

अनेक किन्नर देह व्यवसायाकडे ओढले जात आहे,एचआयव्हीचाही धोका वाढला
‘सारथी‘ट्रस्टने दिला मदतीचा हात
नागपूर,ता. ५ मे: करोना या महामारीमुळे सर्वच समाजातील सर्वच वर्गातील सर्वच स्तरातील लोकं आर्थिकरित्या भरडल्या जात आहेत,मात्र तृतीयपंथी हा समुदाय गेल्या वर्षभरापासून शंभर टक्के उधवस्त झाला आहे,उत्पन्नाचे माध्यम असणारी वाहतूक व्यवस्थाच ठप्प आहे,दूकाने देखील ठराविक वेळेसाठी उघडतात,सर्वच घटक त्रस्त व भयभीत असल्यामुळे कोणीही एका पैश्याचीही मदत न करता दूकानांसमोरुन यांना झिडकारुन देतात,पोटाची खळगी मात्र वणवण भटकवते,अश्यावेळी एलजीबीटींसाठी काम करणा-या ‘सारथी’ट्रस्टने मदतीचा हात पुढे केला. सारथी ट्रस्टच्या बर्डीवरील कार्यालयात किन्नर व एलजीबीटी समुदायातील अन्य गरजूंना जवळपास ३०० जीवनावश्यक वस्तूंच्या किट्सचे काल वाटप करण्यात आले.

यात कनिक,तांदूळ,डाळ,तेल,साखर,मीठ,साबण,मसाले यांचा समावेश आहे.मागील लॉकडाऊनच्या काळात शहरातील अनेक स्वयंसेवी संस्था या घटकाच्या मदतीसाठी पुढे आले होते यावेळी मात्र प्रर्दीघ काळासाठीचा संघर्ष सुरु असल्याने त्यांची ही दानत जणू संपली.परिणामी सारथी टस्टचे सीईओ निकुंज जोशी यांनी तृतीयपंथींची मदत विविध कोविड केंद्रावर घ्यावी मात्र त्यांच्या हाताला काम देण्याची विनंती नागपूर महानगरपालिकेला केली आहे.
मदत वाटपाच्यावेळी या घटकाची एचआयव्ही चाचणी देखील करण्यात आली. उत्पन्नाचे कोणतेही स्त्रोत नसल्याने आता हा घटकातील युवा वर्ग देह व्यापाराकडे ओढल्या जाण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे विदारक सत्य त्यांनी सांगितले.यामुळे एचआयव्हीचा थांबलेला प्रसाराला पुन्हा चालना मिळू शकते,असे अशी शंका त्यांनी व्यक्त केली.

करोनाच्या भीषण परिस्थितीत एकीकडे खासगी रुग्णालये ४-५ लाख डिपॉझिट घेत आहेत तर दूसरीकडे शासकीय रुग्णालयांमध्ये खाटाच उपलब्ध नाहीत,अश्यावेळी इतरांसोबतच समाजातील हा घटक कुठे जाणार?असाच हकनाक मरणार का?असा सवाल त्यांनी केला.
परिणामी समाजातील जे दानदाते मदत देऊ शकतात त्यांनी देखील या घटकासाठी पुढे यावे असे आवाहन निकुंज जोशी यांनी केले.याशिवाय राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने किन्नरांना १५०० रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे,हे अनुदान त्यांना कधीपर्यंत मिळणार आहे?शासकीय खानापूर्तीमध्येच हे जाहीर झालेले अनुदान अडकले असून येथे राेज जगण्या मरण्याचा प्रश्न उद् भवला असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.
किट वितरणप्रसंगी विद्या कांबळे, सारथीचे अध्यक्ष् आनंद चंद्राणी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.




आमचे चॅनल subscribe करा
