फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजऐतिहासिक घटना आणि परस्परसंवादाचा शोध: मेहदी जहान

ऐतिहासिक घटना आणि परस्परसंवादाचा शोध: मेहदी जहान

Advertisements

मेराकी परफॉर्मिंग आर्टस् ऑर्गनायझेशनचा उपक्रम

नागपूर,ता.२७ जून २०२२: जीवन जगताना आपल्याला या गोष्टीचा अनुभव नक्की येईल की कोणती वस्तू किंवा व्यक्ती जेव्हा अस्तित्वात असते तेव्हा बहुतांशी वेळा ती दुर्लक्षित असते आणि जेव्हा ‘ती’ या जगातून निघून जाते तेव्हा मात्र तिची आठवण वारंवार येऊन तिचे महत्त्व अधिकच वाढत जाते .

एक कथाकार जेव्हा कथा लिहितो आणि कथा सांगणारा जेव्हा ती इतरांपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून पोचवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती कथा ऐकण्यासाठी, बघण्यासाठी समाजाची गरज भासत असते या गोष्टींचा प्रत्यय आज दोन्ही लघु चित्रपटांच्या प्रदर्शनानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक मेहदी जहान यांच्याशी चर्चेदरम्यान सर्व रसिकांना आला .

कथाकथनाबद्दल आणि पात्रे त्यांच्या कथाकथनाशी संबंध कसा असतो? हे चित्रपटात कसे दाखवले गेले? यावर चर्चा करण्यात आली. कथा सांगण्यासाठी समाजाची गरज; कोणी सांगावे तर कोणी ऐकावे. दोन्ही चित्रपटांच्या घटनांपेक्षा जास्त; मेहदी जहान यांच्याशी झालेल्या संवादात कल्पना आणि विचार प्रक्रियेवर चर्चा झाली.

औचित्य होते रविवार,दिनांक २६ जून २०२२ रोजी ‘ही यूज्ड टू ब्रिन्ग मी एप्पल‘ व ‘ ज्योती अँड ज्योमोती‘ या दोन शॉर्ट फिल्म्सच्या स्क्रिनिंगचे . संध्याकाळी ७ वाजता विदर्भ राष्ट्रभाषा प्रचार समिती, रामदासपेठ येथे दोन आसामी लघुपटाचे प्रदर्शन करण्यात आले . दोन्ही चित्रपट पात्रांच्या वैयक्तिक आठवणी आणि आसामच्या दुर्गम भागातील ऐतिहासिक घटनांमधील परस्परसंवादाचा शोध आहे.

दोन्ही शॉर्ट फिल्म्सचे दिग्दर्शन मेहदी जहान यांचं असून स्क्रिनिंग नंतर दर्शकांच्या प्रश्न उत्तरांसाठी, दृक श्राव्य माध्यमावर चर्चा सत्र देखिल आयोजित करण्यात आले होते.

सदर कार्यक्रम हा मेराकी परफॉर्मिंग आर्टस् ऑर्गनायझेशन,नागपूर यांनी आयोजित केला होता . मेराकी थिएटर प्रत्येक रविवारी ज्या सहजासहजी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर किंवा प्रत्यक्ष मोठया फिल्म फेस्टिव्हल मध्ये जाऊन बघणं शक्य होत नाही अश्या डॉक्यूमेंटरी,शॉर्ट फिल्म्स चं स्क्रिनिंग आयोजित करत असते.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या