सेंट जाॅर्ज रुग्णालयातील परिचारिकेने व्यक्त केला संताप
नागपूर: ‘काेरोना’या विषाणूची दहशत माणसाच्या मनात किती खोलवर रुजली आहे याचे पडसाद आता माणूस जिथे ‘जिवन’शोधायला जातो तश्या ‘रुग्णालयात’देखील उमटायला लागले. लॉक डाऊनच्या तिस-या आठवड्यात आज जिथे फक्त करोना’ संशयितांप्रति’ पराकोटीचा सामाजिक तिरस्कार आणि बहीष्कार बघायला मिळतोय तिथे करोनाबाधिताचा ठपका घेऊन जग सोडून गेलेल्या मृतदेहाविषयी काहीही न बोललेच बरे. अजून तर फार मोठा पल्ला सर्वांनाच गाठायचा आहे. मुंबईच्या सेंट जार्ज रुग्णालयातील एका परिचारिकेने या विषयी सोशल मिडीयावरच चक्क डॉक्टरांच्या एकंदरीत भूमिकेवरच संताप व्यक्त केल्याचा व्हीडीयो चांगलाच व्हायरल झाला आहे.
मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णायलायत नुकताच एका करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला मात्र जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत मृतदेहाची काळजी घेण्याचे सर्व सोपस्कार हे डॉक्टर्स,परिचारीका व आरोग्य सेवकांना पाळावेच लागतात. मात्र या ठिकाणी नेमून दिलेले डॉक्टर्स हे आयसीयूमध्ये फिरकले देखील नाहीत असा अारोप या परिचारिकेने केला आहे. चार वाजले तरी ते अायसीयूत आले नाही तर बाहेरच बसून राहीलेत. मी व अारोग्य सेवकांनी त्यांना खूपदा विचारले अहवाल आला का?तर त्यांनी नकारार्थी उत्तर दिले,नाही आला.मात्र मला माझ्या मोबाईलवर अन्य एका डॉक्टांनी कळवले,रुग्ण हा करोना पॉझिटिव्ह आहे! ही बाब त्या अन्य डॉक्टरांनी आमच्यापासून का लपवली?ते स्वत: मृतदेहाकडे फिरकले सुद्धा नाहीत.अहवाल तर त्यांच्याकडे आधी आला होता.
अहवाल आल्यानंतर आम्हाला आता आत जाता येत नव्हतं.डॉक्टरांमध्येच वाद सुरु झाला,कोण आत जाणार?सर्वच डॉक्टरांनी हात झटकले. रुग्णालयाचे डॉक्टर्स असे बाेलूच शकत नाही,मी आत जाणार नाही.परिचारिका व अारोग्य सेवकांवर ड्यूटी करणे बंधनकारक असताना डॉक्टर्सच एक तास भांडत बसले,ते ड्यूटी करणार नाहीत!एवढ्या वादविवादानंतर एका डॉक्टरने मृत रुग्णाच्या तोंडवरील फक्त नळी काढण्याचे कबूल केले. त्यांनी तितकेच केले आणि निघून गेलेत. मला प्रशिक्ष् ण असल्यामुळे मी योग्य ती काळजी घेत मृतदेह विशिष्ट पद्तीने गुंडाळू लागले मात्र आरोग्य सेवक यांना कोणतेही प्रशिक्ष् ण नसल्यामुळे एका सेवकाने जोरात एक नळी ओढली,यामुळे खोलीभर विषाणू पसरण्यात भरच पडली.
आम्ही जीव जोखिमेत खालून आरोग्य सेवा देतोय मात्र आमचे वरिष्ठ डॉक्टर्सच आमचा जीव असा धोक्यात घालत असल्याचा संताप त्या परिचारिकेने व्यक्त केला.करोना बाधित मृतदेहाजवळ कमीत कमी लोकांनी कमीत कमी वेळ थांबणे गरजेचे असताना पुन्हा हे डॉक्टर्स आपापसात भांडले कारण मृतदेहाला अनेक जिवनरक्ष् क प्रणालीच्या नळया लागल्या होत्या. जे फक्त डॉक्टर्सच काढू शकतात.डॉक्टर्स लोकांच्या भांडणामुळे आमची चौघांची जोखिमेची वेळही अजून वाढत गेली.मोठ्या मुश्कीलीने एक डॉक्टर आत आले त्यांनी मृतदेहावरची सेंट्रल लाईन काढली आणि लगेच बाहेर पडलेत.मृतदेह बांधतांना आरोग्य सेवकांना विशिष्ट कपडे कसे खालावे,कसे काढावे याचेही प्रशिक्ष् ण दिल्या गेले नव्हते. त्यांना दोष देऊन उपयोगच नाही.
संसर्ग नियंत्रित करणे याची ही माहिती त्यांना नव्हती,कुठेपण ते हात लावित होते.दीडशे किलोचा रुग्ण होता,त्यात अतिशय लहानशी खोली,ज्यात पंख्याची पण सुविधा नव्हती. त्या स्थितीत बोलणेही धोकादायक होते मात्र मला त्या तीन हाडकुळे आरोग्य सेवकांसोबत सतत बोलावं लागलं. कोविड-१९च्या आरोग्य सेवेच्या दिशानिर्देशक तत्वांचा नुसता फज्जा उडाला होता.
तो रुग्ण मुस्लिम धर्माचा होता.आम्ही आरोग्य सेवकांना धर्माचं काही एक घेणे-देणे नाही मात्र रुग्णालयाचे एक मुस्लीम डॉक्टर हे आम्हाला येऊन सांगतात,मृतदेहाचे तोंड पुन्हा उघडा त्यांच्या नातेवाईकांना त्यांचा चेहरा बघायचा आहे!
आम्ही चौघेही मूर्ख होतो का?चार तास आम्ही मृतदेह विविध औषधोपचरात बांधला आणि आता एका मुस्लीम धर्मीय डॉक्टरांच्या आदेशाने पुन्हा मृतदेहाचे तोंड उघडून जोखिम पत्करायची?त्यांनी सांगितले वरिष्ठांशी माझे बोलणे झाले आहे.मात्र आम्ही चौघांनी याचा विरोध केला. वरिष्ठ असो किंवा आणखी वरिष्ठ,करोनाबाधित मृतदेहाची विल्हेवाट लावताना अतिशय कडक असे दिशानिर्देश देण्यात आले आहेत.आम्ही मृतदेहाचे तोंड पुन्हा उघडणार नाही कारण त्या मृतदेहातूनही अनेकांना संसर्ग होण्याचा धोका हा जिवंत माणसाएवढाच असल्याने आम्ही त्या डॉक्टरची सूचना धूडकावून लावली.
यानंतर मृतदेह हा नातेवाईकांकडेही सोपविण्यात येत नाही.रुग्णवाहिकेतून या करोनाबाधित रुग्णाच्या मृतदेहाला सरळ अंत्यविधीसाठी नेण्यात आले.कळस तर तेव्हा झाला तीन पैकी एका आरोग्य सेवकाला जायची इतकी घाई की त्याने सुरक्ष्ेसाठी वापरलेला अंगरखा हा अगदी निष्काळजीपणे अंगातून काढला. ठिक आहे शासनाने प्रशिक्ष् ण दिले नाही मात्र स्टाफ सांगतेय तर ऐकायचे तरी.त्याने तो सुरक्ष्ा पोशाख काढताना स्वत:च्याच कपड्यांना सर्वदूर स्पर्श केला! व तसाच निघून गेला.
एक आरोग्य सेवकाने गरम पाण्याने आंघोळ केली व डॉक्टरांना विचारले कुठे झोपायचं?तर डॉक्टर चक्क त्याला ओपीडीमध्ये झोपण्यास सांगतात.दुसरा आरोग्य सेवक याच्याकडे तर गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर बदलण्यासाठी कपडे देखील नव्हते तो तसाच ओल्या कपड्यांनी बाहेर पडला.ओल्या कपड्यात चक्क तो आरोग्यसेवक घरी गेला. मी विचारले मी कुठे झोपावे तर मला सांग्णयात आले इथे आंघोळ करा आणि घरी जा!याला मी आक्ष्ेप घेतला,मी का जाऊ घरी?माझ्या घरी माझ्या दोन मुली आहेत,कुटुंबिय आहेत त्यांना करोनाचा संसर्गचा धोका मी वाढवू शकत नाही.माझी इथे राहायची सोय तुम्हीच करायची ,मी घरी जाणार नाही.
मला नर्सिंग कॉलेजमध्ये जाऊन राहण्याचा आदेश देण्यात आला मी विचारले मला नर्सिंग होममध्ये नाही का जाता येणार?नर्सिंग कॉलेजला का जावं? जे करोना पॉझिटिव्हच्या संपर्कात आले अश्या स्टाफला घरी जाऊ न देता २४ तास, ४८ तास आमच्यावर देखरेख असावी.मृतदेहाच्या कागदोपत्री सोपस्कारामुळे पोलिसांशी देखील संपर्क आला. धोका वाढला.मला माझं स्वत:चं सुसज्ज घर असताना नर्सिंग होमचीही गरज नव्हती मात्र ही वेळ अतिशय धोकादायक आणि गंभीर आहे. मला विलगीकरणाची नितांत गरज असताना नर्सिंक होमच्या सर्व खोल्या या आधीच देऊन टाकण्यात आल्या. खरे तर करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर योजना क्र.२ ही शासनाकडे तयार असली पाहिजे. असे रुग्ण हाताळयानंतर स्टॉफनी कुठे थांबावे?
स्टॉफ,परिचारिका,आरोग्य सेवक हे दररोज अनेक करोना संशयितांच्या संपर्कात येत आहे. आमच्यासाठी वेगळी व्यवस्थाच प्रशासनाने केलीच नाही. आम्हाला पण विलगीकरणाची गरज आहे.जेवण,आंघोळ,झोपेची गरज आहे. आम्ही फाईव्ह स्टार हॉटेलचे जेवण मागत नाही मात्र आम्ही सतत करोनाबाधित रुग्णांच्या जवळ राहायचे आणि डॉक्टर्स मंडळी ही फक्त दारा जवळून सूचना देऊन निघून जाते.डॉक्टर मंडळीच आत येत नाही याचा अर्थ रुग्णाजवळ येणे यात पराकोटीची जोखीम आहे हे जर डॉक्टरर्स लोकांना कळतं तर आम्ही काही मागणी करतो तर तुम्ही आम्हाला ‘पॅनिक’ठरवून मोकळे कसे होता,असा पराकोटीचा आणि तेवढाच तळमळीचा संताप डोळ्यात अश्रू आणून या परिचारिकेने व्हायरल व्हिीडीयोत व्यक्त केला आहे.
आज महाराष्ट्रातील करोना बाधितांची संख्या ही हजारांच्या वर गेली आहे. देशात सर्वाधिक करोना बाधित हे महाराष्ट्रात त्यातल्या त्यात मुंबईत आहेत. येथे प्रत्येकाचा धीर संपत आला आहे. प्रत्येकाला करोना भयाने खोलवर ग्रासले आहे. अश्या कठीण समयी अहोरात्र सेवा देणारे डॉक्टर्स असो किवा परिचारिका,आरोग्य सेवक यांच्या जोखिमेची तसेच ‘माणूस’ म्हणून त्यांच्या मनातील भीतीची देखील दखल ही सरकारला, प्रशासनालाच नव्हे तर देशातील जनतेलाही घ्यावीच लागेल,असा संदेशच जणू या व्हिीडीयोतून नेटीझन्सला मिळाला आहे,असेच म्हणावे लागेल.




आमचे चॅनल subscribe करा
