

ठाकरे सरकार म्हणजे ’पलटूराम’सरकार
नागपूर,ता. २० नोव्हेंबर:हे राज्य सरकार आहे की ‘पलटूराम’सरकार आहे,या सरकारमध्ये एकच काम बघायला मिळतं,बदल्या करा आणि पैसा कमवा.भ्रष्टाचारामध्ये बरबटलेली ठाकरे सरकार ही फक्त जनतेला खोटी स्वप्ने दाखवून,खोटी आश्वासने देऊन वेळेवर ‘पलटूराम’होऊन जाते,असा घणाघात माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष् नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
ते भाजपचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारासाठी दोन दिवसांच्या नागपूर दौ-यावर आले आहेत.पश्चिम मंडळतर्फे झिंगाबाई टाकलीच्या अंजनाबाई सभागृहात ते बोलत होते.याप्रसंगी ते म्हणाले की,राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी ० ते १०० युनिट विज वापरणा-या गरिब ग्राहकांना विज बिल मोफत देणार असल्याचे आश्वासन दिले यानंतर ते पलटून गेले.शिवसेनेने ३० टक्के पर्यंत विज बिल कमी करण्याचे आश्वासन दिले होते ते ही पलटलेत,उलट ५ ते १० टक्के वाढवून ग्राहकांना विज बिल पाठवले.
महाराष्ट्रातील नागरिकांनी ओरड करताच २ हजार कोटींचे विज बिल माफ करण्यात येईल अशी घोषणा केली नंतर ते पलटले.आम्ही हजारो विज देयके त्यांना दाखवली पण त्यांच्यावर काहीच असर नाही झाला.या आघाडी सरकारकडे युवकांना रोजगार देण्यासाठी कोणतीही ठोस योजनाच नाही. शिक्ष् कांना आमची सरकार येताच २० टक्के अनुदान सुरु करण्यात आले मात्र महाविकासआघाडी सरकार सत्तेवर येताच त्यांनी हे २० टक्के अनुदान थांबवले.
या सरकारने अनेक विकास प्रकल्पांचे काम थांबवले.या सरकारमधील अनेक मंत्र्यांना तर विदर्भावर विशेष राग आहे!राज्याचे मुख्यमंत्री हे तर फक्त ‘मुंबई‘चे मुख्यमंत्री झाले आहेत,अशी टिका त्यांनी केली. या सरकारने अतिवृष्टित नुकसान झालेल्या शेतक-यांना कोणतीही मदत केली नाही.आता पदवीधर निवडणूकीत आम्हाला मुख्यमंत्र्यांना दाखवावे लागेल तेव्हाच ते पळत येऊन विदर्भात कामाला सुरवात करतील. यावेळी पूर्व नागपूरातून ७५ टक्क्यांपेक्ष्ा जास्त मतदान झाले पाहिजे,असे आवाहन त्यांनी केले. मतदारांशी प्रत्यक्ष् संपर्क साधा व त्यांना मतदान करण्यास प्रेरित करा,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांची खरी जागा दाखवण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की पदवीधर मतदारसंघ भाजपचा गढ होता,आहे आणि राहील.केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्यानंतर प्रा.अनिल सोले यांनी पदवीधरांच्या प्रश्नांना विधीमंडळ सभागृहात न्याय दिला.आज करोनासारख्या महामारीच्या संकटकाळात संदीप जोशी यांनी नागरिकांसोबत खांद्याला खांदा लावून काम केले,त्यांचे दु:ख वाटून घेतले.अनेकांचे प्राण वाचवले.त्यांना आशा आहे की पदवीधरांच्या समस्यांना विधिमंडळ सभागृहाच्या पटलावर सुनियोजित पद्धतीने ते मांडू शकतील.
याप्रसंगी माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे,शहराध्यक्ष् प्रवीण दटके,आ.कृष्णा खोपडे,आ.मोहन मते,माजी आ.सुधाकर देशमुख,सुधाकर कोहळे,संजय भेंडे, जयप्रकाश गुप्ता,संजय बंगाले,चेतना टांक,संजय ठाकर,मण्डल अध्यक्ष् विनोद कन्हेरे,देवेन दस्तुरे,डॉ.गिल्लूरकर,डॉ.संजीव चौधरी ,सीए सुरेंद्र दूरगकर,आर.सी.गुल्हाने, पिंटू झलके, छोटू भोयर,पूर्व आमदार सुधाकर कोहले,विजय असोले,विकास बूंदे,विनोद कडु,रितेश पांडे,गजानंद मोहाडिकर,धर्मपाल मेश्राम,उपमहापौर मनीषा कोठे,संदिप जाधव,रमेश चोपड़े,मंडल,जयप्रकाश गुप्ता,प्रगति पाटील योगेश साहू जगदीश बियाणी यांच्यासह शेकडो पदवीधर उपस्थित होते.
काँग्रेस पक्ष् काश्मीरमधील ग्रुपकार गँगची साथीदार-
यावेळी काँग्रेस पक्ष्ावर घणाघात करताना फडणवीस यांनी काँग्रेस पक्ष् च नव्हे तर शिवेसना महाविकास आघाडीची सरकार ही काश्मीरमधील ग्रुपकार गँगची साथीदार झाली आहे. जे काश्मीरमध्ये चीनच्या मदतीने पुन्हा ३७० लागू करण्याचे स्वप्न बघत आहेत.ज्या पक्ष्ाकडून काश्मीरमध्ये राष्ट्रीय ध्वज तिरंगा हा देखील फडकवण्याची क्ष् मता नाही अश्या काँग्रेससोबत शिवसेना देखील सत्तेत आहे.पदवीधर मतदारांनी याचा विचार करावा असे आवाहन त्यांनी केले.




आमचे चॅनल subscribe करा
