

आरोग्य सुविधांवर असणार कर भर?नागपूरकरांची अपेक्ष्ा
नागपूर,ता. २७ मे: महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष् प्रकाश भाेयर हे उद्या शुक्रवार दि. २८ मे रोजी विशेष सभेत अर्थसंकल्प सादर करणार असून मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी विशेष सभेला अनुमती प्रदान केली आहे.
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यांनी २०२१-२२ या वर्षासाठी २६०७.६० कोटींचा प्रस्तावित अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्ष् प्रकाश भोयर यांच्याकडे मार्चमध्ये सुपूर्द केला होता.त्यानंतर १५ दिवसांपूर्वी परिवहन समितीनेही स्थायी समितीकडे अर्थसंकल्प सादर केला.आता स्थायी समितीचे अध्यक्ष् प्रकाश भोयर यांनी २०२१-२२ चा शहराच्या विकासाचा अर्थसंकल्प तयार केला आहे.
उद्या शुक्रवार दि. २८ मे रोजी हा अर्थसंकल्प सभागृहात सादर करण्यासाठी विशेष सभा बोलावण्याची मागणी भोयर यांनी आयुक्तांकडे केली होती.आयुक्तांनी त्यांच्या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत २८ मे रोजी विशेष सभेचे नियोजन केले.ही सभा ऑनलाईन होणार आहे.
त्यामुळे नगरसेवकांना भोयर यांच्या योजना घरीच बसून ऐकता येणार आहे.मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी त्यांच्या अर्थसंकल्पात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत मिनीमातानगर व नारा नागरी सामुदायिक आरोग्य केंद्राकरीता प्रत्येकी ५ कोटी मंजूर केले होते.
याशिवाय महापौर दयाशंकर तिवारी यांच्या महत्वाकांक्ष्ी ७५ वंदेमातरम हेल्थपोस्टसाठी आयुक्तांनी ३ कोटींची तरतूद केली होती.मात्र मनपाच्या आरोग्य यंत्रणा या किती सक्ष् म आहेत व किती सक्ष् म होऊ शकतात याचे पितळच करोना महामारीने उघडे पाडले.
गेल्या अनेक वर्षात नागपूर महानगरपालिका ही शहरातील १० टक्के नागरिकांनाही प्रभावी आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देऊ शकली नाही.त्यामुळे यंदा भोयर यांच्या अर्थसंकल्पात आरोग्य यंत्रणेसाठी किती भरीव वाढ असणार आहे याकडे नागरिकांचे लक्ष् लागले आहे.याशिवाय आरोग्य विषयक नव्या योजनांकडे देखील नागरिकांचे डोळे लागले आहेत. भोयर यांचा अर्थसंकल्प ३ हजार कोटींच्या जवळपास असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.




आमचे चॅनल subscribe करा
