फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजएकच व्यक्ति करते वारंवार शहरातील नवीन बांधकामांची तक्रार!

एकच व्यक्ति करते वारंवार शहरातील नवीन बांधकामांची तक्रार!

Advertisements

झोनल अधिका-यांसोबत काळेबेरे शोधून कारवाईची आभा पांडे यांची सभेत मागणी

नागपूर,ता. २० जानेवारी: काही समजाकंटक हे सर्वसामान्य तसेच गरीब नागरिकांना कश्‍याप्रकारे झोनल अधिका-यांच्या संगनमताने त्रास देतात व कश्‍याप्रकारे आर्थिक व्यवहार मॅनेज होतो याचा पाढाच आज मनपाच्या ऑन लाईन पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत अपक्ष् नगरसेविका आभा पांडे यांनी वाचला.

आभा पांडे म्हणाल्या की एकच व्यक्ति किंबहूना एकच विशिष्ट संस्था ही विशेषत: गांधीबाग झोन,लकजगंज आणि सतंरजीपुरा झोनमध्ये कोणत्याही सर्वसामान्य किवा गरीब नागरिकांनी नव्या इमारतीचे,दूकानाचे,घराचे बांधकाम काढले त्याविरोधात झोन कार्यालयात तक्रार नमूद करते,परिणामी झोनल अधिकारी हे त्या व्यक्ति विरोधात नोटीस जारी करतात.आधीच गरीबीने पिचलेल्या व सर्वसामान्य नागरिकांना घर किवा दूकान बांधणीसाठी असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो त्यात ही व्यक्ति किवा ही संस्था हेतुपुरस्सर त्या नागरिकांचा मानसिक त्रास आर्थि लुबाडणूकीसाठी आणखी वाढवतात.

नोटीसीला घाबरुन गरीब व्यक्ति ही त्या व्यक्तिसोबत ‘तोडपाणी’करीत असल्याचा संशय व्यक्त करीत ही व्यक्ति किवा संस्था मग झोनल कार्यालयात पुन्हा ‘तक्रारीबाबत माझे समाधान झाले’असा अर्ज देते!या व्यक्तिचे कोणत्या प्रकारचे समाधान होते?याची चौकशी करण्याची विनंती आभा पांडे यांनी सभागृहाला केली.
या नागरिकांचे कोणतेही बांधकाम अवैध नसताना मनपाचे झोनल अधिकारी कोणतीही शहनिशा न करता केवळ या व्यक्तिच्या तक्रारीमुळे नागरिकांना नोटीस पाठवते.आयुक्तांनी या संपूर्ण गौडबंगालाची चौकशी करुन सांगावे या तिन्ही झोनमध्ये या एकाच व्यक्तिने नागरिकांच्या बांधकामांविरोधात अश्‍या किती तक्रारी नोंदवल्या?झोनल अधिका-यांनी अश्‍या किती नोटीसी किती नागरिकांना जारी केल्या?तक्रार दाखल करणा-या व्यक्तिचे वारंवार समाधान कसे होते?

आभा पांडे यांच्या या प्रश्‍नावर नगररचना विभागाचे अधिकारी हर्षल गेडाम यांनी सर्व दहा झोन मिळून एकूण १७४ तक्रारी प्राप्त झाल्याची माहीती सभागृहाला दिली.मात्र या तक्रारी एकाच व्यक्तिद्वारे किवा एकाच संस्थेद्वारे देण्यात आली आहेत का?हे खरं आहे का?असा प्रश्‍न केला असता याबाबत सर्व झोन कार्यालयातून अहवाल मागवला असल्याचे उत्तर गेडाम यांनी दिले.
महापौरांच्या निर्देशानुसार उत्तर देताना आयुक्त राधाकृष्णन बी.यांनी सांगितले की हे खरे आहे की एकाच व्यक्तिने किवा एकाच संस्थेने

काही नागरिकांच्या नवीन बांधकामांबाबत अश्‍या तक्रारी तिन्ही झोनमध्ये वारंवार केल्या आहेत मात्र माहितीच्या अधिकाराअंतर्गत त्यांना माहिती देण्यापासून थांबवता येत नाही.माहिती अधिकाराचा असा ही गैरवापर होत असतो.मात्र हे सगळ्याच झोनमध्ये घडले नसून काही ठिकाणी घडले.माहिती देण्यावर झोनल अधिका-यांवर र्निबंध घालू शकत नाही.हे त्यांचे कर्तव्यच आहे.मात्र या अधिकाराचा दूरुपयोग होत असून गैरफायदा जर कोणी घेत असेल तर खोलात जाऊन चौकशी करण्यात येईल.

विनाकारण ही विशिष्ट व्यक्ती किवा संस्था तक्रार दाखल करीत असेल व नंतर तक्रारीचे समाधान झाले सांगत तक्रार वापस घेत असेल तर प्रथमदर्शनी हा कायद्याचा दुरुपयोगच ठरतो परिणामी त्या व्यक्तिच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा देखील नोंदविला जाईल मात्र यावर सखोल अभ्यास करण्याची गरज आयुक्तांनी प्रतिपादीत केली.

या संपूर्ण गौडबंगाल व कारस्थानमध्ये अनेक पक्ष्ाचे कार्यकर्ते सहभागी असल्याचा घणाघाती आरोप आभा पांडे यांनी सभेत केला.पक्ष्ाचेच दलाल गरीबांना पिडण्यासाठी सक्रिय झाल्याची मार्मिक टिका त्यांनी केली.या दलालांना पुढे जाऊन समाजाचे नेते व्हायचे आहे,नगरसेवक व्हायचे आहे परिणामी महाराष्ट्र शासनाच्या ज्या परिपत्रकाविषयी आयुक्तांनी आपल्या उत्तरात माहिती सभागृहाला दिली ते १४ ऑक्टोबर २०२० चे परिपत्रक अायुक्तांनी सभागृहाच्या पटलावर ठेवण्याचे निर्देश महापौरांनी द्यावे अशी विनंती त्यांनी केली.
या परिपत्रकात शासनाचे स्पष्ट आदेश आहेत ज्यांच्यावर अन्याय झाला केवळ त्यांचेच अर्ज स्वीकारण्यात यावे,त्यांच्यामार्फत होणारे इतरांचे अर्ज स्वीकारण्यात येऊ नये.माझी महापौरांना विनंती आहे त्यांनी ३०० मीटरच्या आत ज्यांची घरे नाहीत त्यांनी इतरांच्या बांधकामाविषयी त्यांची झोनस्तरावर तक्रार दाखल न करण्याचे निर्देश द्यावे,असे निवेदन केले.

यावर महापौर दयाशंकर तिवारी यांनी असे निर्देश देणे उचित होणार नसल्याचे सांगून मात्र एकाच व्यक्ति किवा एकाच संस्थेतर्फे वारंवार तक्रारींचे पत्र फाईल्सला लागणे चूकीचे असल्याचे सांगितले.आयुक्तांनी शासनाचे परिपत्रक पटलावर ठेवावे, आभा पांडे यांच्या या गंभीर तक्रारीबाबत आयुक्तांनी तपशील सादर करावा तसेच अश्‍या लोकांना आळा घालण्यासाठी अधिका-यांना निर्देश देण्याची सूचना त्यांनी केली.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या