फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमकरोनामुळे मृत्यू पावलेल्या पोलीस अंमलदारांच्या कुटुंबियांना सानुग्रह सहाय्यता राशि प्रदान

करोनामुळे मृत्यू पावलेल्या पोलीस अंमलदारांच्या कुटुंबियांना सानुग्रह सहाय्यता राशि प्रदान

Advertisements

नागपूर,ता. २९ ऑक्टोबर: करोना या विषाणूने सध्या जगभरच थैमान घातले असून या विषाणूविरुद्ध लढताना अनेकांचा बळी गेला आहे.यात राज्यातील पोलीसकर्मींचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे. आपल्या प्राणाची पर्वा न करता कर्तव्य बजावताना दूर्देवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेप्रमाणे नागपूरात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते मृत पावलेल्या पोलीसकर्मींच्या कुटुंबियांना आज ५० लाख रुपये सानुग्रह सहाय्यता राशिचा धनादेश प्रदान करण्यात आली.

नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर कार्यरत पोलीस कर्मचारी हवालदार रमेश पाल(पारडी पोलीस ठाणे)पोलीस हवालदार प्रकाश पाटील(शांतीनगर पोलीस ठाणे)पोलीस हवालदार रविंद्र दमाहे(सक्करदरा पोलीस ठाणे)पोलीस शिपाई प्रविण सुरकार(सक्करदरा पोलिस ठाणे)हे पोलीस अमंलदार कोविड-१९ काळात आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना करोनाचे संक्रमण झाले व वैद्यकीय उपचारादरम्यान त्यांचा दूर्देवी मृत्यू झाला.

या पोलीस अंमलदारांच्या सानुग्रह सहाय्य राशिच्या प्रस्तावास पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या निर्देशाखाली पोलीस समाधान कक्ष्,पोलीस आयुक्त कार्यालय यांनी तातडीने कागदोपत्री कारवाई पूर्ण करुन पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनाला विनाबिलंब सादर करुन प्रत्येकी ५० लाख रक्कम वेळेत मंजुर करुन घेतली.

आज सकाळी पोलीस जिमखाना,सिव्हिल लाईन्स येथे दिवंगत पोलीस अंमलदारांचे वारस पत्नी श्रीमती गीता सुरेश पाल,श्रीमती रंजना प्रकाश पाटील,श्रीमती साक्ष्ी रविंद्र दमाहे,श्रीमती शितल प्रविण सुरकार यांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचा धनादेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते प्रदान करण्यात अाला.

याप्रसंगी आयुक्तांनी या कुटुंबियांना भविष्यात कोणतीही अडीअडचण आल्यास नागपूर शहर पोलीस सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सहकार्य करेल असे आश्‍वासन दिले.

याप्रसंगी अपर पोलीस आयुक्त(गुन्हे)सुनिल फुलारी,संदीप पखाले,पोलीस उप आयुक्त(मुख्यालय)गजानन राजमाने,पोलीस उप आयुक्त(डिटेंक्शन) नागपूर शहर उपस्थित होते.

सदर उपक्रमात पोलीस निरीक्ष् क उमेश बेंसरकर,मानव संसाधन विभाग,पो.हवा राम शास्त्रकार(प्रमुख)मपोशि रिता कोहरे,पोलीस समाधान कक्ष्,पोलीस आयुक्त कार्यालय यांनी महत्वपूर्ण कमगिरी पार पाडली.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या