फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजकरोनाचे आणखी ८ रुग्ण; राज्यातील संख्या शंभराच्या उंबरठ्यावर

करोनाचे आणखी ८ रुग्ण; राज्यातील संख्या शंभराच्या उंबरठ्यावर

Advertisements

मुंबई: महाराष्ट्रात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढतच चालली असून करोनाचे आणखी ८ रुग्ण आढळले आहेत. राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या आता ९७वर पोहचली आहे. राज्यात आतापर्यंत दोन जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे.

सांगलीतील इस्लामपुरात करोनाचे चार रुग्ण आढळले आहेत. करोनाग्रस्तांमध्ये दोन महिला आणि दोन पुरूष आहेत. हे चौघेही नुकतेच हज यात्रेवरून परत आले होते. हज यात्रेवरून आल्यानंतर त्यांचे स्वॅब नमुने घेतले होते. चाचणी अहवालात या चौघांनाही करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यांच्यावर आता मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सातारा येथील विलगीकरण कक्षात रविवारी दाखल केलेल्या खंडाळा येथील एका ४५ वर्षीय महिलेला करोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. खोकला असल्यामुळे रविवारी रात्री उशिरा संशयित म्हणून सरकारी रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले होते. या महिलेच्या घशातील द्रवाचा (स्वॅब) रिपोर्ट पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविण्यात आला होता. एनआयव्हीकडून रिपोर्ट प्राप्त झाला असून, ही महिला कोविड-१९ बाधित असल्याचे कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

पेरू येथून कल्याण डोंबिवलीत परतलेल्या एका ३५ वर्षीय व्यक्तीला करोना झाला आहे. मुंबईतही एका रुग्णाची भर पडली आहे. ही ३८ वर्षीय व्यक्ती अबुधाबी येथून परतली होती. ठाण्यात एका ३३ वर्षीय व्यक्तीला करोना झाल्याचे तपासणी अहवालातून स्पष्ट झाले आहे.

राज्यातील जिल्हा आणि पालिका हद्द निहाय रुग्णांचा तपशील

पिंपरी चिंचवड- १२
पुणे- १६
मुंबई- ३६
नवी मुंबई- ५
सांगली, नागपूर, यवतमाळ, कल्याण- प्रत्येकी ४
ठाणे- ३
अहमदनगर- २
सातारा, कल्याण-डोंबिवली, पनवेल, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, वसई-विरार- प्रत्येकी १
करोनाचे एकूण रुग्ण- ९७
एकूण मृत्यू- २

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या