फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमकाँग्रेसच्या माजी नगरसेवकाची दिवसाढवळ्या हत्या

काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची दिवसाढवळ्या हत्या

Advertisements

नागपूर,ता. १६: ऑगस्ट: सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गड्डीगोदाम परिसरात माजी नगरसेवक देवा उसरे यांची दाेन आरोपींनी रविवारी सकाळी निर्घुण हत्या केली.

गेल्या निवडणूकीत उसरे काँग्रेसचे नगरसेवक होते. तीन वेळा ते महापालिकेत निवडून आले होते. गेल्या निवडणूकीत ते महापालिकेत निवडून येऊ शकले नाहीत. मात्र परिसरातील नागरिकांच्या समस्यांच्या आढावा घेण्यासाठी ते रोज सकाळी आपल्या प्रभागात फिरत होते. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळीच उठून ते आपल्या बुलेटने परिसरात फिरले आणि ७.३० वाजताच्या सुमारास नेहमीच्या चहाच्या टपरीवर चहा घ्यायला आले. बुलेटवरुन उतरत असतानाच तोंडाला मास्क आणि स्कॉर्फ बांधून आलेल्या दोन पैकी एका आरोपीने त्यांच्या पाठीत चाकू भोसकला.

बचावासाठी उसरे यांनी दोन्ही आरोपींचे केस पकडून त्यांचा प्रतिकार केला. तेवढ्यात दुस-या आरोपीने त्यांच्या डोक्यावर कु-हाड मारली. ते खाली पडल्यानंतर आरोपीने त्यांच्यावर चाकू व कु-हाडीचे घाव घालून त्यांना रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. त्यांची हालचाल थांबल्यानंतर शिवीगाळ करत आरोपी पळून गेले. वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडली. त्यामुळे परिसरात प्रचंड तनाव निर्माण झाला. उसरे यांच्या मुलासह त्यांच्या समर्थकांनी त्यांना मेया रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी उसरे यांना मृत घोषित केले.

दरम्यान,ही माहिती कळताच आमदार विकास ठाकरे तसेच काँग्रेसचे नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने रुग्णालयात पोहोचले.

मालमत्तेच्या वादावरुन हत्येचा संशय-

उसरे यांची हत्या मालमत्तेच्या वादातून झाल्याचे प्रत्यक्ष् दर्शींचे म्हणने आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसर उसरे यांच्या मालकीच्या घरात आरोपी हे भाड्याने राहत होते. घर खाली करण्याच्या विषयावरुन आरोपी आणि उसरे यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरु होता. पोलीसांकडे याबाबत तक्रार देखील नोंदविण्यात आली होती.मात्र शेवटी या वादात उसरे यांचा बळी गेला.
वृत्त लिहेपर्यंत आरोपींचा छडा लागला नव्हता. पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या