फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजकविंच्या सर्व रसाच्या कवितांनी श्रोते मंत्रमुग्ध

कविंच्या सर्व रसाच्या कवितांनी श्रोते मंत्रमुग्ध

Advertisements

 खासदार सांस्कृतिक महोत्‍सवाचा आठवा दिवस

नागपूर, ९ डिसेंबर २०२२: ‍ प्रसिद्ध अभिनेते व कवी शैलेश लोढा यांच्‍या निमंत्रणातून देशाच्‍या विविध भागातून आलेल्‍या कविंनी आपल्‍या हास्‍य-व्यंग कवितांनी नागपूरकर रसिकांना लोटपोट केले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्‍या मध्‍य भारतातील सर्वात मोठ्या खासदार सांस्‍क‍ृतिक महोत्‍सवाच्‍या आठव्‍या दिवशी प्रसिद्ध अभिनेते व कवी शैलेश लोढा यांच्‍यासह व इतर कवींचे कविसंमेलन सादर करण्‍यात आले. यात पार्थ नवीन, गजेंद्र प्रियांशु, गोविंद राठी, अशोक चरण, योगिता चौहाण, संजय झाला व नागपूरचे प्रसिद्ध हिंदी कवी मधुप पांडे या कवींचा सहभाग होता. संदीप झाला यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.

योगिता चौहाण यांनी शारदेची प्रार्थना सादर करून कविसंमेलनाला प्रारंभ केला. पार्थ नवीन यांनी उत्‍तरप्रदेशच्‍या निवडणुकीवर हास्‍यकविता सादर केली. कोरोनाने केवळ नरेंद मोंदीशीच कसा संवाद साधला हे ‘मै तो चायना से आ रहा था’ या कवितेतून सादर केले. गोविंद राठी कवींनी प्रेमरस, वीररस, हास्य व्‍यंग रसाच्‍या कविता यावेळी सादर केल्‍या.

आजच्‍या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍यासह महाराष्‍ट्राचे उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, नं‍दकिशोर अग्रवाल, ज्‍येष्‍ठ पत्रकार प्रदीप मैत्र, प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. व‍िलास डांगरे, दै. तरुण भारतचे संपादक गजानन निमदेव, दै. भास्‍करचे संपादक मणिकांत सोनी व इतर मान्‍यवरांची प्रमुख उपस्‍थ‍िती होती.

खासदार महोत्सवातून विदर्भाचे सांस्कृतिक वैभव वाढेल: उपमुख्यमंत्री

अनेक कलागुण संपन्न वैदर्भीय आहेत. खासदार सांस्कृतिक महोत्सवातून नवीन पीढीला व्यासपीठ मिळत आहे. या सांस्कृतिक मंचातून विदर्भाचे सांस्कृतिक वैभव वाढेल, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले.

नागपूर आणि विदर्भातील जनतेच्यावतीने खासदार सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले. खासदार सांस्कृतिक महोत्सव सुरू करून एक अत्यंत चांगले व्यासपीठ कलावंतांना उपलब्ध करून देण्यात आले आहे आणि रसिकांनाही सांस्कृतिक आनंद घेण्यासाठी एक चांगली पर्वणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

देशातले आणि जगातले नावाजलेले कलाकार खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या मंचावर येत असतात आणि आपली कला सादर करीत असतात. सर्व कलाकारांना नागपूरकर प्रोत्साहन देत असल्याचे आपण अनुभवत आहोत. त्यांच्यासोबत स्थानिक कलाकारांनाही एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर व बाळ कुळकर्णी यांनी केले. ‍

खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्‍या यशस्‍वीतेसाठी आयोजन समितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, सर्व उपाध्‍यक्ष प्रा. मधुप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्‍ता, कोषाध्‍यक्ष प्रा. राजेश बागडी, सर्व सदस्‍य बाळ कुळकर्णी, सारंग गडकरी, अविनाश घुशे, हाजी अब्‍दुल कादीर, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर, अॅड. नितीन तेलगोटे, विलास त्रिवेदी, आशिष वांदिले, चेतन कायरकर, भोलानाथ सहारे, किशोर पाटील, मनीषा काशिकर यांचे सहकार्य लाभत आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या