

खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा दूसरा दिवस गाजला’सुभानअल्लाह’ने
नागपूर:कसं काय नागपूर?म्हणत त्यांनी भव्य स्टेजवर एंट्री घेतली आणि तेव्हा पार्श्वसंगीत सुरु होतं त्यांनीच संगीतबद्ध केलेलं ‘तुझे देखा तो ये जाना सनम…प्यार होता हैे दिवाना सनम’.बस त्यांच्या एंट्रीनेच माहौल केला..ते होते सुप्रसिद्ध संगीतकार ललित पंडीत. खासदार सांस्कृतिक महोत्सवातील दूसरा दिवस हा त्यांनी संगीतबद्ध केलेल्या स्वरसाजांनी गाजला. समोर बसले होते केंद्रिय मंत्री व खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे संकल्पकर्ते तसेच संगीताचे दर्दी रसिक नितीन गडकरी, कांचन गडकरी, विजय दर्डा इ. सुप्रसिद्ध विभूती. संगीत आणि कलेचा असा अभूतपूर्व संगम मी आजवर कुठेही बघितला नाही मात्र नागपूरात असा खासदार सांस्कृतिक महोत्सव चक्क १७ दिवस चालतो हे बघून माझ्या आनंदाला मी शब्दात सांगू शकत नसल्याचे ललित हे म्हणाले आणि संपूर्ण मैदानात एकच जल्लोष झाला.
खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ललित यांच्या ‘लाईव्ह कॉन्सर्ट’ची सुरवात ललित यांनी गान कोकीळा लता बाईंच्या गाण्याने केली, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’या चित्रपटातील ‘हो गया है तूझको तो प्यार सजना,लाख कर ले तू इन्कार सजना,है ये प्यार सजना’ या गाण्याविषयीची माहिती सांगताना या गाण्यातील मुखडा ’ना जाने मेरे दिल को क्या हो गया..अभी था यही अभी खो गया’हे दोन्ही गाणे वेगवेगळे होते अशी माहिती ललित यांनी दिली मात्र यश चोप्रा यांच्या सल्ला ऐकून दोन्ही गाण्याचे मुखडे एकाच गाण्यात गूंफले आणि..एका अजरामर गाण्याची निर्मिती झाल्याचे त्यांनी सांगितले. या नंतर त्यांनी शाहरुख खान यांच्यावर चित्रबद्ध झालेलं आणि अभिजित यांनी गायलेलं ’चांद तारे तोड लाऊ..बस इतना सा ख्वाब है’हे गीत सादर केले.

तत्पूर्वी, संगीतकार ललित पंडीत, ज्येष्ठ गायिका साधना सरगम आणि शान यांचा केंद्रीय लघू, मध्यम आणि सूक्ष्म उद्योग मंत्री आणि खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे संकल्पक नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी, नागपूरचे महापौर संदीप जोशी, विजय दर्डा, आमदार नागो गाणार, यांच्यासह प्रवीण दटके, उपेंद्र कोठेकर आणि बाबूराव तिडके यांच्यासह अन्य पदाधिकाèयांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या सुपरिचित कलाकारांसोबतच सहगायिका अनुप्रिया चॅटर्जी, वादक सतीश दामनकर, संतोष भुतल, संजय मराठे, गौतम qशदे, रोहांश पंडीत, लोकेश बक्षी, जतीन पनसानिया आणि अबीर पंडीत यांनी मुख्य कलाकारांना अप्रतिम साथसंगत केली. कार्यक्रमाचे नियोजनपूर्ण सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले.
हर किसी को नही मिलता यहां प्यार जिंदगी में….
साधना सरगम…अतिशय गोड गळ्याची गायिका. त्यांनी आपल्या कारकीर्दीत एकाहून एक सरस गाणी गायली जी आजही रसिकांच्या काळजातल्या आठवणीत कायमची बंदिस्त आहेत त्यातीलच एक गाणं म्हणजे ‘हर किसी को नही मिलता यहां प्यार जिंदगी में…खूशनसीब है जिनको है मिली ये बहार जिंदगी में’ ‘जांबाज’चित्रपटातील हे गाणं त्या काळी तरुणाईच्या गळ्यातले ताईत बनले होते. साधना सरगम यांनी महोत्सवात स्टेजवर एंट्री करताच भव्य,दिव्य स्टेजने खूप प्रभावित झाल्याचे सांगितले. गडकरी यांच्या खास उल्लेख करताना देश,नागपूर आणि संस्कृतीचा इतका मोठा विकास या पूर्वी कधीही बघितला नसल्याचे त्या म्हणाल्या. अश्या महोत्सवात त्यांना गाण्याची संधी मिळाली याचा अतिशय आनंद होत आहे. नागपूरसोबत आपले ऋणानुबंध अधोरेखित करताना त्यांच्या वैणी या नागपूरच्या असल्याचे सांगून श्रोत्यांचीश त्यांनी लगेच आपुलकीचं नातं जुळवलं. यावेळी त्यांनी ’नीले नीले अंबर पर’,’हर किसी को नही मिलता’,ही ऑफ बिट गाणी सादर करुन रसिकांची मने जिंकली. ‘दिल बडी मुश्किल से मिलते है..साहिल भी बडी मुश्किल से मिलते है..यू तो दूनिया में बहोत देखे मगर..नागपूर जैसे कदरदान बहोत कम मिलते है’अशी शायरी जोडून श्राेत्यांचा टाळ्यांचा कडकडाट मिळवला. यावेळी त्यांनी ‘सात समंदर पार मैं तेरे पीछे पीछे आ गई’ ललित यांच्यासोबत ‘पहीला नशा पहीला खूमार’ ‘यहां के हम सिकंदर ’ही युगल गीते सादर करुन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

शानची गीते ‘सुभानअल्लहा’….
यानंतर मंचाचा ताबा घेतला तो हसतमुख पार्श्वगायक शान यांनी. ‘कसं काय नागपूर?’ म्हणत मराठीत त्यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.मला मराठी उत्कृष्ट येत होती मात्र आता विसरलो अशी प्रांजळ कबूली ही त्यांनी दिली. गडकरी आणि त्यांच्या संकल्पनेतून साकार होणारा सांस्कृतिक महोत्सव यांचे कौतूक करतानाच नेते मंडळी ही फक्त कार्यक्रमाचे उद् घाटन करुन निघून जातात मात्र गडकरी हे सहकुटुंब कार्यक्रमाचा आनंद घेत असल्याचे बघून गाण्याचा उत्साह द्विगुणित होत असल्याचे शान म्हणाला. ‘जरा देखो कौन आ गया है..जमाने पे जो छा गया है..मैं हूं डॉन’या गीताने त्यांने गायनाला सुरवात केली. येथे ‘खासदार’पण आहे आणि ‘संस्कृती’पण आहे,ही आहे नागपूरची खासियत,असे म्हणून नागपूरची संत्री ही का जगप्रसिद्ध आहेत?असा प्रश्न विचारुन कारण ती ‘गोड’ही आहे आणि ‘आंबट’पण आहे त्यामुळे मी पण तुम्हाला गोड आणि आंबट दोेन्ही प्रकारच्या मूडची गाणी ऐकवणार अाहे असे सांगून शान यांनी एकाहून एक सरस गाणी सादर करुन समां बांधला. ‘सांवरिया’’,‘छूकर मेरे दिल को’,‘पल पल दिल के पास’ मराठीत त्यांनी किशोरदांचं ‘अश्विनी ये ना’हे गीत सादर करुन माहोल केला.‘चार कदम बस चार कदम चल दो ना साथ मेरे’ ’तुमसे मिलके ऐसा लगा तुमसे मिलके’ ‘चांद सिफारिश जो करता हमारी देता वो तूमको बता’या गीताने रसिकांना वेड लावले. साधना सरगत यांच्यासोबत त्यांनी ‘तुझे देखा तो ये जाना सनम’,‘कोई मिल गया’ही युगल गीते सादर केली. शान ची गीते,त्याचे सादरीकरण ‘सुभानअल्लाह’असाच श्रोत्यांचा प्रतिसाद होता.

ओरिजनल गायकांची ओरिजनल गाणी ऐकायला मिळाली-
कार्यक्रमानंतर श्रोत्यांची प्रतिक्रिया विचारली असता अतिशय आनंदाने, आम्हाला आज खासदार सांस्कृतिक महोत्सवात ओरिजनल गायकांची ओरिजनल गाणी ऐकायला मिळाली असल्याचे अनेकांनी सांगितले. अतिशय चांगला कार्यक्रम ‘दिल खूश हो गया’अशी रसिकांची उस्फूर्त प्रतिक्रिया होती.

कार्यक्रमाची जान संदीप बारस्कर यांची ध्वनी व्यवस्था-
मुंबई-पुण्याच्या धर्तीवर महाराष्ट्राच्या उपराजधानीत कार्यक्रमासाठी येताना आता मुंबई-पुण्याचे कलावंत यांना धास्ती वाटत नाही. याचे कारण ज्येष्ठ ध्वनि व्यवस्थापक संदीप बारस्कर यांचे ध्वनि नियोजन आहे. त्यांची मेहनत,त्यांची लगन दर वेळी नागपूरकर श्रोता हा अनुभवत असतो. नागपूरातील आज सर्व मोठी आयोजने संदीप बारस्कर यांच्या ध्वनि नियोजनाशिवाय अपूरी आहे. खासदार सांस्कृतिक महोत्सवात ‘लाईव्ह कॉन्सर्ट’मध्ये पुन्हा याची प्रचिती नागपूरकरांना आली. प्रत्येक वाद्याचा सुस्पष्ट आवाज,गायकांचा तरल आवाज अप्रतिमरित्या श्रोत्यांपर्यंत पोहचवण्याची किमया आजही संदीप बारस्कर यांनी साधली. आजही ते मंचावरुनच संपूर्ण ध्वनि व्यवस्थेचे नियोजन एकट्याने उभे राहून करीत होते तेव्हा ‘नागपूरकर‘म्हणून त्यांच्यासाठी अभिमानाने मुंबईकर कलावंतांसोबतच नागपूरकर श्रोत्यांचाही ऊर भरुन आला. या उम्द्या मनाच्या उम्दा कलावंताला नागपूरकरांचा सलाम!




आमचे चॅनल subscribe करा
