फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजकरोना बाधितांवर अत्यंसंस्कार करणा-यांनाच चार महिन्यांपासून पगार नाही!

करोना बाधितांवर अत्यंसंस्कार करणा-यांनाच चार महिन्यांपासून पगार नाही!

Advertisements

अजब मनपाचा गजब कारभार!कंत्राटदाराची अशी ही पिळवणूक!

नागपूर,ता. २८ मार्च: फेब्रुवारी महिन्यांपासून करोना बळींची संख्या ९ पटींनी वाढली त्यामुळे त्यांचे पार्थिव थेट रुग्णालयातून श्‍मशान घाटात तसेच दफन भूमित नेण्यासाठी महानगरपालिकेने इतर १२ शववाहिकेसोबतच दोन बस रुग्णवाहिकेत परिवर्तित केले त्याचबरोबर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मनपाने पथकात ही वाढ केली मात्र या शववाहिका चालविणा-या वाहकांनाच गेल्या चार महिन्यांपासून पगार मिळाला नसल्याची धक्कादायक माहिती सूत्राकडून प्राप्त झाली.

मेडीकल तसेच इतर रुग्णालयातून एकाच दिवसात ११-११ मृतदेह श्‍मशान घाटात पोहोचविण्याचे काम हे शववाहिका चालक करीत असतात,एवढंच नव्हे तर करोना बाधित मृतकांवर अंत्यसंस्कार करण्याची जवाबदारी देखील ते पार पाडतात.त्यामुळे इतर ठिकाणाहून मृतदेह आणण्यासाठी त्यांना विलंब ही होतो.काल ‘सत्ताधीश’ने मेडीकल रुग्णालयातील शवागारातून ७२ वर्षीय करोना बाधित मृतकाचे पार्थिव मानेवाडा श्‍मशान घाटावर पोहोचवण्यिासाठी हनुमान नगर झोनमधील शववाहिकाच दूपारी अडीच वाजेपर्यंत उपलब्ध झाली नसल्याचे वृत्त दिले.

या घटनेमुळे मनपाच्या एकदंरित असंवेदनशील कारभारातील आणखी एक काळा पैलू ‘सत्ताधीश’समोर आला.मनपा प्रशासनाने एका माजी लष्करी अधिका-याला मनपात सुरक्ष्ा रक्ष् क पुरविण्याचा कंत्राट दिला आहे.सुभाष नगर येथे या कंत्राटदाराचे कार्यालय आहे.त्याने १५० सुरक्ष्ा रक्ष् कांपैकी ४० सुरक्ष्ा रक्ष् कांना ‘करोनाच्या लाटेतील सुवर्ण संधीत’शववाहिकेच्या चालकाची नोकरी करण्यास भाग पाडले.
हे शववाहिका चालक दिवसाला वेगवेगळ्या रुग्णालयातून किमान ११-११ मृतदेह वेगवेगळ्या श्‍मशान घाटावर पोहोचविण्याचे काम इमाने-इतबारे करतात,एवढंच नव्हे तर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची जवाबदारी देखील त्यांनाच पार पाडावी लागते.या कामाचे त्यांना दरमाह १२ हजार रुपये तसेच पेट्रोलचे २ हजार रुपये अतिरिक्त देण्याचा करार केला जातो.

मात्र गेल्या ४ महिन्यांपासून या शववाहीका चालकांना काही मनपा प्रशासकीय अधिका-्यांचा ‘खासमखास’असणा-या लष्कराच्या त्या कंत्राटदाराने चक्क पगारापासूनच वंचित ठेवले असल्याचे धक्कादायक वृत्त आहे.ईएसआय,पीएफ इ.च्या नावावर पगारात कटौती करुन या शववाहिका चालकांना ९ हजार २०० रुपयांचा पगार देण्यात येत असल्याचे कागदोपत्री जरी दस्तावेज उपलब्ध असले तरी प्रत्यक्ष् या चालकांच्या हातात फक्त ७ हजार रुपये पडतात!

प्रत्येक कर्मचा-याच्या पगारातून कपात करण्यात आलेले चालकाच्या कष्टाच्या पैश्‍यात कोणाकोणाची ‘हप्ताखोरी’असते या विषयी बरीच चर्चा मागे ही झडली,काही संघटनांनी आंदोलन ही केली,काही पदाधिकारी यांनी पत्र परिषद घेऊन मनपाला सुरक्ष्ा रक्ष् क पुरविणा-या व कर्मचा-यांचे आर्थिक शोषण तसेच मानसिक पिळवणूक करणा-या या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्याची मागणी ही केली होती मात्र नागपूरकर जनतेच्या कष्टाच्या पैश्‍यांवर डल्ला मारुन ढेकर ही न  घेण्याची सवय जडलेल्या काही मनपा प्रशासकीय अधिका-यांना व त्यांच्यामार्फत काही पदाधिका-यांना पोहोचत असलेल्या ‘मलिद्या’मुळे कोणतीही कारवाई त्या कंत्राटदारावर अद्यापही झाली नाही.
या अन्यायाविषयी कंत्राटदाराशी शववाहिका चालक बोलायला गेल्यास कंपनीची हालत खस्ता आहे,काम करायचे असेल तर करा नाही तर सोडून द्या,असा दम कंत्राटदार देत असल्याची व्यथा काही शववाहिका चालकांनी मांडली.

बळी वाढताच आता पुन्हा काही बसेसचे परिवर्तन शववाहिकेत केल्याचा ‘गाजावाजा’मनपाने केला असला तरी शेवटी त्या चालविणा-या चालकाला ही कुटुंबिय आहेत,आर्थिक गरजा आहेत,नोकरीची गरज आहे,त्यामुळे त्याची आर्थिक पिळवणूक होऊ नये हे बघण्याची जवाबदारी अखेर कोणाची?

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या