

जमा राशीतून कलावंतांना करणार आर्थिक मदत
सोनू निगम,सुदेश भोसले,धाकडे गुरुजी,अभिजित कोसंबी इत्यादी यांच्या या उपक्रमाला शुभेच्छापर सदिच्छा
स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारिख १२ जून
नागपूर,ता. ७ जून: ऐंशीच्या दशकात ‘मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा’हे गीत दूरदर्शनच्या माध्यमातून चांगलंच गाजलं व घरोघरी पोहोचलं होतं.या गीतात भारतभूमीतील सर्वच भाषा व प्रदेशाचे लोकसंगीत समाहित होते जे श्रोत्यांना खूप भावलं.सूरांना भाषा,प्रदेश, जात,धर्म, देशाच्या मर्यादा नसतातच त्याच धर्तीवर नागपूरातील शासनदरबारी नोंदणीकृत ‘ऑस्कर सांस्कृतिक संगीत कला अकादमी’ संपूर्ण जगभरातील हौशी गायकांसाठी ‘व्हॉइस ऑफ ऑस्कर’ ही अभिनव स्पर्धा घेऊन आली असून या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कलावंतांचा भरघोस प्रतिसाद लाभत आहे.
स्टेज कलावंतांच्या कल्याणासाठी निर्माण झालेल्या ऑस्कर सांस्कृतिक संगीत कलावंत अकादमीने गेल्या २६ मे २०२१ पासून तब्बल एक महिना चालणारी ऑनलाईन हिंदी फिल्मी गीत गायन प्रतियोगिता आयोजित केली आहे,
ही स्पर्धा सर्व वयोगटातील हौशी कलावंतांसाठी खुली करण्यात आली असून शहरातील अनेक मान्यवरांनी या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसे प्रायोजित केली अाहेत , स्पर्धेत प्रवेश घेण्यासाठी फक्त रू ३००/-शुल्क आकारण्यात आले आहे.
गेल्या दीड वर्षांपासून कोविड संक्रमण कालावधीमध्ये सर्व प्रकारच्या मनरोजंनाच्या बाबींवर बंधने आली आहेत. हीच बाब लक्ष्ात घेऊन ‘सूरांचे आकाश मोकळे करण्यासाठी’ ऑस्करने या स्पर्धेचे आयोजन केले आहे,
या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा या करिता अनेक पार्श्वगायक गायकांनी व चित्रपटसृष्टितील अनेक कलावंतांनी शुभेच्छावर सदिच्छा व्हीडीयोमार्फत व्यक्त केल्या आहेत.
यात प्रामुख्याने संगीतकार सुरमणी पं.प्रभाकरराव धाकडे, गुरुजी, ,गायक सुदेश भोसले, सोनू निगम, जावेद अली ,हास्य कलाकार सुनील पाल,भारत गणेशपुरे, ज्युनिअर अमिताभ शशीकांत भिडवाल , दिलीप सेन ,राम गडकरी , पं.भवानी शंकर तसेच नागपूर शहरातील मान्यवर कलावंत एम,ए. कादर, झेनेट कादर , अब्दुल जहीर , सुनिल कोंगे ,राजू समर्थ,राजू व्यास ,अविनाश घोंगे,उदय राजकारणे , मयंक भोरकर, राजेश बुरबुरे आदींचा समावेश आहे.
महत्वाचे म्हणजे लाॅकडाउनमुळे गेल्या दिड वर्षांपासून मंच कलावंतांचे सर्व प्रकारचे व्यवसायिक कार्यक्रम बंद असल्याने अनेक कलावंतांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे.
या स्पर्धेच्या प्रवेश शुल्काद्वारे गोळा होणारा निधी अशा कलावंतांच्या मदतीसाठी उपयोगात आनणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष पी.कुमार यांनी सांगीतले असून या उदात्त हेतूसाठी जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
अत्यंत कमी कालावधीत ऑस्करने कलावंतांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवून अनेक गरजू कलावंतांना मदतीचा हात दिला आहे .याच बाबीचा धागा पकडून पार्श्वगायक सोनू निगम यांनी ‘ऑस्करच्या स्पर्धेत सहभाग म्हणजे गरजू कलावंतांना मदतीचा हात ’असा संदेश दिला तर सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांनी ही स्पर्धा म्हणजे ‘मिले सूर मेरा तुम्हारा’असल्याचे सांगून भाषा,प्रदेश इ.च्या सीमा ओलांडून या सूरमयी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
सुप्रसिद्ध संगीतकार सुरमणी पं.धाकडे गुरुजी यांनी ‘देशभरातील हौशी कलावंतांना ऑस्करने प्रदान केलेली ही सुवर्ण संधी’ असल्याचे सांगितले तर महाराष्ट्राचे महागायक असणारे अभिजित कोसंबी यांनी ’कलावंतांसाठी हा सर्वाधिक कठीण असणारा काळ असल्यामुळे जास्तीत जास्त संख्येने या करोओके गीत स्पर्धेत सहभागी होऊन गरजू कलावंतांच्या आर्थिक मदतीसाठी समाेर येण्याचे’ आवाहन केले आहे.
या सर्व उपक्रमांसाठी अध्यक्ष पी.कुमार, उपाध्यक्ष प्रशांत खडसे, कोषाध्यक्ष संदीप मेश्राम, सचिव रिनेश जाणे , सहसचिव चन्द्रशेखर शामकुवर ,संचालक राजू गजभिये , संगीता गावंडे, संजीवीनी चौधरी, राजेश व्यास, देवानंद वाघमारे, अभिजीत कडु, वैशाली चंदेल हे अहोरात्र परिश्रम घेत आहेत .

स्पर्धेत भाग घेण्यासाठी फेसबुक किंवा सोशल मिडिया साईट्सवर लिंक उपलब्ध आहे , अशी माहिती देण्यात आली असून स्पर्धेत भाग घेण्यासाठी अंतीम तारीख १२ जून २०२१ आहे .
Chandrashekhar S.: paper news ,9067291285 या वाॅट्सअॅप & कॉलिंग नंबर वर देखील संपर्क करता येईल.




आमचे चॅनल subscribe करा
