

नागपूर,ता. १४ ऑगस्ट: नागपुर शहराचे पोलीस आयुक्तअमितेश कुमार यांनी अचानक “गंगा-जमुना”ही वस्ती सील केली.एकीकडे संपूर्ण देश ७५ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करणार मात्र दूसरीकडे पोलीस आयुक्त यांनी चारही बाजुनी बेरीकेट लावुन ही वस्ती सील करुन येथील वारांगणा माता-भगिनींना अधोषीत जेलमध्ये कोंडुन ठेवले आहे.
महिलांचा उध्दार करण्याऐवजी त्यांना भिकेला लावणे म्हणजे एक प्रकारे पोलीस आयुक्त या स्वतंत्रता दिनाचा अपमानच करीत आहे.
हे एक भ्याडपणाचे कृत्य असुन पोलीसांना क्राईम सिटीतील गुन्हेगारी रोखण्यात अपयश आलेले आहे.मात्र आपल्या खाकीचा जोर या असहाय महिलांवर काढत आहे .हे निंदनीय कृत्य असुन याचा आम्ही निषेध करतो.
निष्क्रीय पोलीस आपले अपयश झाकण्याकरीता गुन्हेगारांवर प्रत्यक्ष कारवाई करण्याऐवजी ही वस्ती सील करुन गरीब महीलांनाच जीवनातुन उठविण्याचा प्रयत्न करीत आहे.
कोरोना काळात आधीच ह्या महिला हतबल झालेल्या आहेत अशात त्यांना बेघर करण्याचा हा डाव असून यांची घरे पाडुन तिथे व्यापारी वसाहत बनविण्याचे फार मोेठे राजकीय षडयंत्र आहे.
पोटाची खळगी भरण्याकरीता हा व्यवसाय करणा-या महिलांच्या आर्त आग्रहात्सव त्यांना न्याय मिळावा या करीता रविवार दि. १५ आॕगस्ट रोजी सकाळी ९.०० वा. “गंगा-जमुना” या वस्तीत जाऊन तिरंगा फडकविणार व बेरीकेट हटविणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी अर्बन सेलच्या अध्यक्ष् ज्वाला धोटे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.




आमचे चॅनल subscribe करा
