फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजएपस्टिन फाईल्स....

एपस्टिन फाईल्स….

Advertisements

नागपूर,ता.१८ डिसेंबर २०२५: देशात कुठेही कोणत्याही भाषेच्या कोणत्याही राज्यात कोणत्याही वृत्तवाहीन्यांवर जगभरात गाजत असलेल्या ‘एपस्टिन फाईल्स’विषयी एक अवाक्षरही माहिती सांगितली जात नसून, वृत्त वाहीन्यांच्या प्रेक्षकांना त्यामुळे या जगभर गाजणा-या व भारतासाठी सर्वोच्च महत्वपूर्ण ठरलेल्या घडामोडीविषयी अत्यल्पही ज्ञान नसल्याचे वास्तव समोर आले आहे. मात्र,डिजिटल माध्यमांवर त्यातही सर्वाधिक युट्यूबच्या विविध पॉडकॉस्टमध्ये या अत्यधिक महत्वाच्या घडामोडीवर देशातील बुद्धिवंत व माजी वरिष्ठ पत्रकारांकडून सखोल चर्चा घडत असलेली दिसून पडत आहे.
वृत्त वाहिन्या तसेच देशभरातील वृत्तपत्रे यांना केंद्र व राज्य सरकारकडून मिळत असलेल्या कोट्यावधींच्या जाहीरातींमुळे, या अतिशय महत्वपूर्ण घडामोडीकडे सपशेल डोळेझाक करण्यात आली असली तरी ‘‘सूर्याला हाताने कितीही झाकले तरी त्याचे प्रखर तेज झाकोळता येत ‘नाही तसेच भारतीयांपासून केंद्रीयस्तरावर ‘सत्य’लपविण्याचा कितीही प्रयत्न होत असला तरी असे घडू शकले नाही.आजच्या डिजिटल युगात क्षणार्धात माहितीचे व घडामोडींचे आदानप्रदान जगाच्या एका टोकापासून तर दुस-या टोकापर्यंत सहज सुलभ उपलब्ध आहे.परिणामी,ज्या वृत्तपत्रांची लीड ‘एपस्टिन फाईल्स’ असायला हवी होती त्या वृत्तपत्रांमध्ये आतल्या पानांमध्ये सिंगल कॉलममध्ये देशावर गंभीर परिणाम करु शकणा-या एवढ्या महत्वाच्या घडामोडीवर वृत्त देऊन लोकशाहीची इतिश्री मानण्यात आलेली दिसून पडतेय.
‘एपस्टिन फाईल्स’ही आजच्या जगातील एक महत्वपूर्ण घडामोड आहे ज्यावर जगभर चर्चा घडत आहे व भारतीयांसाठी ही घडामोड यासाठी महत्वपूर्ण आहे कारण यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदिपसिंह पुरी तसेच क्रिकेटचा देव व माजी खासदार सचिन तेंदूलकरचे नाव समोर आले आहे!

अमेरिकेतील दिवंगत कोट्याधीश व वित्त व्यवस्थापक जेफरी एपस्टिन याच्यावर २००८ साला पासून १२ ते १४ वर्ष वयाची लहान बालके(मुले व मुली)यांच्या लैंगिक शोषणात, जगभरातील महत्वपूर्ण राजकीत नेते,मंत्री,खेळाडू,उद्योजक, यात बिल गेट्स पासून तर माजी अमेरिकन राष्ट्रपती बिल क्लिंटन यांच्यासह विद्यमान अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इत्यादी यांचे नाव समाविष्ट आहे,या सर्वांनी एपस्टिनच्या खासगी बेटावर या बालकांचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप ठेवण्यात आला.यातील काही पिडीतांनी अमेरिकेच्या न्यायालयात धाडसाने समोर येऊन न्याय मागितला आणि एकच खळबळ उडाली.जगभरात होतं तसं अमेरिकेत देखील सुरवातीच्या काळात हे प्रकरण दाबण्याचा सर्वोच्च राजकीयस्तरावर प्रयत्न झाले मात्र,अमेरिकेचे विरोधक व जनतेच्या प्रक्षोभा पुढे शक्तीशाली डोनाल्ड ट्रम्प यांना देखील माघार घ्यावी लागली.

जेफरी एपस्टिन याची चौकशी होऊन त्याला तुरुंगवास देखील घडला मात्र,तुरुंगातच त्याचा संशयास्पद मृत्यू झाला.महत्वाचे म्हणजे तुरुंगात गेल्यावर अवघ्या १७ दिवसातच नेमके ज्यावेळी ही घटना घडली त्याच वेळी तुरुंगातील सीसीटीव्ही कॅमरे हे खराब झाले,सुरक्षा रक्षकांचा डोळा लागला तर एपस्टिनसोबतचे कैदी यांना इतर सेलमध्ये स्थानांतरित करण्यात आले होते….!

याच एपस्टिन याच्याशी संबंधित २०१९ मधील यौन शोषण प्रकरणाच्या चौकशीचा गोपनीय अहवाल ट्रम्प सरकारकडून उद्या १९ डिसेंबर रोजी खुला करण्याची शक्यता आहे.पंतप्रधान मोदी यांच्यासह जगभरातील धनदांडग्यांचे १९ हजार छायाचित्रे यात समाविष्ट असल्याचा दावा केला जात आहे.अमेरिकेचे जिल्हा न्यायाधीश रिचर्ड बर्मन यांनी हा निकाल दिला असून विशेष म्हणजे,बर्मन यांनी यापूर्वी याविरोधी निकाल दिला होता.ट्रम्प प्रशासनाने केलेल्या एका नव्या कायद्यामुळे एपस्टिन तसेच,त्याची विश्‍वासू सहकारी घिस्लेन मॅक्सवेल हिच्याशी संबधित गोपनीय अहवाल खुला करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची मखलाशी न्यायाधीश बर्मन यांनी नंतर केली.
अमेरिकन संसदेने ’द एपस्टिन फाइल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट’.हा नवा कायदा गेल्या महिन्यात मंजूर केला होता.त्यानंतर ट्रम्प यांनी त्यावर स्वाक्षरी केली होती.या घडामोडीनंतर ट्रम्प प्रशासनाच्या न्याय विभागाने न्यायालयांना या विषयी विनंती केली होती.या पार्श्वभूमीवर,मॅनहॅटन येथील एका संघीय न्यायालयाच्या न्यायाधीशांनी हा अहवाल खुला करण्याचे निर्देश ११ डिसेंबर रोजी दिले होते.त्यापूर्वी फ्लोरिडा येथील एका न्यायालयानेही गेल्या आठवड्यात याच स्वरुपाचा निकाल दिला होता.या नव्या कायद्यानुसार एपस्टिन चौकशी अहवाल १९ डिसेंबरपर्यंत खुला करणे आवश्‍यक आहे.
आमची सत्ता आल्यास हा अहवाल खुला केला जाईल,असे आश्‍वासन ट्रम्प यांनी अध्यक्षपदाच्या निवडणूकीदरम्यान दिले होते.त्यामुळे त्यांच्यावर याबाबत डेमोक्रॅटिक पक्षाच्या लोकप्रतिनिधींकडून मोठ्या प्रमाणात दबाव होता.ट्रम्प यांनी या अहवालातील काही अंश आतापर्यंत जाहीर केले आहे.,परंतू त्यात फार ठोस माहिती नसून अहवालाचा हा भाग यापूर्वीच जाहीर करण्यात आला होता,असा आक्षेप ट्रम्प प्रशासनाच्या या कृतीवर विरोधकांनी घेतला आहे.
कोट्याधीश एपस्टिन याचे मोठे राजकीय नेते,अब्जाधीश,सेलिब्रेटी,शिक्षण,क्रीडा क्षेत्रातील उच्चपदस्थ आदी उच्चभ्रू मंडळींशी घनिष्ट संबंध होते.यौन तस्करी प्रकरणी त्याला २०१९ मध्ये अटक करण्यात आली होती.यानंतर अवघ्या १७ दिवसांतच तुरुंगात त्याचा संशयास्पद मृत्यू झाला.त्याची सहकारी मॅक्सवेल हिला एका ज्युरींनी २०२१ मध्ये यौन तस्करीच्या आरोपाखाली दोषी ठरवले होते.अल्पवयीन मुलींचा पुरवठा करण्यात तिने एपस्टिनची मदत केली होती,असा ठपका तिच्यावर ठेवण्यात आला असून ती सध्या वीस वर्षांचा तुरुंगवास अमेरिकेत भोगत आहे.
भारतात या प्रकरणाची चर्चा सुरु झाली ती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघात पत्रकारांशी वार्तालाप करताना केलेल्या खळबळजनक विधानामुळे.अमेरिकेतील कुख्यात उद्योगपती जेफरी एपस्टिन प्रकरणाशी संबधित गोपनीय कागदपत्रांमुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हतबल झाले असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.त्यामुळेच ट्रम्प यांनी जाहीर केलेली युद्धबंदी मान्य करीत मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर‘थांबवले,असा आरोप त्यांनी केला.एपस्टिीन प्रकरणाशी संबंधित गोपनीय कागदपत्रांमध्ये भारतातील दोन विद्यमान आणि एका माजी खासदाराचा समावेश असून १९ डिसेंबर रोजी ही माहिती उघड झाल्यावर देशात फार मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याचा दावा त्यांनी केला.त्यासोबतच मराठी माणूसच मोदी नंतर देशाचा पंतप्रधान होणार असल्याचा पुनरुच्चाही केला.याचा अर्थ अशी परिस्थिती उद् भवली तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संघाच्या जवळचे असल्याने त्यांना दिल्लीत पाठवले जाईल असा कयास लावला जात आहे.
ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी ७ मे रोजी भारत-पाकिस्तानमध्ये हवाई युद्ध झाले.त्यामध्ये आपला सपशेल पराभव झाला.हवाई शक्ती धुळीस मिळाली,ट्रम्प यांनी जाहीर केलेली युद्धबंदी भारताने का मान्य केली?अमेरिकेपुढे मोदी इतके हतबल का झाले?परराष्ट्र धोरणात अमेरिकेचा प्रचंड हस्तक्षेप कसा मान्य करण्यात आला?सर्वात महत्वाचे म्हणजे ट्रम्प यांच्या आरोपांवर मोदी यांनी कधीही देशासमोर खुलासा केला नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
‘मोदी ऑन बोर्ड…’हा एपस्टिनच्या घृणास्पद लेखाजोख्यातील एक ईमेल सुब्रम्हण्यम स्वामी यांनी ट्टीट केला होता मात्र,प्रचंड दबावा नंतर त्यांनी तो डिलिट केला. मात्र,याचा परिणाम जो व्हायला  हवा होता तो होऊन गेला होता.केंद्रीय मंत्री हरिदिपसिंग पुरी यांनी एपस्टिनच्या या बेटावर तब्बल पाच वेळा भेट दिली होती.एपस्टिनच्या ईमेलमध्ये तारखेवारसह अचूक वेळ देखील टिपण्यात आली आहे.एपस्टिन हा इस्त्राईलचा मोहरा मानला जातो.इस्त्राईलची सैनिक संघटना मोसादसाठी एपस्टिन हा खूप महत्वाचा मोहरा होता.अमेरिका व इस्त्राईलचे संबंध जगजाहीर आहे,अश्‍यात देशभरातून अब्जाधीशांना व मोठ्या राजकीय धेंड्यांना एपस्टिन आपल्या आलिशान खासगी बेटावर अय्याशीचा अड्डा उपलब्ध करुन देत असे.या कृतीतून त्याच्याकडे अनेकांचे छायाचित्रे जमा झाले होते.अमेरिकेच्या न्यायालयात ट्रम्पच्या प्रशासनाने सादर केलेल्या अहवालानुसार अशी १९ हजार छायाचित्रे हस्तगत करण्यात आली आहे.
चीनला वठणीवर आणण्यासाठी मोदी इस्त्राईलसाठी खूप महत्वाचे असल्यानेच हरदिपसिंग पुरीच्या माध्यमातून मोदी यांची एपस्टिनसोबत भेट झाली असावी.असा कयास लावला जात आहे.मोदी भेटणार असल्यानेच ‘मोदी ऑन बोर्ड’सारखा ईमेल एपस्टिनच्या लेखाजोख्यात सापडून येतो जो भारतासारख्या नैतिकतेच्या मूल्यावर टिकलेल्या देशात भूकंप घडवून आणण्याची क्षमता ठेवतो.भारतीय हे शंभर भ्रष्टाचारची प्रकरणे माफ करण्याची मानसिकता ठेवतात मात्र,१२ ते १४ वर्षांच्या लहानग्यांचे आपल्या अय्याशीसाठी लैंगिक शोषण कदापि सहन करु शकणार नाहीत,त्यामुळेच पृथ्वीराज चव्हाण यांनी १९ डिसेंबर नंतर  मोदी यांच्या गच्छंतीची शक्यता वर्तवली आहे.
सध्या सोशल मिडीयावर ‘एपस्टिन’सर्च केल्यावर लाखो युट्युब व्हिडीयोज  दिसून पडत असून,या घटनेने जगासह भारताला देखील हादरवून सोडले आहे.सर्वात धोक्याचे आहे ते म्हणजे शक्तीशाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘मौन’.जगातील सर्वात शक्तीशाली राष्ट्राचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव देखील एपस्टिनच्या फाईल्समध्ये असल्यावरही त्यांनी देशातील जनतेसमोर व न्यायालयासमोर ‘सत्य’मांडण्याची कबुली दिली आहे.भारताच्या पंतप्रधानांवर जगभरातून एवढे गंभीर आरोप होत असल्याने व संशयाचे दाट धुके दाटले असल्याने देशातील जनतेसमोर मोदी यांनी सत्य काय आहे ते सांगण्याचे नैतिक धाडस दाखवावे,अशी मागणी समाज माध्यमांवर केली जात आहे.
………………………………………
तळटीप-
एपस्टिन फाईल्सच्या चर्चेतून पंतप्रधान मोदी यांच्यावर संशयाचे वावटळ उठले असताना ,मोदींच्या गुजरातच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातील भूतकाळ देखील सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात झळकला. एका वास्तूविशारद तरुणीला मोदी यांनी स्वत:च्या मुख्यमंत्री निवासात हायपाय साखळदंडाने बांधून बंधक बनवून ठेवल्याचा आरोप गुजरातचे आयएएस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी १२ वर्षांपूर्वी प्रचार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत केला होता. प्रदीप शर्मा गुजरातच्या स्नूप कांडचे प्रमुख आरोपी आहेत,हे विशेष.२००४ साली शर्मा यांनीच त्या तरुणीला मोदी यांच्यासोबत एका बगिच्याच्या प्रकल्पासंदर्भात भेटून दिले होते मात्र,मोदी यांचा जीव त्या तरुणीवर जडला,ते तिला कविता,शेरो शायरी पाठवू लागले.तरुणीने ते मेल शर्मा यांना देखील दाखवले व ती व तिचे कुटूंबिय प्रचंड दबावात असल्याचे सांगितले.मानसी सोनी असे त्या तरुणीचे नाव असून,ती सध्या कुठे आहे?या विषयी कोणीही ठोसपणे सांगू शकत नाही.सुब्रमण्यन स्वामी यांनीच या प्रकरणावर सर्वात आधी ट्टीट केले होते.
सोनी हिचे वय त्यावेळी फक्त २७ वर्ष होतं.मोदी यांनी तिला ’आज का मौसम बडा गुलाबी है,ठंड बडी शराबी है’इत्यादी असे मेल पाठवले असल्याचे व्हिडीयोज प्रदीप शर्मा यांच्या युट्युबवर आज देखील झळकतात.२०१४ नंतर मानसी सोनी विषयी एक ही माहिती पुढे येऊ शकली नाही.या प्रकरणात गृहमंत्री अमित शहा यांची एक ऑडियो क्लिप देखील चांगलीच व्हायरल झाली होती.यामध्ये शहा यांनी गुजरातच्या तपास यंत्रणांना त्या तरुणीचे सर्व फोन कॉल्स टॅप करण्याचे तसेच तिच्यावर कडक नजर ठेवण्याचे निर्देश दिले होते.ती कुठे जाते,कोणाकोणाशी भेटते,तिच्यावर नजर ठेवण्याची सूचना करण्यात आली होती.फक्त ती तरुणीच नव्हे तर तिचे आई-वडील यांच्यावर देखील पाळत ठेवण्यात आली होती.
प्रदीप शर्मा यांना मानसी सोनीला तब्येतीचा बहाणा करुन मुख्यमंत्री निवासातून निसटण्याचा सल्ला दिला.मात्र,मोदी यांना नंतर संशय आला की मानसी सोनीकडे असे काही तरी पुरावे आहे जे त्यांच्या विरुद्ध वापरले जाऊ शकतात.इंडिया टूडेने आपल्या मॅग्झीनच्या कव्हर पेजवर मोदी व मानसी यांचे छायाचित्र छापून शहा यांच्या डोळ्यांवर खोजी यंत्र असल्याचे छायाचित्र छापले होते.स्नूप गेट कांड हा त्याच जासुसी कांडाशी सबंधित होता ज्याला इंडिया टूडेने २०१३ साली आपल्या मासिकेत ठलकपणे प्रसिद्धी दिली.केंद्रातील काँग्रेसच्या सरकारने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले,यासाठी समिती देखील गठीत करण्यात आली मात्र,मे २०१४ मध्ये देशात मोदींची सरकार आली त्यावेळी मानसी सोनी व तिच्या कुटूंबियांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन अशी कोणतीही चौकशी न करण्याची विनंती केली जी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली.यानंतर मानसी सोनी व तिचे कुटुंबिय कुठे आहेत हे कोणालाही माहिती नाही.मानसी सोनी जरी माध्यमांसमोर आली नसली तरी सुब्रम्हण्यम स्वामी यांनी मुलाखतीमध्ये सांगितल्याप्रमाणे मानसी सोनी व तिचे कुटूंबिय अमेरिकेत लपून बसले असून ते अमेरिकेच्या बाहेर पडत नाही.या विषयावर फार कमी व्हिडीयोज युट्युबवर उपलब्ध आहेत.कोणीही या विषयावर व्हिडीयोज टाकत नाहीत फक्त सुब्रम्हण्यम स्वामींची मुलखात व प्रदीप शर्मांने केलेले गंभीर आरोप,इतकीच माहिती समाज माध्यमांवर उपलब्ध आहे.
…………………………
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या