फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमकाँग्रेसच्या नगरसेवकाने केली भाजप समर्थकाला जीवघेणी मारहाण

काँग्रेसच्या नगरसेवकाने केली भाजप समर्थकाला जीवघेणी मारहाण

Advertisements
हरीश ग्वालबंसीचे कृत्य:कळमेश्‍वर पोलिस ठाण्यात ग्वालबंशीवर गंभीर कलमा:ग्वालबंसी फरार

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर नगर परिषदेच्या निवडणुकीला हिंसक गालबोट…
नागपूर,ता.२४ नोव्हेंबर २०२५: कळमेश्वर नगरपरिषदेत काँग्रेस उमेदवाराचे काम का करत नाही, भाजप वाल्यांना साथ का देतो? या रागातून आरिफ नावाच्या एका व्यक्तीला काँग्रेसचे नागपुरातील स्थानिक नेते व मावळत्या महापालिकेतील काँग्रेस नगरसेवक हरीश ग्वालबंशी आणि त्यांच्या पाच ते सहा सहका-यांनी अपहरण करुन बेदम मारहाण केली.कळमेश्‍वर पोलिसांनी अपहरणकर्त्यांच्या विरोधात गंभीर कलमा लावून गुन्हा दाखल केला आहे.
गंभीर जखमी झालेल्या आरिफला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ,आरिफने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी हरीश ग्वालबंशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात अपहरण आणि मारहाण असे गंभीर गुन्हे दाखल केले आहे.

(छायाचित्र: काँग्रेसचा माजी नगरसेवक हरिश ग्वालबंशी)

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे काल रात्री अकरा वाजताच्या सुमारास कळमेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विसावा बारमध्ये आरिफ आणि हरिश ग्वालबंशी आणि त्यांच्यासोबतचे सहकारी समोरासमोर आले.
तेव्हा ग्वालबंशी यांनी आरिफला तू कळमेश्वर नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचे काम का करत नाही, भाजप उमेदवाराला का साथ देतो अशी विचारणा केली.
यावरून दोघांमध्ये वाद वाढला. ग्वालबंशी सोबतच्या सहकाऱ्यांनी आरिफचे अपहरण केले आणि त्यानंतर नागपूर जवळच्या गोरेवाडा परिसरात आणून बेदम मारहाण केली. नंतर जखमी अवस्थेतील आरिफला तिथेच सोडून आरोपी पळून गेले.
जखमी आरिफला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी हरीश ग्वालबंशी आणि त्याच्या चार सहकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.याप्रकरणी तीन आरोपींना अटक झाली आहे मात्र, काँग्रेस नगरसेवक हरीश ग्वालबंशी अद्याप फरार आहे.
या घटनेला रेतीघाटाची देखील किनार असून काँग्रेसच्या नगराध्यक्षाच्या पतीचा रेतीघाटाचा व्यवसाय असल्याचे सांगितल्या जात आहे.हरीश ग्वालबंशी देखील रेतीघाटाशी संलग्न असून याच मैत्रीतून हरिश ग्वालबंशीने मित्राच्या पत्नीच्या प्रचारासाठी आरिफसोबत भांडण केल्याचे सूत्राने सांगितले.
भाजपच्याच सत्ताकाळात भाजपच्याच कार्यकर्त्याला जबर मारहाणाची घटना घडल्याने आता हरिश ग्वालबंशी व त्याचे साथीदार लांब मुक्कामासाठी तुरुंगातच राहणार असल्याचे बोलले जात आहे.
………………………….
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या