

आम जनतेचे निवेदन ही स्वीकारत नाही
समाज माध्यमात तुकाराम मुंढेंशी तुलना
राष्ट्र निर्माण संघटनेचे निलेश नागोलकर यांना आयुक्तांचा भेटण्यास नकार
नागपूर,ता. ६ मे: करोना महामारीच्या काळात नागपूरकर जनतेच्या आरोग्याची काळजी ज्यांच्यावर आहे ते नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन.बी हे मनपा मुख्यालयात आपल्या कक्ष्ाच्या बाहेरच पडत नसल्याची चर्चा समाज माध्यमांवर उमटत असताना आज राष्ट्र निर्माण संघटनेचे अध्यक्ष् निलेश नागोलकर हे मनपाच्या परवानगीने शहरात सुरु करण्यात आलेल्या खासगी हॉटेल्समधील कोविड केअर केंद्रांद्वारे सुरु असणा-या आर्थिक लृटीविरोधात तक्रार देण्यास मनपा मुख्यालयात गेले असता आयुक्तांनी त्यांना भेटण्यास व त्यांचा अर्ज स्वीकारण्यास चक्क नकार दिला!

त्यांच्या स्वीय सहायकाने नागोलकर यांना करोनाच्या कारणाने मनपा आयुक्त कोणालाही भेटत नसल्याचे कारण सांगितले असता,ज्या मनपा आयुक्तांवर शहराच्या ३० लाख नागरिकांच्या आरोग्य व्यवस्थेची काळजी वाहण्याची प्रशासकीय जवाबदारी आहे तेच करोनाच्या भीतीने आपल्या कक्ष्ाच्या अभेद भिंतीमध्ये असे दडून बसत असल्याने समाज माध्यमांवर आता चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे.या पूर्वीच आयुक्तांनी आदेशाद्वारे मनपा मुख्यालयात नागरिकांना येण्याची बंदी घालून संपूर्ण दारे लाऊन घेतली आहे,हे विशेष!
मनपा आयुक्तांना आज शासन लाखो रुपये पगार देते,सध्या साथरोग कायदा शहरात लागू आहे,करोनाने आक्राळविक्राळ रुप धारण केले असून ६० हजारांच्या वर नागरिक हे करोना संसर्गित आहेत,शहरात असे एक ही घर नाही ज्यांच्या घरात मृत्यूची वार्ता धडकली नाही,अश्यावेळी मनपा आयुक्त हे करोनाच्या भीतीने नागरिकांनाच भेटण्यास टाळत असतील तर असा हा अधिकारी पगार कशाचा घेतो?असा संताप नागोलकर यांनी उपस्थित केला.
हे जनतेचे अधिकारी आहेत की पगाराचे उत्तराधिकारी?असा प्रश्न आता निर्माण झाला असून नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरात करोना महामारीने उच्चांक गाठला असतानाही एक ही जंबो कोविड सेंटर उभारण्यात आले नाही,उलट अनेक खासगी हॉटेल्सला कोविड सेंटर म्हणून मनपाने परवानगी दिली.या हॉटेल्सवर कोणतेही नियंत्रण मनपाचे नसून हे हॉटेल्स सौम्य लक्ष् णे असेलेल्या करोना बाधितांकडून लाखो रुपयांची लृट करीत आहेत.
शासकीय आरोग्य यंत्रणेवर कधी नव्हे तो इतका भार पडल्याने जे नागरिक पैसे देऊ शकतात अश्या रुग्णांसाठी अनेक हॉटेल्समध्ये बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे.या हॉटेल्सने अनेक खासगी रुग्णालयांसोबत ’टायअप’केले असून येेथे भर्ती होण्याचे शुल्कच लाखो रुपये आहे.अनेक हॉटेल्स हे ५ दिवसांचे २ लाख रुपये उकळत आहेत.
यावर नागपूर महानगरपालिकेच्या ‘कर्तव्यदक्ष्’ अधिका-यांचे हेतुपुरस्सर ‘दूर्लक्ष् ’असून यासंबधीची तक्रार अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांना दिली असता सध्या अश्या कोविड केंद्रांवर मनपाच्या शुल्काचे कॅपिंग नसल्याचे त्यांनी सांगितले.मनपाने अद्याप अश्या कोविड केंद्रांचे दर निश्चित करण्याचे आदेश काढले नसल्याने खासगी कोविड केंद्रे हे रुग्णांची लृट करीत असल्याचे त्यांनी मान्य केले.
मग प्रश्न निर्माण होतो,गेल्या एका महिन्यापासून शहरात करोनाच्या दुस-या लाटेने थैमान घातले आहे अश्यावेळी मनपाचे प्रशासन व सत्ताधारी नेमके काय करीत आहेत?शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये बेड मिळवण्यासाठी मारमारी होत असताना अश्या कोविड केंद्रांना परवानगी देतानाच याचे दर निश्चित का करण्यात नाही आले?
मनपाचे जे सत्ताधारी लसीकरण केंद्रांचे व बेड्सच्या उद् घाटनाचे छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आघाडीवर असतात त्यांनी नागरिकांची ही अशी लृट थांबविण्यासााठी तातडीने पुढाकार का नाही घेतला?कि येथे ही त्यांची व मनपाच्या आरोग्य विभागाच्या काही प्रशासकीय अधिका-यांची ‘टक्केवारी’ फिक्स आहे?असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
राष्ट्र निर्माण संघटनेने यासाेबतच शहरातील सर्व खासगी कोविड केंद्रांवर सीसीटीव्ही लावण्याची मागणी केली आहे मात्र याबाबतीत ही मनपा प्रशासनाचे व पदाधिका-यांचे ‘मौन’ हे सारगर्भित असल्याचे नागोलकर यांनी सांगितले.
पब्लिक सर्व्हेंट असून पब्लिकलाच न भेटणारे असे मनपा आयुक्त करोनाच्या काळात नागपूरकरांना लाभले यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानित साऊथचे हे ‘पार्सल‘ठाकरे यांनी त्वरीत साऊथमध्येच पाठवावे व महाराष्ट्रात ज्या नागपूर शहरात व नागपूर जिल्हयात करोनाचा संसर्ग व मृत्यूची संख्या ही सर्वाधिक आहे अश्या शहरासाठी तुकाराम मुंढेंसारखा कर्तव्यदक्ष् व कार्यक्ष्म व प्रसंगी रस्त्यावर उतरणारा आयुक्त पाठवावा,अशी मागणी नागोलकर यांनी केली.
सध्या सोशल मिडीयावर आयुक्त राधाकृषण्न बी. व महापौर दयाशंकर तिवारी यांना धारेवर धरणारे पोस्ट चांगलेच व्हायरल होत आहेत.




आमचे चॅनल subscribe करा
