फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशकाँग्रेसचे ‘हे ’जुने चरित्र...

काँग्रेसचे ‘हे ’जुने चरित्र…

Advertisements
वडेट्टीवारांच्या बेताल विधानाने जनमानसात पुन्हा संताप

नागपूर,ता.२८ एप्रिल २०२५: काँग्रेस,देश आणि मुस्लिमांचे लांगूनचालन हा विषय भारतीय जनमानसात गेल्या ७५ वर्षांपासून सतत चघळला जात आहे,स्वातंत्र्यानंतर काँग्रेसनी ज्या प्रकारची धोरणे भारतात राबविली त्याचीच परिणीती ,२०१४ मध्ये भारतीय जनता पक्षाची पूर्ण बहूमताची केंद्रात सत्ता स्थापनेत झाली व नरेंद्र मोदी नावाचा धूमकेतू पंतप्रधान पदी विराजमान होण्यात झाली.महत्वाचे म्हणजे गेल्या ११ वर्षांत देखील काँग्रेस पक्षाचे दिल्ली पासून गल्लीपर्यंतचे नेते बदललेल्या जनमानसाचा वेध घेण्यास इच्छूक नसून अद्यापही आपली जूनीच ‘रि’ओढण्यात मशगुल असून, महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे गट नेते विजय वडेट्टीवार पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जे बरगळले ते ऐकून पुन्हा एकदा या दीडशे वर्ष जुन्या राजकीय पक्षाच्या ‘विचारधारे’विषयी फक्त कीव करावीशी वाटते.
२२ एप्रिल रोजी दूपारी ३ वा.पहलगामच्या बैसरल या निसर्गरम्य स्थळी निष्पाप पर्यटकांना ज्या पद्धतीने त्यांचा  धर्म विचारुन डोक्यात गोळ्या झाडण्यात आल्या,त्यावर प्रतिक्रिया देत वडेट्टीवारांनी ’दहशतवाद्यांकडे इतका वेळ कुठे असतो की ते आधी धर्म विचारतील व नंतर गोळ्या झाडतील’असे अतिशय संतापजनक विधान केले, जे त्या २६ हूतात्मांचे बलिदान मातीमोल करणारे ठरले.वीसहून अधिक पर्यटक जखमी झाले.त्या हल्ल्यात हूतात्मा झालेल्या २६ पर्यटकांच्या डोक्यात गोळी झाडण्या पूर्वी त्यांना त्यांचा धर्म विचारण्यात आला,कलमा म्हणून दाखवण्यास सांगण्यात आले,असे सर्व हूतातम्यांच्या कुटूंबियांनी शासन व माध्यमांजवळ सांगितले.मात्र,वडेट्टीवारांनी त्या कुटूंबियांना, मुस्लिम लांगूनचालनाची परंपरा पक्षाच्या धोरणातंच मिसळली असल्याने, असे विधान करुन, एकप्रकारे खोटे ठरवले आणि संपूर्ण भारतीयांच्या डोक्यात तीव्र संतापाची तिडक गेली.
मृतकांच्या नातेवाईकांनी वास्तवतेत घडलेली घटना बयाण केली,ती सर्वसामान्य कुटूंबे आहेत,त्यांचा राजकारणाशी काडीचाही संबंध नाही ना त्यांना खोटे विधान करुन राजकारणाची पोळी शेकायची आहे.महाराष्ट्रातील ६ पर्यटक त्या हल्ल्यात हूतात्मा झाले आहेत,असे असताना लोकप्रतिनधी व आमदार पदी असलेल्या वडेट्टीवारांचे हे अति शहाणपण, कायमच्या दु:खात बुडालेल्या त्या कुटूंबियांच्या प्रति असंवेदनशीलतेचा कळसच होता.
अर्थात,अखिल भारतीय काँग्रेसचे हे फार जुने पारंपारिक धोरण आहे.जिथे-जिथे त्यांना हिंदू-मुस्लिम करण्याची संधी मिळते तिथे-तिथे त्यांचा मुस्लिम कणव उफाळून येतो.काश्‍मीरचे रक्तरंजित दुखणे हे तर काँग्रसचे पितामह पं.नेहरु यांचीच देण आहे.नेहरुंनी भूतकाळात जर या चुका केल्या नसत्या तर कौशिक ऋषिंचा काश्‍मीर हा स्वर्गच राहीला असता,हिंदू-मुस्लिमांसाठी जळते घर झाला नसता.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर लगेच पाकिस्तानने कबिलेवाल्यांचा आड स्वत:चे सैनिक पाठवून काश्‍मीरवर आक्रमण केले.एक वर्षापर्यंत जे युद्ध चालले.दोन्ही देश १ जानेवरी १९४९ रोजी संघर्षविरामवर सहमत झाले मात्र,तोपर्यंत जम्मू-काश्‍मीरचा फार मोठा भूभाग पाकिस्ताने आपल्या ताब्यात घेतला होता.तोच भाग आज पाकव्याप्त काश्‍मीरच्या नावाने ओळखला जातो.भारताचे तत्कालीन पंतप्रधान नेहरु यांनी तो भाग भारताचे सैन्य जिंकत असतानाच शस्त्रसंधी घोषित केली,दुसरे तत्कालीन भारतातील इंग्रज गर्व्हरनर लॉर्ड माऊंटबेटनच्या सल्ल्याने काश्‍मीरचा विषय संयुक्त राष्ट्र संघात घेऊन गेले.मूळात भारत तब्बल दीडशे वर्षांनंतर इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतर देखील, भारत देशात गर्व्हनर जनरल पदी नेहरु यांना एखादा भारतीय न ठेवता इंग्रज लॉर्ड माऊंटबेटन यांना त्या पदावर बसवणे हीच मूळात स्वतंत्र देशाची थट्टा होती!
नेहरु यांनी लॉर्ड माऊंटबेटन यांच्या सल्ल्याने संयुक्त राष्ट्र संघात काश्‍मीरचा मुद्दा सनद ५१ ऐवजी सनद ३५ अंतर्गत घेऊन गेले.सनद ३५ अन्वये जर दोन देश आपापसातील वाद एकमेकांच्या सहमतीने सोडवू शकत नसतील व जो वाद आंतरराष्ट्रीय अशांततेसाठी कारणीभूत ठरत असेल तर यूनोचा कोणताही सदस्य देश यूनोच्या आंतराष्ट्रीय सुरक्षा परिषदेत किवा महासभेत

वादग्रस्त विषय घेऊन जाऊ शकतो.तेच यूनएन सनदच्या ५१ मध्ये सदस्य देश त्यांच्यावरील हल्ल्याच्या विरोधात सुरक्षेसाठी दाद मागू शकते.यूनएन सनद सांगते की,त्यांचे नियम कोणत्याही देशाच्या आत्मरक्षेच्या अधिकाराचे हनन करु शकत नाही.जर एखाद्या देशावर सशस्त्र हल्ला होत असेल तर स्वत:च्या सुरक्षतेसाठी तो देश स्वत: किंवा सामूहिकरित्या स्वत:चे आत्मरक्षण करु शकतो.मात्र,या अधिकाराचा वापर करताना संबंधित देशाला सुरक्षा परिषदेला अवगत करने बंधनकारक आहे.याचा अर्थ नेहरु यांनी पाकव्याप्त काश्‍मीरला वादग्रस्त मुद्दा मानून ,यूनोच्या ३५ साव्या सनदेच्या अधीन मानले,ही सर्वात मोठी चूक होती.
नेहरु यांनी सनद ३५ चा मार्ग पत्करुन काश्‍मीर मुद्दावरुन पाकिस्तानसोबत शस्त्रसंधी करण्याचे ओझे स्वत:हून देशावर लादले.इतकंच नव्हे तर ३१ जानेवरी १९४८ च्या रात्री शस्त्रसंधीचा प्रस्ताव देखील भारताकडून गेला होता!यूनोच्या सनद ५१ अन्वये भारत संयुक्त राष्ट्र संघात गेला असता तर भारताकडे सदैव देशाच्या सुरक्षेसाठी, पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताला कोणत्याही स्तरापर्यंत जाण्याचे ,व स्वत:चे आत्मरक्षणाचे अधिकार अधिकार अबाधित राहीले असते.
महत्वाचे म्हणले नेहरु यांनी युद्ध विरामाची घोषणा अश्‍यावेळी केली ज्यावेळी भारतीय सैन्य पाकिस्तानवर भारी पडत होते व पाकिस्तानी भागात आतपर्यंत पोहोचली होती.भारतीय सेनेचे सरसेनापती सर फ्रांसिस रॉबर्ट रॉय बुचर होते तर पाकिस्तानचे जनरल डगलस ग्रेसी होते.जर हे युद्ध विराम झाले नसते तर पाकव्याप्त काश्‍मीरचे कोणतेही अस्त्विच राहीले नसते जे आज जगभरातील दहशतवाद्यांचा मुख्य अड्डा बनला आहे.
पुढे नेहरु यांनी स्वत: काश्‍मीरच्या मुद्दावर त्यांची चूक मान्य केली.नेहरु यांनी शेख अब्दुल्लाह यांना पत्र लिहून ,संयुक्त राष्ट्र संघाच्या बाबतीत स्वत:च्या अनुभवातून मी या निर्णयापर्यंत पोहोचलो आहे की,यूएनकडून कोणालाही समाधानकारक निर्णयाशी अपेक्षा करने व्यर्थ आहे.मला वाटले पाकिस्तानसोबत युद्ध संधीचा निर्णय चांगला आहे मात्र,तो योग्यरितीने लागू झाला नाही.आम्ही आणखी चांगले करु शकलो असतो.अनेकदा मला असं वाटतं आम्ही जे केले ती चूक होती!‘हे मान्य केले.पुढे संसदेत २४ जुलै १९५२ रोजी दिलेल्या आपल्या भाषणात पंतप्रधान नेहरु यांनी काश्‍मीरमध्ये पाकिस्तान सैन्याच्या उपस्थितीमुळे भारताला यूनोमध्ये जावे लागले,असा उल्लेख केला.त्यांच्या या विधानावर पाकिस्तानने त्यांचे कोणतेही सैन्य काश्‍मीरमध्ये नसल्याचे दृढतेने सांगितले.एक असत्य वारंवार पाकिस्ताने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ठासून सांगितले.ते यूनोने देखील मान्य केले.अश्‍याप्रकारे नेहरु यांनी स्वत: आपल्या संसदेतील भाषणात, काश्‍मीरवर पाकिस्तानी आक्रमण यूनोमध्ये घेऊन जाण्याचा तसेच युद्ध विरामच्या मुद्दाचा संदर्भ दिला होता.
या भाषणात त्यांनी हा मुद्दा ’आम्ही’नेला,असा उल्लेख केला,’मी’नेला असा उल्लेख केला नाही.त्यामुळे तो मंत्रीमंडळाचा निर्णय होता,एकट्या नेहरुंचा नाही असा बचाव काँग्रेस करत आली आहे मात्र,सरकारच्या प्रमुखावरच काेणत्याही निर्णयांचं खापर फोडल्या जातं,मग तो निर्णय योग्य असो किंवा अयोग्य.मंत्रीमंडळाचे प्रमुख हे पंतप्रधानच असतात.भारताचे सरसेनापती बूचर हे सेवानिवृत्तीनंतर भारतात आले होते,त्यांनी आत्मचरित्रकार बी.आर.नंदा यांच्याशी विस्तृत चर्चा केली.त्यांना देखील नेहरु काश्‍मीरचा मुद्दा यूनोमध्ये घेऊन जाणार असल्याचे माहिती नव्हते.
नेहरु यांनी बूचर यांना पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत तयार राहण्याची सूचना केली होती.बूचर यांनी नेहरुला भारतीय सैन्य पूर्णत:तयार असल्याचे सांगितले.मात्र,तत्कालीन संरक्षण मंत्री बलदेव सिंह यांनी बूचर यांना कॉल करुन, शस्त्रसंधी करण्यास सांगितले.बलदेव सिंग यांनी बूचर यांना ‘आगे बढे’असा संदेश दिला.कोणासोबत पुढे जाऊ,अशी विचारणा केली असता बलदेव सिंह यांनी ‘युद्ध विरामासाठी’असे उत्तर दिले.एकीकडे बूचर यांनी नेहरु यांना आश्‍वस्त केले होते की भारतीय सैन्य कोणत्याही परिस्थिती समोर जाण्यास सज्ज आहे,दूसरीकडे नेहरु यांनी संरक्षण मंत्र्याला वेगळा निरोप दिला!
यानंतर बूचरने पाकिस्तानचे सेनाध्यक्षाला एक संदेश पाठवला.बूचर यांनी तोे संदेश मुद्दामून लहान ठेवला.’मेरी सरकार का मानना है कश्‍मीर में जीवन और हर चीज के नुकसान के साथ पागलपन भरे काम और जवाबी कारवाईयो से कुछ भी हासिल नहीं हो रहा है,मुझे ३१ दिसंबर १९४८ की आधी रात से एक मिनिट पहले या उसके आसपास भारतीय सैनिको को गोलीबारी बंद करने का आदेश देने के लिये सरकार का अधिकार था!’बूचर सांगतात हा संदेश खूप सावधगिरीने तयार करण्यात आला होता व हा संदेश पाकिस्तानचे सेनाध्यक्ष ग्रेसीला त्यांनी व्यक्तिश: लिहला होता.हा संदेश पाठवण्या पूर्वी नेहरु यांना तो दाखविण्यात आला.नेहरु यांनी तो दोन-तीन वेळा वाचला,यानंतर त्यावर स्वाक्षरी केली!
याची एक प्रत त्यांनी त्यांच्या फाईलमध्ये ही ठेवली.सेनाध्यक्ष ग्रेसीला हा नेहरु यांचाच संदेश असल्याचे कळणार होते,हे मला माहिती होते,असे बूचर यांनी नंदा यांना सांगितले.हा संदेश ग्रेसी पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली खानला दाखवणार होतेच,बुचर ने त्या मुलाखतीत हे देखील सांगितले की युद्ध विरामविषयी यूनोला देखील सूचित करण्यात आले होते.
भारताचे विद्यमान गृहमंत्री अमित शहा यांनी या सर्व मुद्दांची चिरफाड नुकतीच संसदेत केली व त्या वेळी नेहरु यांनी युद्ध विराम केला नसता तर पाकव्याप्त काश्‍मीरचे जगात कुठेही अस्तित्वच नसते,असा हल्ला केला.शाह यांच्या या शाब्दिक हल्ल्यानंतर काँग्रेस व विरोधकांनी बहिष्कार केला. पाकव्याप्त काश्‍मीर हा जगभरातील दहशतवाद्यांसाठी आनंदवन बनला असून,भारताला भूतकाळात घडलेल्या काश्‍मीर धोरणाचे दु:खद परिणाम आजपर्यंत भाेगून द्यावे लागत आहे.
काश्‍मीरमध्ये भारतीय सैन्य उशिरा पाठवण्यामागे माऊंटबेटनचाच हात असल्याचे इतिहासतज्ज्ञ सांगतात.स्वतंत्र भारताचे पहीले राष्ट्रपती मौलाना आजाद यांनी त्यांच्या आत्मचरित्रात याचा स्पष्ट उल्लेख केला की नेहरुयांच्यावर लेडी माऊंटबेटनचा अधिक प्रभाव होता.या प्रभावातून नेहरु यांनी अनेक चुकीचे निर्णय देशावर लादले.

पाकिस्तान जो भारतासोबतच स्वतंत्र झाला त्या देशाचा गर्व्हनर जनरल मात्र,एक पाकिस्तानी होता.माऊंटबेटन ब्रिटीश प्रतिनिधी होते त्यांना नेहरु व काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी स्वतंत्र भारत देशाचा पहिला गर्व्हनर जनरल नियुक्त केले.माऊंटबेटनची प्रामाणिकता ब्रिटीश राणी प्रति होती.ब्रिटेन पहले पासूनच काश्‍मीर त्यांच्या अधिपत्याखाली राहवा,या धोरणाचा होता.हे तेव्हाच शक्य होते जेव्हा काश्‍मीर स्वतंत्र देश राहील किवा पाकिस्तानात सहभागी होईल.
सप्टेंबर १९४७ पर्यंत जम्मू-काश्‍मीर हा एक स्वतंत्र देश होता. या देशावर महाराजा हरि सिंह या हिंदू राजाची सत्त होती.त्यांनी काश्‍मीरचा विलय भारतात करण्याचं मन बनवलं होतं.त्यांनी कोणत्याही अटी शर्थीशिवाय काश्‍मीरचा विलय भारतात करण्यासाठी पुढाकार घेतला तेव्हा नेहरु यांनी त्याला नकार दिला!नेहरु यांची ही अट होती की शेख अब्दुल्ला ज्याला राजा हरि सिंह यांनी राजद्रोहच्या आरोपा कैदेत ठेवले आहे,त्याची सुटका करावी तसेच काश्‍मीरचा भारतात विलय होण्याआधी शेख अब्दुल्लाला काश्‍मीरचा पंतप्रधान नेमावा.ही अट राजा हरि सिंह यांना अस्वीकार्य होती
ऑक्टोबर १९४७ मध्ये पाकिस्तानी हल्लेखोरांनी काश्‍मीरवर आक्रमण केले.२२ ऑक्टोबर रोजी ते श्रीनगरच्या मुख्य दरवाज्यापर्यंत धडक देते झाले.महाराजा हरि सिंह निराश झाले आणि त्यांनी भारताकडे मदत मागितली.त्यावेळी भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदर वल्लभभाई पटेल यांनी तात्काळ भारतीय सैन्याला काश्‍मीरमध्ये पाठविण्याचा सल्ला नेहरु यांना दिला.मात्र,नेहरु हे माऊंटबेटनच्या सल्ल्यावर चालत राहीले.माऊंटबेटनच्या ब्रिटेनला काश्‍मीर पाकिस्तानच्या ताब्यात जाणे जास्त उपयोगी ठरणार होते.
२४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानी हल्लेखाेरांच्या आक्रमणामुळे काश्‍मीरमध्ये ब्लॅकआऊट झाला.२५ ऑक्टोबर रोजी माऊंटबेटने परिस्थितीचे आकलन करण्यासाठी सैन्य पाठवण्या ऐवजी संरक्षण प्रतिनिधी मंडळ पाठवले!२६ ऑक्टोबर रोजी सल्लागार मंडळ दिल्लीत परतले व अहवाल दिला की भारताने तात्काळ कारवाई न केल्यास श्रीनगरवर पाकिस्तानचा कब्जा होईल.या पार्श्वभूमीवर माऊंटबेटनने नेहरु यांना सल्ला दिला,आधी विलयच्या संधीवर अटी व शर्थीसह राजा हरि सिंह यांची स्वाक्षरी घ्या.यानंतर संरक्षण प्रतिनिधी मंडळाचे सदस्य असलेले वी.पी.मेनन पुन्हा काश्‍मीरमध्ये विमानाद्वारे पोहोचतात.विलयच्या कागदपत्रांवर राजा हरि सिंह यांची स्वाक्षरी घेतली जाते व २७ ऑक्टोबर रोजी जम्मू-काश्‍मीर भारताचा अभिन्न अंग बनतो. जम्मू-काश्‍मीरच्या भारतात विलयानंतर देखील माऊंटबेटनने काश्‍मीरमध्ये सैन्य पाठविण्यास उशिर केला.नेहरु या विषयी निर्णय घेण्यास पूर्णत:माऊंटबेटनवर विसंबून राहीले!
फिल्ड मार्शल सैम मानेकशॉने २७ ऑक्टोबर रोजीच्या बैठकीच्या वृतांत सांगताना,नेहरु काश्‍मीरच्या संरक्षणासंबंधीच्या बैठकीत नेहमीप्रमााणे संयुक्त राष्ट्र संघ,रुस,अफ्रिका आणि सर्वशक्तीमान भगवान याविषयी बोलत राहीले ,जोपर्यंत बैठकीत सरदार पटेल यांच्या सहनशीलेचा कडेलोट नाही झाला!पटेल यांनी ‘जवाहर,क्या आप कश्‍मीर चाहते है,या आप इसे देना चाहते है?‘असा सरळ प्रश्‍न नेहरुंना केला.नेहरु यांनी ‘बेशक,मै कश्‍मीर चाहता हूं’यानंतर लगेच पटेल यांनी,‘कृपया अपना आदेश दें’असे सांगून नेहरु काही बोलतील त्या पूर्वी मानेकशॉकडे वळले आणि,‘आपको अपना आदेश मिल गया है’असे सांगून त्यांना बैठकीतून रवाना केले.
भारतीय सैन्याने खूप साहसाने ही लढाई लढली.भारतीय सैन्य संपूर्ण काश्‍मीरला पाकिस्तानच्या तावडीतून मुक्त करण्यास सज्ज झाली होती मात्र,त्या पूर्वीच नेहरु यांनी युद्ध विरामचे धोरण घाेषित केले.सरदार पटेल यांच्यामुळे निदान दोन तृतीयांश काश्‍मीरवर आजही भारताचे नियंत्रण आहे.मात्र,पाकव्याप्त काश्‍मीर ही भारतासाठी आता कायमची डोकेदुखी ठरत आहे.काश्‍मीरी पंडितांसह आजपर्यंत पाकिस्तानच्या दहशतवादाच्या कारवाईत हजारो नागरिक व सैनिक शहीद झाले.
२२ जुलै २०२५ रोजी चार दहशतवाद्यांनी निरपराध हिंदू पर्यटकांवर भ्याड हल्ला करुन २६ जणांचे प्राण घेतले.मृतकांच्या कुटूंबियांनी त्यांच्यावर गुदरलेली प्रत्येक घटना माध्यमांसमोर सांगितली.मात्र,काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी दहशतवाद्यांना धर्म विचारायला वेळ असतो का?असे असंवेदनशील विधान केले.त्या पूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व एकेकाळी देशाचे संरक्षण मंत्री राहीलेले शरद पवार यांनी देखील,दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या डोक्यात गोळी घालण्या आधी धर्म विचारला होता की नाही,अशी सांशकता व्यक्त केली.त्यांचीच ‘रि’राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ओढत, दहशतवाद्यांनी हिंदूंना त्यांचा धर्म विचारला नव्हता,असे वादग्रस्त विधान केले.शेवटी राष्ट्रवादीचा डीएनए हा काँग्रेसचाच असल्याने या दोन्ही पक्षाच्या विचारधारेला वेगळं संबोधता येणार नाही.
स्वातंत्र्यांच्या पंचाहत्तरित देखील काँग्रेस नेत्यांच्या विचारधारेत ‘तृष्टिकरणाचेच ‘धोरण किती खोलवर रुजले आहे हे आमदार वडेट्टीवारांच्या विधानातून पुन्हा एकदा सिद्ध झाले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले तसे ‘वडेट्टीवार हे दहशवाद्यांसमोर उपस्थित नव्हते’त्यामुळे मृतकांच्या कुटूंबियांचे म्हणने त्यांना खोडता येणार नाही.आपापल्या राजकारणाची पोळी शेकण्यासाठी वडेट्टीवार,शरद पवार किवा अनिल देशमुख हे दहशतवादी हल्ल्याच्या घटनेत देखील हिंदू-मुस्लिम राजकारणाची खेळी खेळण्यास सज्ज होताना बघून ,संपूर्ण जनमानसात त्यांच्या विषयी तीव्र संताप उमटलेला असून समाज माध्यमांवर तो प्रकर्षाने दिसून पडतोय.
(उद्याच्या बातमीत वाचा काँग्रेस,कसाब व काँग्रेसचा हिंदू दहशतवाद)
……………………..
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या