


एनआयटी पुर्नजिवित करण्याचे राऊत यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
नागपूर,२३ जानेवरी २०२०: उर्जामंत्री व नागपूर शहराचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी नागपूर सुधार प्रन्यास(एनआयटी) ही बर्खास्त करण्यात येऊ नये,ती तशीच कायम ठेऊन शहराच्या विकासासाठी दूसरी एजंसी नियुक्त करावी असे पत्र १० जानेवरी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहले, आपल्या शहराच्या विकासाला अश्यारितीने अडथळे निर्माण करणे हे प्रकारचे पापच आहे,असा आरोप माजी महापौर व भाजप शहराध्यक्ष् प्रवीण दटके यांनी गुरुवार दि. २३ जानेवारी रोजी पत्र परिषदेत केला.
हॉटेल सेंटर पॉईंट येथे आयोजित पत्र परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी महापौर संदीप जोशी हे उपस्थित होते. पुढे बोलताना दटके हे म्हणाले की या पत्रात राऊत यांनी अनेक बाबींचा उल्लेख केला आहे. गुंठेवारीवर देखील आक्षेप नोंदवला आहे की मनपा हे करु शकत नाही. याच एनआयटीने अनेक ले-आऊट्सचा ‘सत्यानाश’ केला आहे. शहरातील नाले,रस्ते, मोक्याच्या जमीनीवर खाजगी बंगले बांधून मध्यम वर्गीय आणि सर्वसामान्य नागरिकांना संपवण्याचं काम आजपर्यंत एनआयटीने केले आहे.
एनआयटीच्या याच कारभारातून सूटका करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच शहरात दोन विकासाच्या स्वायत्त संस्था नकोत या उद्देशाने एनआयटी बर्खास्त करण्याचा धाडसी तसेच जनतेच्या हिताचा निर्णय घेतला मात्र नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री यांना पत्र लिहून एनआयटीला पुर्नजिवित करण्याबाबत पत्र लिहले आहे. या पत्राला आम्ही आयुक्तांमार्फत योग्य उत्तर देऊ असे ते म्हणाले.
महापौर संदीप जोशी यांनी राऊत यांच्या पत्राचा निषेध नोंदवत आजवर मनपाने एनआयटीला नगर संचालनयाच्या मार्फत फाईल्स मनपाला सुपुर्द करण्याबाबत हजारो पत्र लिहली मात्र पाच लाख फाईल्स पैकी एनआयटीने फक्त पाच हजारच्या जवळपास फाईल्स मनपाला सोपवल्या असल्याचे सांगितले.एनआयटी फाईल्स पाठवण्यास उत्सुक नाही याचा सरळ सरळ अर्थ काय निघतो?कर्मचारी यांचा प्रश्न ते उपस्थित करतात,मात्र आमची भूमिका स्पष्ट आहे ,एनआयटीचे कर्मचारी यांचे मनपात पुर्नवसन करु तर त्यांचा पगारही आम्ही देणार आहोत. काँग्रेस मागील अनेक वर्षांपासून एनआयटीच्या माध्यमातून भ्रष्टाचाराचाच कारभार करीत आली आहे,याच पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने एनआयटी बर्खास्त केली होती. त्या भ्रष्टाचाराच्या भस्मासूराला पुन्हा पुर्नजिवित करणे हे या शहरासाठी अत्यंत दूर्देवी आहे. एकीकडे आम्ही गुंठेवारीसाठी वेगळी केंद्रे उभारतोय, त्याला आणखी जास्त प्रभावी करण्याचा प्रयत्न करतोय ,दूसरीकडे मात्र पुन्हा एनआयटीला पुर्नजिवित करण्याची मागणी ही अत्यंत दूर्देवी असल्याचे महापौर यांनी सांगितले.आमच्या अध्यक्ष्ांनी देखील या निर्णयाचा निषेध केल्या असल्याची माहिती त्यांनी दिली.
दटके यांनी सांगितले की,मनपा सभेत १५६ नगरसेवकांसमोर जनतेच्या प्रश्नांसंबंधीच्या विषयांची चर्चा होते,एनआयटीतील फक्त पाच पदाधिकारीच जनतेसंबंधीचा निर्णय परस्पर घेतात.याच एनआयटीने शहरातील अनेक मोकळ्या जागा, एक हजार स्कवेर फूटच्या जागा सगळ्या देऊन टाकल्या.हेच करण्यासाठी पुन्हा एनअायटीला पुर्नजिवित काँग्रेसला करायचे आहे का?असा सवाल त्यांनी केला. एनआयटीच्या कार्यकाळात अनेक नाल्यांवर घरे बनलीत. नाल्यांचे नैसर्गिक स्त्रोत बंद करुन अनाधिकृत घरे निर्माण झाली. शहराचा चारही बाजूने अस्त-व्यस्त विस्तार झाला. खेळाच्या मैदानांवर खाजगी बंगले बनले. महापालिकेतील सर्वच पक्ष्ाच्या नगरसेवकांची हीच मागणी आहे एनआयटी ही बर्खास्त झालीच पाहीजे.
सगळ्या पक्षाची मते डावलून महाविकास आघाडी जर एनआयटीला पुर्नजिवित करण्याचे पाप करणार असेल तर त्या विरोधात भाजप तीव्र आंदोलन करेल असा ईशारा दटके यांनी दिला. अद्याप मुख्यमंत्र्यांनी याबाबत फक्त अहवाल मागवला आहे. मात्र शहराच्या पालकमंत्र्यांनीच अशी मागणी करणे हे अत्यंत दूर्देवी आहे. एनआयटीच्या कार्यकाळात ५१२, १९०० हे ले-आऊट्स कधीही मंजूर होऊ शकले नसते म्हणूनच एनआयटी बर्खास्त करावी लागली. एनआयटी पुन्हा पुर्नजिवित करणे म्हणजे या शहरातील सामान्य माणूस हा पुन्हा भरडला जाईल. एनआयटीत सामान्य नागरिकाची सुनवाई होतच नाही. आज सामान्य जनता त्यांचे प्रश्न घेऊन नगरसेवकांकडे जाते. त्यांच्याकडे आपली व्यथा मांडते. हे सरकार त्याच सामान्य माणसाला एनआयटीच्या पाच ट्रस्टीच्या स्वाधीन करायला निघाली आहे. हाच डाव जर सरकारचा असेल तर आम्ही रस्त्यावर उतरुन याचा विरोध करु.
मी या पत्राचा निषेध करतो आणि ही मागणी पालकमंत्र्यांनी मागे घ्यावी अशी त्यांना विनंती करतो. पालकमंत्र्यांच्या या पत्रावर विशेष कार्यकारी अधिकारी अशोक खांडेकर यांना सुस्पष्ट मत पाठवायचे आहे. आम्ही आयुक्तांना ही विनंती करतो त्यांनी सभागृहासमोर माहिती न ठेवता मत पाठवू नये.एनआयटीच्या अधीन फक्त भाजपचे मतदार येत नसून सर्वच पक्षाचे मतदार यात भरडले जाणार असल्याचा ईशारा दटके यांनी याप्रसंगी दिला.
(बातमीशी संबंधित व्हिडीयो Sattadheesh official you tube वर बघू शकता)




आमचे चॅनल subscribe करा
