Advertisements

कंत्राटदारने मृतदेह सेप्टिक टँकमध्ये पुरला
बिजापूर(छत्तीगढ)दिनांक ३ जानेवरी २०२५: नूतन वर्ष उजाडून अवघे तीनच दिवस झाले असता आज छत्तीसगढच्या बिजापूर शहरात पत्रकार मुकेश चंद्राकर यांची निघृण हत्या करुन त्याचा मृतदेह सेप्टिक टँकमध्ये पुरल्याचे आज आढळून आल्याने, पत्रकार जगतात एकच खळबळ उडाली आहे.काँग्रेसचा नेता व कंत्राटदार असलेला सुरेश चंद्राकार याच्या रस्त्यांच्या बांधकामातील एकशे वीस कोटींचा भ्रष्टाचार मुकेश यांनी बाहेर काढला होता,हे विशेष!
मुकेश चंद्राकार हे १ जानेवरी पासून बेपत्ता होते.पोलिसांनी मुकेश यांच्या शेवटचे लोकेशन ट्रेस केले असता ते कंत्राटदार सुरेश चंद्राकार यांच्या कंपनीत सापडले.यानंतर पोलिसांनी त्या ठिाकणी तपासणी केली असता सेप्टिक टँकमध्ये त्यांना मुकेश यांचा मृतदेह आढळला.
सहसा सेप्टिक टँक बांधत असताना त्याचा एक भाग मोकळा सोडला जातो ज्यावर झाकण बसवलं जातं मात्र,मुकेशचा मृतदेह झाकण्यासाठी अारोपींनी टँकेचे पूर्णत:काँक्रिटीकरण केले होते.
दरम्यान,१ जानेवरी रोजी मुकेश यांना बोलावण्यासाठी एक तरुण घरी आला असल्याची माहिती त्यांच्या कुटूंबियांनी दिली.यानंतर मुकेश यांचा मोबाईल बंद होता.हा तरुण दिल्लीत असल्याची चर्चा आहे.आज शुक्रवारी पोलसांनी साढे चार वाजता त्यांचा मृतदेह टँक फोडून बाहेर काढला.
गंगालूर रस्त्यांच्या बांधकामात प्रचंड प्रमाणात होणारा भ्रष्टाचार मुकेश यांनी उघडकीस आणला होता.यावरुन कंत्राटदार सुरेश चंद्रकार यांच्यासोबत मुकेश यांचा वाद सुरु होता.मुकेश आणि सुरेश हे नातेवाईक असल्याची बाब समोर आली आहे.कंत्राटदार सुरेश हा आधी एसपीओ होता.२०२१ मध्ये तो हेलिकॉप्टरने वरात घेऊन जगदलपुरला गेला असता यावर माध्यमांमध्येही खूप चर्चा झाली होती.
कंत्राटदार सुरेश याचा लहान भावाची रितेश चंद्राकारची CG20-3333 क्रमांकाची कार रायपुर विमानतळावर आढळून आली आहे.यावरुन आरोपी संपूर्ण कुटूंबियांसह गुरुवारी ६.४० च्या विमानाने दिल्लीला पळून गेल्याचे तपासात पुढे आले.आरोपीचा एक भाऊ मात्र पोलिसांच्या ताब्यात आहे.
छत्तीसगढचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी बीजापुरचे पत्रकार मुकेश चंद्राकार यांच्या हत्येवर शोक प्रकट केला आहे.या घटनेतील आरोपींना कोणत्याही परिस्थितीत सोडल्या जाणार नाही,असे आश्वासन त्यांनी दिले.मुकेश यांच्या शरीरावर धारदार शस्त्रांचे अनेक घाव आढळून आले.मुकेश हे नक्सलवादी घटनांच्या वार्तांकनामधील एक बहूचर्चित पत्रकार होते.मुकेशने टेकुलगुडेममधून बंदिस्त केलेल्या सीआरपीएफचे जवान राकेश्वर मन्हास यांना नक्सलवाद्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी यशस्वी मध्यस्थी केली होती.
ज्या सेप्टिक टँकमध्ये पत्रकार मुकेश यांचा मृतदेह मिळाला ती कंपनी कंत्राटदार व प्रदेश काँग्रेस कमेटीच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश महासचिव सुरेश चंद्राकारची आहे.
काँग्रेस नेता सुरेश चंद्राकार हा मूळ बासागुडाचा रहीवासी होता.सलवा जुडूम आंदोलनानंतर तो कुटूंबियांसह बीजापूरमध्ये राहावयास आला.येथे त्याने ठेकेदारी सुरु केली.बघता-बघता तो खूप मोठा ठेकेदार बनला.सुरेश यांनी काही दिवसांपूर्वीच गंगालूर रस्त्याचे बांधकाम केले मात्र,या कामातील एकशे वीस कोटींचा भ्रष्टाचार मुकेश चंद्राकार यांनी उघडकीस आणला.मुकेश यांच्या या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने याची चौकशी सुरु केली,परिणामी सुरेश याने या रागातून मुकेश यालाच संपवले.

मुकेश यांच्या या निर्घृण हत्येनंतर बीजापूर बंदची हाक पत्रकारांनी दिली आहे.
Advertisements

Advertisements

Advertisements
