फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजकरोनाबाधित भागवत सुखरुप घरी:सहायक शिक्ष् क मृत्यूच्या दारी!

करोनाबाधित भागवत सुखरुप घरी:सहायक शिक्ष् क मृत्यूच्या दारी!

Advertisements

गडकरींंचे ५ वेंटिलेटर दंदेंसाठी:मेडीकल रुग्णालय वा-यावर

महापौरांनी पुन्हा सांगितला फेसबूकवरुन मनपा बेडचा आकडा:मरणासन्न रुग्णांनाही मात्र मनपाचे दवाखाने दाखवतात शासकीयचा रस्ता!

नागपूर,ता. १७ एप्रिल: शहराच्या अनुषंगाने प्रसार-प्रचार माध्यमात आज एकसाथ दोन अति महत्वाच्या ठलक बातम्या प्रसिद्ध झाल्या.पहीली आहे सिद्धहस्त कर्करोगतज्ज्ञ डॉ.कृष्णा कांबळे यांचे मेडीकल रुग्णालयात करोनामुळे मृत्यू तर दूसरी बातमी होती सरसंघचालक मोहन भागवत कस्तुरचंद पार्कजवळीत किंग्जवे रुग्णालयातून सुखरुप घरी!

९ एप्रिल रोजी भागवत यांना करोनाचा संसर्ग झाल्यामुळे किंग्जवे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तर डॉ.कांबळे यांनी आपल्या वैचारिक तत्वनिष्ठेला कुठेही तिलांजली न देता करोनाचा संसर्ग झाल्यानंतरही शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या उपचारावरच भरवसा दाखवला आणि तिथेच भरती झाले.अनेकांनी त्यांना खासगी रुग्णालयात उपचार करण्याची विनंती ही केली मात्र मानवतावादी विचारधारेचे पाईक डॉ.कांबळे यांनी मेडीकलमध्येच उपचारासाठी प्राधान्य दाखवले.

या दोन्ही बातम्यांचे साधर्म्य साधून आज समाज माध्यमांवर बरीच वैचारिक चर्चा झडली.एकीकडे डॉ.मोहन भागवत यांना शहरातील अतिप्रतिष्ठित,नामांकित,सुप्रसिद्ध किंग्जवे रुग्णायलात सहज बेड उपलब्ध होतो मात्र नागपूर महानरगपालिकेच्या गांधी नगर येथील इंदिरा गांधी रुग्णायालात ऐन डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या रोजी डिगडोह ग्रामपंचायत अंतर्गत येणा-या पोलिसनगर येथील एका शिक्ष् काचा बेड न मिळाल्याने व इंदिरा गांधी रुग्णालयाने त्यांच्यावर कोणतेही उपचार न करता त्यांना मेडीकलचा रस्ता दाखविल्याने वाटेतच अगदी विद्यापीठ ग्रंथालयासमोर त्यांचा दूर्देवी मृत्यू होतो यावर टिकेची झोड उठवली.

९ एप्रिल रोजी भागवत यांना किंग्जवे रुग्णालयात सहज बेड उपलब्ध होतो मात्र त्याचवेळी या शहरात किती रुग्ण हे वेटिंगवर होते?याबाबत तीव्र संताप व्यक्त करीत किंग्जवेसारखे रुग्णालय हे फक्त किंग्ज,क्यूईन्स,प्रिंसेस अश्‍या राजेशाही लोकांच्या व राजकारण्यांवरील उपचारासाठीच आहे का?असा सवाल विचारला जात आहे.या तरुण शिक्ष् काला जगण्याचा हक्क नव्हता का?त्यांच्या मागे पत्नी,मुले,आई-वडील असे कुटुंबिय नाहीत का?सर्वात महत्वाचे म्हणजे विचारधारा कोणतीही असो हिंदूत्ववादी किवा भगवान गौतम बुद्धांची,महाभयंकर करोनाच्या जीवघेण्या लाटेत उपचारावर प्रत्येकाचा हक्क नाही का?एकीकडे आंबेडकर विचारधारेचे पाईक डॉ.कांबळे हे सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे शासकीय मेडीकल रुग्णालयात उपचार घेऊन समाजात जाता-जाता ही आणखी एक आर्दश प्रस्थापित करुन जातात दुसरीकडे हिंदूत्वादी विचारधारेचे सर्वेसर्वा सरसंघचालक मोहन भागवत यांच्या दररोजचे मेडीकल बुलेटीन या रुग्णालयाचे संचालक डॉ.सुभ्रजीत दासगुप्ता हे माध्यमांना पाठवित होते.यात भागवत यांचे शुगर लेवल किती,हाय प्रोटीन डायट किती?ज्यांचे तडफडून शासकीय व खासगी रुग्णालयांसमोर वेळेवर ऑक्सीजन न मिळाल्याने जीव गेलेत त्या सर्वसामान्यांना या माहितीचा काय उपयोग?एकाने कृतीतून आदर्श घडवला तर दूस-यांची फक्त ‘उक्तीच’घडली,अशी झोंबणारी टिका सोशल मिडीयावर उमटली.

सर्वात महत्वाचे म्हणजे शहरात असे किती खासगी रुग्णालये आहेत जी अनाधिकृतरित्या मनपाच्या अतिशय मोक्याच्या जागेवर आहेत?भारतीय जनता पक्ष्ाच्याच कोणकोणत्या नेत्यांनी शहरातील मोक्याच्या जागा हडपून त्या ठिकाणी खो-याने पैसा ओढणारे हॉस्पीटल्स उभारलेत?गरीब हॉकर्सच नव्हेतर दिव्यांगांची देखील दूकाने अतिक्रमणाच्या नावावर दररोज उधवस्त करणारी मनपाची यंत्रणा अश्‍या मोठ्या धेंड्यांनी केलेल्या अतिक्रमणावर गप्प का?करोनासारख्या महामारीच्या काळात तरी आपल्या हक्काच्या जागेवर निर्मित ही रुग्णालये मनपाने ताब्यात घेऊन सर्वसामान्यांसाठी का नाही चालवली?असा सवाल आता विचारला जात आहे.

एवढंच नव्हे तर किंग्जवेसोबत मनपाने टायअप करुन हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये १५० खाटांचे कोविड बेड सुरु केले,किती सर्वसामन्य रुग्ण या कोविड हॉस्पीटलचा उपयोग घेऊ शकणार आहेत?मनपा या संपूर्ण १५० खाटा आता नि:शुल्क उपचारासाठी सर्वसामान्यांना उपलब्ध करुन देणार आहे का?या प्रश्‍नाचे उत्तर जनतेलाही माहिती आहे.

महत्वाचे म्हणजे माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत संयुक्तरित्या ’मिशन विश्‍वास’हा उपक्रम शहरात राबवला.गेल्या वर्षी संघाच्या स्वयंसेवकांनी उस्फूर्तपणे या उपक्रमात सहभाग नोंदवित हजारो नागरिकांना करोना चाचणीसाठी घराबाहेर काढले.यंदा अचानक मात्र हा उपक्रमच बंद झाला.भाजपला आपले अपयश झाकण्यासाठीच स्वयंसेवकांना घरात डांबावे लागत आहे का?असा बोचरा सवाल आता विचारला जात आहे.करोनाने आपला स्टेन बदलला असून तो अधिक तीव्र व घातक झाला असताना व स्वयंसेवकांची सर्वाधिक गरज शहराला आज असताना कुठेही संघाचे अस्तित्व आज दिसत नाही,अशी टिका केली जातेय.

दूसरीकडे आत पुन्हा केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी फेसबूक लाईव्हद्वारे ५ वेंटिलेटर हे रविनगर चौकातील दंदे हॉस्पीटला दिले असल्याची वल्गना केली,यावर टिकेचा भडीमार करीत या वेंटिलेटर्सची खरी गरज आज नेमकी कुठे होती?असा प्रश्‍न विचारत मेडीकल किवा मेयो रुग्णालये जिथे सर्वसामान्य जनता उपचारासाठी येते तिथे का देण्यात आली नाही?असा प्रश्‍न उपस्थित केला,याचे कारण तिथे बेड्स उपलब्ध नाही,असे कारण एका अधिकारीने दिले असले तरी इतर भर्ती असणा-या रुग्णांना वेंटिलेटर्सची गरज नाही का?असा प्रश्‍न उपस्थित होतो.दंदे रुग्णालयात रुग्णांना मोफत उपचार मिळणार आहेत का?असा प्रश्‍न नेटिझन्सनी उपस्थित केला.

यावेळी गडकरी यांनी सर्व स्थानिक यंत्रणेला सहकार्य करण्याचे जनतेला आवाहन केले मग गेल्या १३ महिन्यांपासून जनता दूसरं काय करत आहे?रुग्णालये,डॉक्टर्स आणि वैद्यकीय यंत्रणा यांना सहकार्य करण्याचे आजही नागरिकांचा मनोदय असला तरी मनपासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेला का म्हणून जनतेने आज सहकार्य करावे?लग्नवेळी ज्याप्रमाणे संपूर्ण कुटुंब एकमेकांना सांभाळून घेतात,सहकार्य करतात तसेच सहकार्य करण्याचे आवाहन गडकरी यांनी केले यावर हा लग्नसोहळा नसून ‘मरणाचा उत्सव’असल्याची टिका करीत नेटिझन्सनी मरणाच्या या उत्सवामध्येही जनतेने मनपाला सहकार्य करावे का?असा प्रश्‍न उपस्थित केला.

विशेष म्हणजे गडकरी यांनी ६ हजार चाचण्या एकाच दिवसात करण्यात येणा-या दोन मोबाईल लॅब नागपूरात दाखल होत असल्याचा उच्चार केला मात्र यालाच उशिरा आलेली जाग नाही का म्हणता येणार?पुण्यात अश्‍या लॅब ३ महिन्यांपूर्वीच सुरु झाल्या त्याचे काय?श्रेयवादालाही काहीतरी मर्यादा नसते का?अशी झोंबणारी टिका केली.

आरोग्याची मर्यादित संसाधने असल्याचा कबूलीजवाब गडकरी यांनी देत सहकार्याचे आवाहन करीत वादविवाद टाळण्याचा सल्लाही जनतेला दिला.मर्यादित संसाधने आहेत याची उपरती असतानाही मग १३ महिने काय केले?असा खोचक प्रश्‍न नेटिझन्सने विचारला.

महापौर दयाशंकर तिवारी यांनी देखील गडकरी यांच्यानंतर फेसबूकवर आपले ‘मनोगत’मांडले.पुन्हा तीच ‘रि’ओढली,लवकरच मनपाच्या केटी रुग्णालयात ११० बेड,पाचपावलीत ११० बेड,इंदिरा गांधी रुग्णालयात ८८ बेड,पकवासा येथील आयुर्वेद रुग्णालयात १३६ बेड असे ७०० बेड नक्कीच पुढील आठवड्यात उपलब्ध करु,आम्ही व्यवस्था व संसाधन पाहतो तुम्ही अनुशासन पाळा,असे आवाहन महापौरांनी जनतेला केले.

आजच्या तारखेत शनिवार दि.१७ एप्रिल रोजी शहरात एकूण ७९ मृत्यूंची संख्या आहे,हेच आहेत का तुमचे संसाधन आणि व्यवस्थापन महापौर साहेब?

एकीकडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार दररोज सायंकाळी आढावा बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देतात.यामुळे पुणेकरांना धीर मिळतो,कुठे काय व्यवस्था झाली ही माहिती कळते,नागपूरात सर्व काही ‘आलबेल’आहे.येथे ज्यांच्याकडे स्मार्ट फोन नाही,इंटरनेट नाही त्यांना फेसबूक लाईव्हद्वारे कोणत्या नेत्याने कुठे काय व्यवस्था केली,हे कसे कळणार?

दूसरीकडे मुंबईत मनपा आयुक्त चहल हे देखील दररोज सायंकाळी दिवसभरातील घडामोडींची माहिती पत्रकारांना पुरवितात.नागपूरात मनपा मात्र काय माहिती देणार?एकीकडे मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयातून अतिगंभीर रुग्ण असणारे शिक्ष् क यांनाच बाहेरचा रस्ता दाखवला जातो,अर्ध्या रस्त्यात त्यांचा दूर्देवी मृत्यू होतो दूसरीकडे महापौर हे फक्त बेडचे आकडे सांगण्यात धन्यता मानताना दिसतात,याला काय म्हणावे?

त्यामुळेच संघाच्या स्वयंसेवकांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरावे,करोना बाधितांच्या सेवेचे व्रत स्वीकारावे,कॉन्टेक्ट ट्रेसिंग,विलगीकरण,अलगीकरण इ.अत्यावश्‍यक कार्यात सहकार्य करावे,अशी मागणीच नव्हे तर अपेक्ष्ा आता व्यक्त केली जात आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे गडकरी यांच्या फेसबूक लाईव्ह दरम्यान सर्वाधिक कमेंट्स या ‘मुंढेंना परत आणा’या होत्या,यावरुन नागपूरकर जनतेला करोनाच्या या भीषण आणि भयाण मृत्यूच्या दाढेतून त्यांना वाचविण्यासाठी अद्यापही ही माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरच विश्‍वास असल्याचे दृष्टिक्ष्ेपात येतं.एवढंच नव्हे तर माजी महापौर संदीप जोशी आणि मुंढे यांचीच जोडी नागपूरला पुन्हा एकदा करोनाच्या संकटापासून जास्त प्रभावीपणे वाचवू शकते,असे देखील नेटीझन्सने कमेंट्स केलेत.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या