फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजएलजीबीटी समुदायासाठी आता सरकारनेच पुढाकार घ्यावा:आनंद चांदरानी

एलजीबीटी समुदायासाठी आता सरकारनेच पुढाकार घ्यावा:आनंद चांदरानी

Advertisements


आर्थिक हलाकीची स्थिती: सुप्रिया सुळे यांच्याकडून विशेष अपेक्ष्ा

नागपूर,ता.१९ डिसेंबर: लाॅकडाऊनच्या काळात किन्नर,एलजीबीटी तसेच इतर तत्सम समुदायाला भयंकर आर्थिक हलाकीच्या परिस्थितीला सामाेरे जावे लागले.कोविड-१९ च्या काळात या समुदायाची काय परिस्थती होती?कसा व कोणता त्रास झाला?कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले?काय चूकलं?काय चागंलं झालं?इ.बाबींचा उहापोह करण्यासाठी नुकतेच हमसफर तसेच सारथी ट्रस्टतर्फे सदरमधील हॉटेल एलबी येथे एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी समाजातील अनेक हितधारक व भागधारक सामाजिक प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.या संपूर्ण चर्चासत्रातून एकच सूर उमटला तो म्हणजे ‘आता मायबाप सरकारनेच पुढाकार घेऊन या समुदायासाठी आर्थिक तजवीज करावी’असे सारथीचे अध्यक्ष् आनंद चांदरानी यांनी खास ‘सत्ताधीश‘कडे मत व्यक्त केले.

लॉक डाऊनच्या सहा महिन्यांच्या प्रदीर्घ काळात समाजातील दानशूरांची खूप मदत झाली मात्र आता त्यांची दानत देखील आता संपली आहे. त्यांच्या दारशूरतेतूनच हे दोन्ही समुदाय आतापर्यंत जगण्यासाठी तग धरु शकलेत मात्र आता या दोन्ही समुदायांची परिस्थीती ही लॉक डाऊनपेक्ष्ा ही अधिक कठीण झाली असल्याचे ते म्हणाले.आता पुढे काय?या प्रश्‍नाचा उहापोह करण्यासाठी या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले मात्र एकूण मते विचारात घेता आता या पुढे मायबाप सरकारनेच या दोन्ही समुदायांच्या सदस्यांना आत्मसन्मानाने जगण्यासाठी विशेष आर्थिक मदत करावी,अशी अपेक्ष्ा व्यक्त करण्यात आली.

खाजगी मदतीचे स्त्रोत आटले परिणामी आता एकमेव आशा ही मायबाप सरकारवरच टिकून असल्याचे त्यांनी सांगितले.यासंबधी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांना देखील निवेदन दिल्याचे त्यांनी सांगितले.निवेदनात आर्थिक मदतीसोबतच किन्नर तसेच एलजीबीटी या दोन्ही समुदायांसाठी सरकारी रुग्णालयांमध्ये वेगळ्या प्रसाधन गृहाची मागणी करण्यात आली आहे.

आम्ही सरकारला पैसा खर्च करण्यास सांगत नाही ,आमची एवढीच मागणी आहे की आहे त्या रुग्णालयात आमच्यासाठी फक्त वेगळ्या प्रसाधन गृहाची व्यवस्था करण्यात यावी.आमच्या समुदायांसाठी सरकारी रुग्णालयातील प्रसाधन गृह हे राखीव ठेवण्यात यावे आणि ही आमची नैसर्गिक मागणी आहे.सरकारकडे फंड नाही हे आम्ही समजू शकतो मात्र निसर्गानेच आमची निर्मिती अश्‍या स्वरुपाची केल्याने स्त्री व पुरुष यांच्याचप्रमाणे आम्हाला देखील न्याय सोयीसुविधांचा हक्क असल्याचे चांदरानी यांनी सांगितले.

आम्ही खासगी रुग्णालयात उपचार घेण्यास सर्वथा अक्ष् म आहोत.खासगीत उपचारासाठी तीन ते पाच लाख रुपये आमच्याकडे नाहीत.मुंबईत सायन रुग्णालयात तसेच पांढेचरीमध्ये सरकारी रुग्णालयात किन्नर तसेच एलजीबीटी या दोन्ही समुदायांसाठी वेगळय्ा प्रसाधन गृहाची व्यवस्था आहे मग महाराष्ट्रातील इतर शहरात अशी व्यवस्था का होऊ शकत नाही?असा सवाल त्यांनी उपस्थित केला.यासाठी फक्त प्रखर राजकीय ईच्छाशक्तीची गरज असल्याचे ते म्हणाले.

खासदार सुप्रिया सुळेंकडून विशेष अपेक्ष्ा!
याप्रसंगी बोलताना चांदरानी यांनी राष्ट्रावादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून विशेष अपेक्ष्ा असल्याचे मत व्यक्त केले.एक तर त्या स्वत: स्त्री आहेत,संवेदनशील मनाच्या आहेत.मुंबईत सुप्रिया सुळे यांनीच एलजीबीटी समुदायासाठी स्वतंत्र सेल सुरु केले.त्यामुळे त्यांना आमच्या समुदायाच्या सदस्यांच्या समस्या चांगल्याने अवगत आहेत परिणामी त्यांच्याकडून आम्हाला मदतीची आशा आहे,असे त्यांनी सांगितले.आमची घूसमट,मानसिक त्रास,आर्थिक अडचणी इ.बाबत आपला सुशिक्ष्ि त समाज अद्यापही पुरेसा जागृत नसल्याची खंत चांदरानी यांनी यावेळी व्यक्त केली.

महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी राष्ट्रवादी पक्ष्ातर्फे किन्नर संघटनेच्या विद्या कांबळे यांचा सत्कार करण्यात आला होता. परिणामी या सरकारकडूनच आम्हाला खूप आशा असल्याचे त्यांनी सांगितले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे यांना सारथी संस्थेतर्फे पत्र ही देण्यात येत आहे.आमची संपूर्ण आणि शेवटची आशा ही फक्त आता मायबाप सरकारच असल्याचे ते म्हणाले.

आर्थिक कारणांमुळे अनेक किन्नरांनी केला आत्महत्येचा प्रयत्न-विद्या कांबळे
लाॅकडाऊनच्या काळात किन्नरांची परिस्थिती अतिशय दयनीय झाली होती,त्यांना दोन घास खायलाही मिळत नव्हते.परिणामी अनेकांनी आत्महत्येचाही प्रयत्न ही केल्याचे धक्कादायक व तेवढेच धगधगते वास्तव किन्नर संघटनेच्या विद्या कांबळे यांनी चर्चासत्रात मांडले.या दिवसांमध्ये आमच्या मदतीसाठी जे कोणते घटक पुढे आले त्यांचे ऋण आम्ही कधीही विसरु शकत नाही,अश्‍या शब्दात विद्या कांबळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

लॉक डाऊनच्या काळात आमच्या उत्पन्नाचे सर्व स्त्रोत बंद झाल्याने उपासमारीची वेळ आली होती. यावेळी प्रसारमाध्यमांद्वारे लोकांपर्यंत आमच्या व्यथा पोहोचल्यात व संवेदनशील मनाच्या समाजाने पुढे येऊन सढळ हाताने आम्हाला मदत केली व आम्हाला जगवले.अजूनही समाजात किन्नरांना स्वीकारण्यात आले नाही.मुलांना लहानपणापासून किन्नरांची भीती दाखवली जाते.त्यामुळे किन्नर दिसला तरी लहान मुले दूर पळतात. समाज स्वीकारत नसल्यानेच किन्नर हे समाजासाेबत चिडचिडे होऊन वागतात,हे खरे आहे.मात्र त्यांना माणूस म्हणून समाजाने स्वीकारले तर ते ही सामान्य वागतील,असे कांबळे म्हणाल्या.

प्रारंभी सारथी ट्रस्टचे मुख्य कार्यकारी व्यवस्थापक निकुंज जोशी यांनी प्रास्ताविक केले.सारथी ट्रस्ट करीत असलेल्या विविध कार्यांची त्यांनी माहिती दिली.संपूर्ण एलजीबीटी समुदायासाठी सारथीने आजपर्यंत काय केले याबाबत सविस्तर माहिती प्रदान केली. त्याचप्रमाणे लेस्बियन,गे,किन्नर असणे नेमके काय?याविषयी त्यांनी शास्त्रशुद्ध माहिती प्रदान केली.याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या नूतन रेवतकर आदी उपस्थित होते.

‘ती’झाली भावेश….
लिंग परिवर्तन करुन डॉ.भावेश जैन यांचे कश्‍याप्रमाणे मुलीचे परिवर्तन मूलामध्ये झाले,याची विस्तृत माहीती या वेळी त्यांनी सांगितली.लहानपणी आपण एक मुलगी होतो मात्र आपण चुकीच्या शरीरात आहाेत,असे नेहमी वाटायचे.पुढे आपण शस्त्रक्रिया करुन घेतली व आज एक पुरुष म्हणूनच समाजात वावरत असल्याचे त्यांनी सांगितले. अशाच प्रकारे स्त्री होण्याचा अनुभव आंचल वर्मा यांनी कथन केला.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या