फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजएका ‘खास’अधिका-यासाठी गडकरींची ‘जाहीरात!’

एका ‘खास’अधिका-यासाठी गडकरींची ‘जाहीरात!’

Advertisements

महानगरपालिकेच्या स्थापना विभागाची जाहीरात मनपात चर्चेत

नागपूर,ता. ९ फेब्रुवारी: महानगरपालिकेच्या स्थापना विभागातर्फे, वृत्तपत्रांमध्ये नुकतीच नाग नदी प्रदुषण निर्मुलन प्रकल्पाकरिता, २१ जानेवारी २०२१ रोजी एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली.विशेष म्हणजे तांत्रिक सल्लागार पदासाठी ही जाहीरात असली तरी या जाहीरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या अटी या फक्त एका विशिष्ट अधिका-यालाच पुन्हा प्रकल्पात आणने यासाठीच असल्याची चर्चा मनपात खासगीत ऐकू आली.

मोहम्मद ईजराईल हे मनपात पेंच प्रकल्पात उप अभियंता पदी सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांची सेवा ‘अखंडीत’सुरुच होती. या अतिरिक्त पदासाठी जवळपास महिन्याकाठी ४० हजार रुपयांपर्यंत पगार त्यांना दिला होता, याचा अर्थ वर्षाकाठी पावणे पाच लाख रुपयांचा पगार सेवानिवृत्त झालेल्या मात्र अतिरिक्त सेवा घेणा-यावर मनपा खर्च करीत होती.ईजराईल यांना नुकतेच पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रकल्प असणा-या नाग नदी प्रकल्पासाठी तांत्रिक सल्लागार पदी नेमण्यात आले आहे,विशेष म्हणजे माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ईजराईल यांची मनपाला त्यांचा पगार परवडत नाही किंबहूना मनपाचे अधिकारी हे स्वत: मनपाच्या प्रकल्पांचे कामकाज बघण्यासाठी सक्ष् म असताना सेवानिवृत्तांची सेवा नको म्हणून त्यांची पदावरुन गच्छंती केली होती.मात्र गडकरी यांच्या प्रकल्पासाठी पुन्हा ईजराईल यांची नियुक्ती व्हावी यासाठी आयुक्त राधाकृष्णन बी.यांच्या स्वाक्ष् रीने निघालेल्या जाहीरातीचे ‘गौडबंगाल’याबाबत खासगी बरीच चर्चा मनपात आता रंगली आहे.

ईजराईल यांना मागच्या दाराने पुन्हा मनपात आणायचेच,यासाठी जाहीरातीत एकूण एक अटींची पूर्तता हे ईजराईलच पूर्ण करीत असल्याने किंबहूना फक्त त्यांच्यासाठीच विविध वृत्तपत्रात लाखो रुपयांची जाहीरात प्रसिद्ध केल्याने अनेकांनी खासगीत नाराजी देखील व्यक्त केली आहे.गडकरी यांना त्यांना आणायचेच होते तर थेट नियुक्तीच करायची होती,असे देखील बोलले जात आहे,त्यासाठी जनतेच्या पैशांच्या जाहीरातीचा फास का?

या जाहीरातीत नदी प्रदुषण निर्मलन प्रकल्पाकरीता PMC(Project Management Counsultant)ची नेमणूक होईपर्यंत संबधित शासकीय विभागासोबत या प्रकल्पाशी संबधित माहिती व पत्र व्यवहार इ.संबंधित कामे करण्याकरिता सार्वजनिक आरोग्य आभियांत्रिकी विभागाअंतर्गत तांत्रिक सल्लागार(नदी प्रकल्प) या पदावर कंत्राटी तत्वावर २०१६ च्या शासन निर्णयानुसार मासिक पारिश्रमिक तत्वावर प्रथम: ६ महीन्यांच्या कालावधी करीता किवा PMC प्रकल्प सल्लागारची नेमणूक होईपर्यंत नियुक्ती करायची जाहीरात देण्यात आली.
विशेष म्हणजे यासाठी कमाल वयोमर्यादा ६५ वर्ष ठेवण्यात आली! याशिवाय महाराष्ट्र शासकीय सेवेतील,नागपूर महानगरपालिकेतील किवा इतर शासकीय सेवेतील सेवानिवृत्त उप अभियंता(स्थापत्य) या पदावरुन सेवानिवृत्तांनीच अर्ज करण्याची अट टाकण्यात आली!याशिवाय शहर वाढीव पाणी पुरवठा याेजना, तलावांचे पुनरज्जीवन,नदी प्रदुषण निर्मुलन प्रकल्प इ.पायाभूत सुविधा व नागरी सुविधा पुरविण्यासंबंधाने किमान ३ वर्षांच्या प्रत्यक्ष् अनुभवाची अट टाकण्यात आली.

२८ जानेवारी २०२१ रोजी मनपा मुख्यालयात सकाळी १०.३० वाजता थेट मुलाखतही पार पडली.यात फक्त मोहम्मद ईजराईल व अिमत मिश्रा हे दोनच मुलाखतकर्ते सहभागी झालेत! मिश्रा हे मनपाच्या ‘जवाहरलाल नेहरु नॅशनल अर्बन रिन्यूवल मिशन’ या मनपाच्या एक प्रकल्पात प्रकल्प अधिकारी म्हणून अनुभव प्राप्तकर्ते उमेदवार हाेते मात्र त्यांना डावलून ईजराईल यांची या पदी नियुक्ती करण्यात आली.
ईजराईल यांचीच थेट नियुक्ती करायची होती तर लाखो रुपयांच्या जाहीरातींचा फास कशासाठी काढण्यात आला?असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे.विशेष म्हणजे असे सेवानिवृत्त प्रकल्प अधिकारी यांच्यावर कोणतीही जवाबदारी देखील निश्‍चित केली जाऊ शकत नाही,एवढ्या महत्वाच्या पदावर मनपातील एखाद्या जवाबदार अधिका-याचीच नियुक्ती योग्य होती,असे म्हटल्या जात आहे.उद्या प्रकल्पाच्या अपयशासाठी जनता कोट्यावधीच्या या प्रकल्पासाठी काेणाला प्रश्‍न विचारणार?असा संताप व्यक्त केला जात आहे.

मो.ईजराईल यांच्या मनपातील भ्रष्ट काराभाराबाबत डागाळलेली प्रतिमा यावर देखील बोलले जात आहे.असा अधिकारी गडकरी यांना का हवा?असा प्रश्‍न आता उपस्थित केला जात आहे.नुकतेच गडकरी यांनी केंद्र शासनातर्फे नाग नदी प्रकल्पासठी जवळपास साढे तीन हजार कोटींच्या निधीला मान्यता मिळाली असून लवकरच याचे काम सुरु होणार असल्याचे पत्र परिषदेत सांगितले होते.नाग नदी स्वच्छ होऊन ‘पी.के’ चित्रपटातील ‘चार कदम बस चार कदम’या गाण्यात दाखवल्याप्रमाणे नाग नदीत देखील बोटी चालाव्यात,असे स्वप्न गडकरी यांनी बघितले आहे.

मात्र कोट्यावधींच्या अश्‍या प्रकल्पात ‘गौडबंगाल’चा ठपका असलेले अधिकारीच गडकरी यांना का हवे?अशी देखील चर्चा मनपात रंगली आहे.

शहरातील ८ हजार ६०० कोटींच्या महामेट्रो प्रकल्पात अडीच हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला असल्याची आेरड शहरातील ’जय जवान जय किसान’संघटना सातत्याने करीत आली आहे.आता नाग नदी प्रकल्पात देखील अश्‍या अधिका-याच्या सहाय्यातून किती कोटींचे ‘गौडबंगाल’होईल,असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या