

जुन्या काळात पुन्हा श्रोत्यांना नेण्याचा संकल्प
ऑस्कर सांस्कृतिक संगीत महोत्सवाचा शुभारंभ
नागपूर,ता. ३१ जुलै: शहरातील ज्येष्ठ कलावंत हे घरी बसून आहेत आणि हौशी कलावंतांमुळे त्यांना आता स्टेज मिळणे कठीण जात आहे.हे कलावंत अत्यंत स्वाभिमानी व ज्येष्ठ असल्याने त्या सर्व कलावंतांना एकत्रित मंचावर आणण्याचा प्रयत्न ‘ऑस्कर सांस्कृतिक संगीत कलावंत अकादमी’ करणार आहे, हा आमचा एक उद्देश्य आहे यासोबतच सध्या शहरात हौशी कलावंतांचा सुकाळ आला आहे.हे हौशी कलावंत कराओकेवर गाणी सादर करीत असतात,अनेकांनी आपापले स्टूडियो थाटले आहेत त्यामुळे अनेक वाद्यवृंद कलावंतांना काम मिळणे बंद झाले असून त्यांची उपासमार होत आहे. त्यामुळे कराओके नाही तर लाईव्ह संगीतच सुमधुर व कर्णमधुर असल्याची जाणीव पुन्हा एकदा मायबाप श्रोत्यांना करुन देण्याचा संकल्प असून पुन्हा एकदा स्टेज,ऑकेस्ट्रा आणि कलावंत यांच्या सादरीकरणाच्या राेमांचकारी जुन्या काळात श्रोत्यांना घेऊन जाण्याचा संकल्प असल्याचे ऑस्कर सांस्कृतिक संगीत कलावंत अकादमीचे अध्यक्ष् पी. कुमार यांनी प्रसार-प्रचार माध्यमांना सांगितले.
हाैशी कलावंतांनीसुद्धा किमान तीन वाद्यवृंद कलावंतांना घेऊन कार्यक्रम केला तर अनेक वाद्यवृंद कलावंतांना मोलाची मदत होईल,अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली.याच उद्देशाने ऑस्करच्या प्रथम वर्धापन सोहळ्याच्या निमित्ताने आम्ही येत्या ३ महिन्यात तीन अतिशय दर्जेदार कार्यक्रमाची आखणी केली असून पहीला कार्यक्रम हा रफी साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त म्हणजे आज ३१ जुलै रोजी अमृत भवन येथे सादर झाला. यात एकेकाळी विविध ऑकेस्ट्रा ग्रूप्समध्ये गायनाच्या क्षेत्रात गाजलेल्या अनेक कलावंतांना तसेच काही अतिथी कलावंतांना घेऊन ‘आसमां से आया फरिश्ता’हा बहारदार सुरेल कार्यक्रम सादर केला ज्याला प्रत्यक्ष् श्रोत्यांच्या उपस्थितीसोबतच फेसबूक तसेच इतर सोशल मिडीयाच्या प्लॅटफोर्मवर जबरदस्त प्रतिसाद मिळाला.
लवकरच आम्ही नागपूर शहरातील सर्व ज्येष्ठ गायक,वादक कलावंतांचे आर्शिवाद घेण्यासाठी संपूर्णपणे त्यांच्याच सादरीकरणाचा असणारा वर्धापन सोहळ्यानिमित्त दूसराही कार्यक्रम आपल्या रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येणार आहोत तर तिसरा कार्यक्रम संस्थेचा या सर्व ज्येष्ठ वादक व गायक कलावंतांची संगीत क्षेत्रात स्वत:च्या प्रतिभेच्या भरवश्यावर नाव कमावलेली तरुण पिढी जी समोर आली आहे त्यांच्या सादरीकरणाचा कार्यक्रमही सादर करणार आहोत.
या सर्व कार्यक्रमांमागील उद्देश हाच आहे की शहरच नव्हे तर विदर्भातील सर्व ज्येष्ठ तसेच तरुण ऑकेस्ट्रा कलावंतांनी संस्थेसोबत जुळावे तसेच कराओकेपेक्षा लाईव्ह इंस्ट्रमेन्ट्ससोबत जो संगीतमय कार्यक्रम सादर होतो तो श्रोत्यांच्या कसा जास्त काळजाजवळचा असतो हे आम्हाला पुन्हा मायबाप श्रोत्यांना पटवून सांगायचे आहे.
येत्या १२ नोव्हेंबर रोजी ऑस्कर सांस्कृतिक संगीत कलावंत अकादमीला एक वर्ष पूर्ण होत आहे,प्रथम वर्धापन दिनानिमित्त आज पासून तब्बल तीन महिने चालणा-या या महोत्सवाची सुरुवात “आसमान से आया फरिश्ता” या कार्यक्रमाने झाली.

स्व.मोहम्मद रफींना दिली आदरांजली-
शहरातील सुप्रसिद्ध संगीत संयोजक पंकज सिंह यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या कार्यक्रमात सर्व प्रथम मुनाफ भाई यांनी ‘याद ना जाये बिते दिनों की ‘ या गीताने कार्यक्रमाचा सुरेल प्रारंभ केला .
शहरातील नामवंत गायक मोहम्मद हाफिज यांनी” पत्थर के सनम “जुन्या स्मृतीला उजाळा दिला.एकाहुन एक अशी सरस गीते या कार्यक्रमात रसिकांच्या पसंतीस उतरली, या मध्ये प्रामुख्याने नंदिनी घटाटे , सुनिल वाघमारे,डाॅ. अनिल हिरेखन , डॉ.प्रदिप राजदेकर ,रयीस बेग, पंकज सिंह , डॉ.अर्चना देशमुख यांनी श्रोत्यांन खिळवून ठेवले.
की-बोर्ड वादक पंकज सिंह आणि अब्दुल जहीर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली शहरातील सुप्रसिद्ध वादक दिपक कांबळे, राजेश धामणकर, राजू ठाकूर, सुधिर आमले यांनी आपल्या सुरेल साथीने कार्यक्रमाची रंगत वाढवली . ध्वनी व प्रकाश व्यवस्था बंडू पदम यांची होती .
मंच संचालन शहरातील सुप्रसिद्ध कवी डॉ.महेश तिवारी यांनी केले तर ऑस्करच्या उपक्रमांची माहिती प्रमोद देशमुख यांनी दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजू व्यास, प्रमोद देशमुख तसेच ऑस्करचे अध्यक्ष पी.कुमार, उपाध्यक्ष प्रशांत खडसे, कोषाध्यक्ष संदीप मेश्राम, सचिव रिनेश जाणे, सहसचिव शेखर शामकुवर, राजेश गजभिये, संगीता गावंडे यांनी अथक परिश्रम घेतले.
अमृत भवन येथे तब्बल तीन तास चाललेल्या या कार्यक्रमात शहरातील गणमान्य कलावंत विजय किर्तने, अहिंसा तिरपुडे, पंं . रामनारायण मिश्र , बाटा पतंग चे आसिफ भाई, हे प्रामुख्याने उपस्थित होते.




आमचे चॅनल subscribe करा
