमाणात छापेमारी करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
…………………………

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या