फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजकरोना व्हायरसचा प्रँक भोवला; IT इंजिनीअर पोलीस कोठडीत

करोना व्हायरसचा प्रँक भोवला; IT इंजिनीअर पोलीस कोठडीत

Advertisements

बेंगळुरूः करोना व्हायरसने जगभर थैमान घातलंय. सरकार आणि प्रशासकीय यंत्रणांकडून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्यात जात आहेत. पण अशा गंभीर वातावरणात एका आयटी इंजिनीअरने करोनावर प्रँक केला. हा प्रँक त्याला खूप महागात पडला आणि थेट पोलीस कोठडीची हवा खावी लागली.

‘चला एकजूट व्हा आणि सर्वांनी बाहेर पडा. बाहेर आल्यावर मन मोकळेपणाने शिंका आणि हा व्हायरस पसरवा’, असं म्हणत इन्फोसिसमधील आयटी इंजिनीअर मुजीब मोहम्मदने (वय ३८) व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला. एक प्रँक म्हणून त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. पण सोशल मीडियावरून त्याच्यावर अनेकांनी जोरदार टीका केली. अशा तणावाच्या आणि गंभीर वातावरणात असा प्रकार योग्य नसल्याचं अनेकांनी म्हटलं. यानंतर या प्रकरणाची दखल इन्फोसिसनेही घेतली.

इन्फोसिसने या प्रकरणाची आधी चौकशी केली. यानंतर मुजीब मोहम्मद याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. इन्फोसिसने त्याला नोकरीवरून काढल्यानंतर पोलिसांनी मुजीबला शुक्रवारी संध्याकाळी अटक करण्यात आली. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी त्याच्यावर कलम ५०५, २७० आणि १९० अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला. करोना व्हायरस पसरवण्यासाठी चिथावल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे, बेगळुरूचे पोलीस उपायुक्त कुलदीप जैन यांनी ही माहिती दिली. आयएएनएसने हे वृत्त दिलंय.

पोलिसांनी मुजीबला आज स्थानिक कोर्टात हजर केलं. मुजीबने सायबर कायद्यांतर्गत गुन्हा केला आहे. त्याची चौकशी करायची आहे. यामुळे त्याला पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी कोर्टाकडे केली. कोर्टाने पोलिसांचं मागणी मान्य करत मुजीबला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय.

मुजीब आता पोलीस कोठडीत आहे. त्याने असं आक्षेपार्ह ट्विट का केलं? याची आम्ही चौकशी करणार आहोत. त्याच्याकडून दोन मोबाइल फोन आणि एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. त्याच्या मोबाइल आणि लॅपटॉपमधून आणखी काही आक्षेपार्ह गोष्टी मिळतात का? याची चौकशी पोलीस करत आहेत. अशा प्रकारची आक्षेपार्ह पोस्ट का केली? असा प्रश्न पोलिसांनी मुजीबला केला. मला असं वाटलं म्हणून सोशलवर पोस्ट केलं, असं सहज उत्तर मुजीबने दिल्याचं जैन यांनी सांगितलं.

मुजीब हा गेल्या २५ वर्षांपासून बेंगळुरूत राहतो. त्याने गुरुवारी ट्विटरवर करोना व्हायरससंदर्भात आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केला होता. सोशल मीडियावर या व्हिडिओवरून मोठा वाद झाल्याने हे प्रकरण मुजीब काम करत असलेल्या इन्फोसिस कंपनीकडे गेलं. कंपनीने याची गंभीर दखल घेतली आणि शुक्रवारी त्याला नोकरीवरून काढून टाकलं. मुजीबन केलेला प्रकार हा कंपनीच्या नियमांचं उल्लंघन आहे आणि सोशल शेअरींग बाबत कंपनी अतिशय गंभीर आहे, असं इन्फोसिसने त्याला नोकरीवरून काढताना स्पष्ट केलंय.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या